.
"" मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी -""
(चाल- भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी)
मतदानाच्या यादीमधुनी गायब राजा राणी
अर्ध्यावरती नाद सोडला मतदानावर पाणी ...
नवरा वदला "मला ग नाही, नावाची ती आशा
माझ्या नावापुढेच आहे 'मयत' खुणेची रेषा "
का भार्येच्या डोळा तेव्हा भरून आले पाणी ..... अर्ध्यावरती .....
भार्या वदली बघत एकएक यादीमधला फोटो
"उद्या पहाते दुसऱ्या आपुल्या प्रभागात मी फोटो "
पण नवऱ्याला नव्हती खात्री दूर बसे जाऊनी .......अर्ध्यावरती....
तिला विचारी नवरा- 'का हे नाव असे खोडावे ?
आयोगाने पुसण्याआधी आम्हास का न पुसावे !'
भार्येला ना उत्तर सुचले, झाली केविलवाणी........अर्ध्यावरती ..
का नवऱ्याने मिटले डोळे 'शाईखूण' दिसताना
का नवऱ्याला त्रास वाटला मतदान ते बघताना
बोटावरती नजर टाकितो अपुल्या उदासवाणी .......अर्ध्यावरती ....
प्रतिक्रिया
9 May 2014 - 6:50 pm | विकास
एकदम आवडले! डोळे पाण्याने डबडबले आहेत. :)
9 May 2014 - 7:47 pm | संदीप चित्रे
असेच म्हणतो :)
10 May 2014 - 11:14 am | ब़जरबट्टू
असेच म्हणतो...
9 May 2014 - 7:30 pm | अत्रुप्त आत्मा
छान डाव टाकलाय! :)
9 May 2014 - 8:12 pm | आतिवास
समयोचित!
आवडली.
9 May 2014 - 9:12 pm | सूड
बर्यापैकी जमलीय !! :)
9 May 2014 - 9:24 pm | आत्मशून्य
.
9 May 2014 - 10:35 pm | बहुगुणी
आवडली!
9 May 2014 - 10:04 pm | यशोधरा
आवडली! मस्त!
9 May 2014 - 10:14 pm | मदनबाण
झकास्स्स... :)
9 May 2014 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त !
9 May 2014 - 11:41 pm | पैसा
झकास कविता!
10 May 2014 - 12:46 am | मधुरा देशपांडे
मस्त. *good*
10 May 2014 - 7:09 am | चौकटराजा
हे मस्त जमलंय
आमच्या दोन ओळी
मतदानाच्या यादीमधनी गायब राजा राणी
छ्या संध्ये, दिवस मोडला
आली अमोलाची ती वाणी
10 May 2014 - 9:10 am | मुक्त विहारि
झक्कास
12 May 2014 - 3:26 pm | बिपिन६८
फारच मस्त
13 May 2014 - 1:05 pm | विदेश
प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!