अमेरिकन चिकन

रवीराज's picture
रवीराज in काथ्याकूट
15 Oct 2014 - 12:46 pm
गाभा: 

आंतरराष्ट्रीय राजकारणात रशिया - युक्रेन वादामधे अमेरिका आणि यूरोपने रशियावर आर्थिक निर्बंध लादले त्याला प्रत्युत्तर म्हणुन रशियानेही अमेरिका आणि यूरोपमधुन आयात होणाऱ्या पोल्ट्री आणि डेअरी उत्पादनावर निर्बंध लादले. त्यामुळे अमेरिकेतील उत्पादकांचे मोठे नुकसान होउ लागले त्यातही पोल्ट्री उत्पादकांचे फारच नुकसान होउ लागले कारण अमेरिकेतील पोल्ट्री व्यवसाय मुख्यत: निर्यातीसाठी असल्याने आणि रशिया मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री उत्पादन आयातदार होता तो निर्बंधामुळे आयात बंद केल्याने पोल्ट्री व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान हे अटळ होतेच .
आता अमेरिका हा भांडवलदारांचा देश, गुंतवणुकदार आणि उद्योगपतींचे नुकसान होऊ लागले म्हणताना अमेरिकेचे राज्यकर्ते काहीतरी उपाययोजना करणार हे आलेच, तर ती उपाययोजना काय असणार याबाबत उत्सुकता होती आणि आजच बातमी वाचली की, "WTO मधे भारत आणि अमेरिकेमधे चाललेल्या केसमधे भारत हरला" बर्ड फ्लुच्या आशंकेने भारताने अमेरिकेच्या पोल्ट्री उत्पादनावर निर्बंध लावले होते आणि त्याविरोधात अमेरिकेने भारताला WTO च्या लवादामधे खेचले होते आणि त्याचा निकाल भारताच्या विरोधात गेला.
आता भारतात खाणारी तोंडे भरपुर म्हणजे लोकसंख्या भरपुर परिणामी मागणी भरपुर आणि अमेरिकेत चिकन तंगड्या भरपुर मग काय अमेरिकन चिकन जाऊदे भारतात.
बोला आता.....

प्रतिक्रिया

सुनील's picture

15 Oct 2014 - 1:56 pm | सुनील

चला, चिकनचे भाव उतरणार तर! ;)

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2014 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

स्वदेशीचा मंत्र जागवा...

पुतळाचैतन्याचा's picture

17 Oct 2014 - 10:40 am | पुतळाचैतन्याचा

तुम्हाला परकीय गुंतवणूक तेवढी चालते ...बाकी सगळे स्वदेशी लागते.

रवीराज's picture

15 Oct 2014 - 11:20 pm | रवीराज

गावरान म्हणायचे आहे का.....परवडत नाही हो,खिशाला

जेपी's picture

16 Oct 2014 - 6:58 am | जेपी

बोला आता....
नाय नाय इबोला आता.

हरकाम्या's picture

18 Oct 2014 - 2:31 pm | हरकाम्या

विचार कुठला करताय घ्या " तंगड्या " हाणुन.