आगामी निवडणूकीत तुम्ही कोणाला मत देणार?

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
29 Sep 2014 - 9:59 am
गाभा: 

तुम्ही कोणाला मत देणार हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे, म्हणून मी खालील पर्याय समोर र्ठेवत आहे. बाकी इतर पर्याय वाढवण्यासही माझी हरकत नाही, हे काही प्रातिधिनिक पर्याय आहेत.

१. माझे मत विकासाला
२. मझे मत स्थिर सरकारला
३. माझे मत निष्ठेला
४. माझे मत प्रामाणिकपणाला
५. माझे मत संरक्षणाला.
६. माझे मत संस्क्रुतीला
७. माझे मत पैशाला
८. माझे मत प्रशासनाला

इत्यादी इत्यादी. तुम्ही यापैकी एकाहून अधिक पर्याय देखील निवडू शकता. पण त्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल.

बघूया तर.

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

29 Sep 2014 - 10:05 am | भिंगरी

निष्ठेला

भिंगरी's picture

29 Sep 2014 - 10:06 am | भिंगरी

व्यक्तीच्या नाही

जेनी...'s picture

29 Sep 2014 - 10:08 am | जेनी...

माझे मत सासुबैंना :D

7 :P

पिवळा डांबिस's picture

29 Sep 2014 - 10:13 am | पिवळा डांबिस

माझेही मत जेनीच्या सासुबैना!!!
(जेनी तो जेनी हाय अल्ला, मगर जेनीकी सासुबै सुभानल्ला!!!)
:)

थेंक्स हं पिंडाकाका ... आता सासुबै जिक्नार ... लै मज्जा येणार :D

पण जिक्ल्यावर आपल्या मिपाला विस्रायचं नै हं सासुबै :-/

पैसा's picture

29 Sep 2014 - 6:44 pm | पैसा

असंं चारचौघात सांगू नको! तू "मला" मत देणार म्हटलंस की आणखी १००० "विकासाला" देतील!

जेनी...'s picture

29 Sep 2014 - 10:25 am | जेनी...

इश्श्यं ... पिंडा काका .. सासुबैन्ना सुभानल्ला म्हणताय ..???

मामंजींनी वाचलं तं चक्करच येवुन पडतिल ़कि ते :P

:D

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 11:58 pm | काउबॉय

मामंजीची दया येतेय.

काळा पहाड's picture

30 Sep 2014 - 12:30 am | काळा पहाड

चप्पल लावा..

प्रसाद१९७१'s picture

29 Sep 2014 - 10:36 am | प्रसाद१९७१

अहो ह्यातल्या एका तरी पर्यायाच्या समोर, किंवा ह्यातली एक गोष्ट तरी करु शकेल असा एक तरी उमेदवार किंवा पक्ष असायला हवा ना.

आनन्दा's picture

29 Sep 2014 - 10:39 am | आनन्दा

प्रसाद साहेब, यातील सारेच पर्याय कोणत्यातरी पक्षाची खूण आहेत. अर्थात आपल्यादृष्टीने नव्हे, तर त्यांच्या दृष्टीने.
आणि आपल्यासमोर फारसे पर्याय आहेतच कुठे? आहेत त्यातलेच कोणतेतरी पर्याय प्रायॉरटाइझ करावे लागणार आहेत यावेळेस.
कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

प्रसाद१९७१'s picture

29 Sep 2014 - 10:45 am | प्रसाद१९७१

कोणताच पक्ष यातले सारे देऊ शकणार नाहीये असे आता म्हाणावे लागणार आहे.

सार्‍याची अपेक्षाच नाही हो. एक सुद्धा देऊ शकणार नाहीत. आणि द्यायची इच्छा पण नाहीये.

त्यापेक्षा अम्मा आणि करुणानिधी बरे आहेत. सत्तेवर आले की दुसर्‍याला चांगले छळतात.
महाराष्ट्रात मात्र, सत्ताधीश बदलले तरी आधीच्या भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा सोडा नुस्ती चौकशी पण होत नाही. "सारे मिळेनी खाऊ" हेच एक ब्रीदवाक्य.

विटेकर's picture

29 Sep 2014 - 10:47 am | विटेकर

आमी नाय सांगणार ज्जा !

जेपी's picture

29 Sep 2014 - 10:52 am | जेपी

यावेळेस आपला NOTA.
लातुर मतदारसंघात देशमुख मुंडे मैत्री सर्वश्रुत होतीच.
पुढील पिढीनेही तोच वारसा चालवायच ठरवल आहे.त्यामुळे लातुर शहर अमित देशमुखच येणार.
NOTA वापरुन टाकतो .
या निवडणुकीत रस नाही.

काउबॉय's picture

29 Sep 2014 - 10:55 am | काउबॉय

;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Sep 2014 - 11:06 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्या नेहेमीच्या पक्षानी जर का भ्रष्टवादीमधुन आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली तर यंदा त्यांना बाण मारायला लागणार असं दिसतय.

यंदा कुठला माणुस कुठे गेलाय त्याची टोटलचं लागत नाहीये, ते पक्षांतरबंदी कायद्याचं काय लफडं असतं कोणी सांगेल का?

विलासराव's picture

29 Sep 2014 - 11:23 am | विलासराव

यावेळेस आपलाही NOTA.

प्रसाद१९७१'s picture

29 Sep 2014 - 11:29 am | प्रसाद१९७१

शहरी भागात तरी आप ने चांगला चान्स घालवला निवडणुकीत भाग घेउन असे वाटतय. १० तरी आमदार निवडुन आले असते.

