ओबामा उवाच
वॉशिंग्टन डीसी मध्ये फेब्रुवारीच्या पहील्या गुरूवारी "राष्ट्रीय प्रार्थना न्याहारी" ;) अर्थात "National Prayers Breakfast" म्हणून सोहळा असतो. १९५३ पासून तो चाललेला आहे. जवळपास ३५०० अतिमहत्वाच्या व्यक्ती/उच्चभ्रू त्यासाठी येतात. एक वक्ता हा अमेरीकन राष्ट्राध्यक्ष असतो तर दुसरा त्या दिवशी सकाळपर्यंत गोपनीय ठेवलेला असतो. इंटरनेट, विकी आणि गुगलच्या जमान्यात एक गंमतीशीर निरीक्षण करता आले. या सोहळ्याविषयी काही माहिती मिळते का ते पहायला गेलो तर विकीवर (वर दिलेली) त्रोटक माहिती मिळाली. १९५३ सालपासून जरी चालू असला तरी विकीपानावर केवळ १९७३ पासूनचे वक्तेच लिहीलेले आहेत.