चूत्झस्पा -
अगदी आत्ता कालपरवा ऐका हिंदी चित्रपटात हा ज्यू बोलीभाषेतून उगम पावलेला हा शब्द ऐकला, चित्रपटातील ऐक पात्र, त्याचा अर्थ समोरच्याला समजवण्यासाठी, ऐक छोटेखानी गोष्ट सांगतो. ऐका मुलावर त्याचा आई- वडीलांच्या हत्येचा आरोप असतो, पण जजसमोर तो दयेची याचना करतो, जज विचारतो कि 'अरे बाबा, तू सख्ख्या आई बापाचा खून केलास, तुझ्यावर कोणी दया का म्हणून दाखवावी ? ', त्यावर तो मुलगा म्हणतो कि 'मी ऐक अनाथ(यतीम) मुलगा झालो आहे म्हणून'
चूत्झस्पा चा पुस्तकी अर्थ, 'अविश्वसनीय धाडस/तर्क अधिक घमेंड' असा असला तरीही, एक्झाट अर्थ दाखविणारे, व त्यात अभिप्रेत असलेली आश्चर्य तसेच मजबूत नापसंती आणि धिक्कार दोन्ही व्यक्त होवून, मूळ शब्दावर न्याय करू शकतील, असा समानार्थी शब्द, इतर भाषेत नाही, त्यामुळे तो शब्द अनुभवावा लागतो.
चूत्झस्पा म्हणजे एखादी कृती करून/मुक्तफळे उधळून , त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारीस एकूण नकार देणे/दर्शविणे की ज्यामुळे बाकीची पब्लिक, दिघ्मूड awestruck होवून, त्यांना 'मनाची-टोचणी', 'दिलगिरी', 'सहानुभूती' आणि अंतर्दृष्टी सारख्या मानवी गोष्टी, खोटी वाटायला लागतात.
लेटेस्ट उदा म्हणजे,
१. कायदा-सुव्यवस्था सांभाळलेल्या माजी मंत्र्याने, 'अरे निवडणुकीच्या आधी काय बलात्कार करायचा ? आमदार म्हणून निवडून आल्यावर करायचा !' असे जाहीर सभेत म्हणायचे
२. काही महिन्यांपूर्वी दुसर्याने 'अरे धरणात पाणी नाही मग मी काय -- करू ?' असे जाहीर सभेत बोलणे
असे दिवे सर्वच राजकीय पक्ष्यांच्या नेते- कार्यकर्ते लावत असतातच. तुम्हाला अशी काही सत्यघटनेवर आधारित 'ऐक तरी चूत्झस्पा अनुभवावा' असे प्रसंग माहितीत आहे का ? असल्यास शेयर करा.
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 7:48 pm | दिपक.कुवेत
कळलं नाहिच पण तो शब्द उच्चारताना सुद्धा कसरत करावी लागली. त्या पेक्षा नुसतं "स्पा" कसं शीडशीडीत आप्लं सुटसुटित वाटतं....बोलायला/बघायला.
13 Oct 2014 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा
@त्या पेक्षा नुसतं "स्पा" कसं शीडशीडीत आप्लं सुटसुटित वाटतं....बोलायला/बघायला.>> =)) अगदी अगदी! =))
13 Oct 2014 - 8:36 pm | बहुगुणी
कूट्झ्पा / हूट्झ्पा असा उच्चार आहे असं वाटतं:
बाकी जयललिता, मायादेवी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यांसारख्या बर्याच 'नेत्यां'च्या भाषणबाजीत अशा धक्कादायक, बेमुर्वतखोर, बेशरम वर्तनाची पाहिजे तितकी उदाहरणं मिळतील.
14 Oct 2014 - 5:16 pm | विशाखा पाटील
योग्य उच्चार 'हुतस्पा' असा आहे. उद्धटपणा आणि निर्लज्जपणा ह्या अंतर्गत येणारं जे काही भाषण आणि मुलाखतीमधून कानावर पडत असत, ते ह्या शब्दात अंतर्भूत आहे. :)
16 Oct 2014 - 6:05 pm | संचित
@पगला गजोधर चूत्झस्पा या विषयासाठी सुद्धा tenth rule लागू होतो का?