आप कड़े निवडणुक लढवायला पैसा उरला आहे ? नक्कीच नाही. आणि जो राजकीय मुर्खपणा पक्ष म्हणून दाखवला आहे त्याला आता कोणी पैसा पुरवेल असेही वाटत नाही. अतिशय चांगली माणसे अक्षरश: कुजवली :(

मार्मिक गोडसे's picture

29 Sep 2014 - 12:08 pm | मार्मिक गोडसे

कृपाशंकरला ... आजुबाजुच्या दुसर्‍यांच्या जमिनी नावावर करुन घ्याव्या म्हनतो, वडिलोपार्जीत जमिन नावावर करायला फार त्रास होतोय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Sep 2014 - 12:49 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

शिवसेना व भाजपा ह्या दोन्ही पक्षांनी कमरेचे सोडून डोक्याला कसे गुंडाळायचे ते आपल्याला गेल्या आठवड्यात दाखवून दिले. मनसे व राज ठाकरे हे बंडलबाज वाटतात आम्हा दोघांनाही.
सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

प्यारे१'s picture

29 Sep 2014 - 1:15 pm | प्यारे१

>>> सुसंस्कृत शिकलेले पृथ्वीराजच मुख्यमंत्री म्हणून योग्य वाटतात.

बाबांना संस्कृत येतं? कमाल आहे! कधी दिसले नाहीत बोलताना.
बाकी बाबांच्या सुसंस्कृतपणाबाबत उदयसिंहराजे उंडाळकर पाटलांना विचारलं का कधी?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Sep 2014 - 2:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बाबा रे प्यारे१, मला तुझ्या त्या उदय्सिंहाबद्दल माहित नाही.तूच सांग बरे इकडे.हुल्लडबाजीची परंपरा ज्यांना आहे असे (मन)सेना नेते खरोखरच चांगल्या प्रकारे राज्य संभाळू शक्तील का रे? ह्याचा अर्थ कॉन्ग्रेस पक्षात मोठे विद्वान आहेत असे नव्हे पण तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास तर कॉन्ग्रेसवाले म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ म्हणता येईल.

काळा पहाड's picture

29 Sep 2014 - 10:43 pm | काळा पहाड

तो १९९५-९९ चा युतीवाल्यांचा काळ आठवलास

हो ना.. फुकट खाणार्‍यांचे वांधेच झाले होते तेव्हा.. खरंय.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Sep 2014 - 3:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ते खरे आहे.अनेक दिवस उपाशी राहिलेल्या माणसाला आमरस-पुरी,मसाले भात दिसल्यावर जे होईल तसे आपल्या सेना-भाजपा नेत्यांचे झाले होते.आता जर सत्ता मिळाली तर तसे होवू नये अशी अपेक्षा करते.

काळा पहाड's picture

1 Oct 2014 - 11:36 am | काळा पहाड

उपमा चुकीची आहे. तसं नसतं तर बोबडा इतकी वर्ष खा खा खातोय. भूक कमी झालीय का?

तेच राज्यात चालु नये हीच इच्छा

वर्गणीचेच दर वाढतील

भाते's picture

29 Sep 2014 - 12:52 pm | भाते

NOTA
आपल्या पक्षाचे तिकिट मिळाले नाही म्हणुन (केवळ पद टिकवण्यासाठी) आयत्या वेळी पक्ष बदलणारे उमेदवार पाहुन संताप येतो. सगळेचं xx एका माळेचे मणी आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2014 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

हे 'गुप्त' मतदान आहे.

काउबॉय's picture

30 Sep 2014 - 12:39 am | काउबॉय

हे पक्ष, उमेदवाराचे नाव घेऊन विचारणे अयोग्य आहे,

हे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे, लेख नवे सरकार कसे हवे या धाट्नीचा वाटतो.

विवेकपटाईत's picture

29 Sep 2014 - 8:05 pm | विवेकपटाईत

बड़के भैया, छुटके भैया, चाचा-भतीजा, सर्व नातलग मंडळीच निवडणूकीत उभी आहे,संभ्रमाची स्थिती आहे

माम्लेदारचा पन्खा's picture

29 Sep 2014 - 10:24 pm | माम्लेदारचा पन्खा

आपण आपल्या झोळीकडे बघुया....

टवाळ कार्टा's picture

29 Sep 2014 - 10:50 pm | टवाळ कार्टा

जो कोणत्याही नेत्याचा नातलग नाहीये त्याला...या सगळ्या नातलगाना आपटवले पाहिजे या निवडणूकीत

चौकटराजा's picture

30 Sep 2014 - 9:32 am | चौकटराजा

माझे मत या राजकारणाच्या उकीरड्याला कंटाळून त्यादिवशी मतदानाला मस्तपैकी दांडी मारून खडकवासला , लवासा, पानशेत झालंच तर सिंव्हगड ई ई पेट जागी जाउन " लावून" बसणार्‍याना ! आता मला त्यांच्या व्ह्यू पटायला लागला आहे !

ऋषिकेश's picture

30 Sep 2014 - 9:54 am | ऋषिकेश

माझं मत NOTAला

पिलीयन रायडर's picture

30 Sep 2014 - 10:05 am | पिलीयन रायडर

एक प्रश्न..

NOTA ला मत दिलं तर, उरलेल्या मतांमध्ये ज्याला सर्वात जास्त मतं मिळाली आहेत तो निवडुन येतो ना?

म्हणजे NOTA ला ४०%, आणि मग ३०%, २०% आणि १०% असे पहिले ३ उमेदवार असतील तर ३०% वाला निवडुन येतो ना? मग NOTA चा उपयोग काय?

टवाळ कार्टा's picture

30 Sep 2014 - 11:00 am | टवाळ कार्टा

NOTA हा लोकांना "**" बनवायला काढलेला उपाय आहे