टोपणनाव

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
30 Jan 2015 - 12:39 pm
गाभा: 

नावात काय आहे ? असे आपण म्हणतो. खरतर आपलं शिक्षण, कुठे रहातो, धर्म काय याचा इथे, आंतरजालावर लिहीताना काहीच संबंध नसतो. पण काही आंतरजालावर वावरणारे मात्र आपले खरे नाव कळू न देण्याची दक्षता घेतात. स्वत:विषयी थेट काहीही माहिती न देता, टोपणनाव घेवून प्रतिक्रिया लेख देतात. काय कारण असावे ?
आंतरजालावर टोपणनाव घेणार्यांना, नाव आडनाव शहर धंदा दिला की लोकं लगेचच, त्या व्यक्तीचे/चा/ची, जात, धर्म,आहारपद्धती, व्याकरण, राजकीय-मत, बद्दल मनात पूर्वग्रह बनवून मोकळे, एवढंच काय तुम्ही कुठल्या पेठेत, मध्यवर्ती कि उपनगर, आलेल्या पाहुण्यांना चहा देता कि नाही, देशभक्त आहात कि नाही, जातीयवादी आहात कि नाही, अस्सल मराठी आहात कि नाही, इस्राइल-पालेस्टेन संघर्षाबाबत तुमचा stand, वैगरे बाबत ठरवून मोकळे होतात कि काय, असे वाटूनच टोपणनाव धारण करताना ‘लोकांनी आपल्या विचारांवरून आपल्याला ओळखावे, उगा आपलं नाव गावच्या फंदात पडू नये’, असं तर वाटत नसेल ना ? खर्या नावाने वावरणार्यांना, ‘टोपणनाव वापरुन लिहीणे म्हणजे आपल्या स्वतःच्या अपत्याचे पितृत्त्व दुसर्यास बहाल करण्यासारखे’ तर वाटत नसेल ना ?

प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ नेहमी म्हणतात, की "माणसाला व्यक्त व्हायला आवडतंच, नव्हे हा तर त्याचा बेसिक Instinct आहे".

आंतरजालाने व्यक्त होण्याची हि सुविधा दिलेली आहे, पण काहीजन टोपणनाव घेऊन व्यक्त होतात. ५ जुलै १९९३ रोजी 'न्यू यॉर्कर' मधे, प्रसिध्द झालेले व्यंगचित्र, आजसुद्धा लागू आहे.
[संधर्भ “”http:://en.wikipedia.org/wiki/On_the_Internet,_nobody_knows_you%27re_a_dog””]
ऐका आंतरजालीय रिसर्चमध्ये असे आढळले कि ऐकून ४०% आंतरजालीय टोपणनावाने वावरतात, १०० आंतरजालीय पुरुषांमध्ये ६६%+ टोपणनावाने वावरतात, तर १०० आंतरजालीय महिलांमागे ३०% पेक्षा कमी महिला टोपणनावाने वावरतात. म्हणजेच एकुणात पुरुषांची महिलांच्या तुलनेत टोपणनावाने वावरण्याची प्रवृत्ती अधिक असते. वयापरत्वेही टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम होतो, त्यातल्या त्यात फक्त पुरुष सभासदांच्या वयाचा अभ्यास केला असता, जसे की
सरासरी वय (३९ वर्षे ) - टोपणनावाने वावरण्याच्या प्रवृत्ती (६७ %+ पेक्षा जास्त)
, (३० वर्षे )- (३३-६६%)
, (४५+ वर्षे )- (३३% - पेक्षा कमी)
त्या रिसर्चमध्ये असे आढळल की लोकं नाव लपवण्यासाठी नाही तर (ऐकून टोपणनाव घेणाऱ्यात ७०%)प्रायवसीसाठी टोपणनाव धारण करतात. What makes this finding interesting is that there is an increased desire for identity control across all major social networks as people become more privacy conscious.
उरलेली लोक संवेदनशील विषयावर व्यक्त होता यावे, किंवा आपले खरे नाव, आपल्यात दडलेल्या 'स्व'ला योग्य न्याय देवू शकत नाही असे वाटते म्हणून टोपणनाव धारण करतात. (उदा एखादे काल्पनिक ४० वर्षीय श्री गंगाधर त्रंबकजी घोडनदिकर, उभी हयात भाषेचे प्राध्यापक म्हणून समाजात वावरत असले, तरी त्यांच्या दडलेल्या स्व मध्ये ते स्वतःला, ‘गरीबांचा कैवारी दुर्जन्नांचा संहारी’ वैगरे वैगरे पाहत असतील तर ते टोपणनाव सुपरम्यान, रॉबिन-हूड तत्सम प्रकारातील घेतील) त्यांची सार्वजनिकपणे व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतला हा मोठा प्रोत्साहक असतो, कि जे खऱ्या नावानिशी शक्य नाही असे कदाचित त्यांना वाटत असावे.
सर्वेमधील जवळ जवळ ९५% आंतरजालीय लोकांनी सांगितले की, टोपणनावाकडून मिळणारा सल्ला व खर्या नावाकडून मिळणारा सल्ला, एकसारखाच विश्वसनीय असतो, म्हणजेच टोपणनाव वापरल्यामुळे व्यक्तीच्या आंतरजालावरील विश्वासार्ह्यतेत अजिबात फरक पडत नाही.
Have you ever discovered new product, service or business through online comments ? या प्रश्नावर जवळजवळ ६०% लोकांनी होकारार्थी उत्तर दिले.
नावात काय आहे ? हे लिहिणारा प्रसिद्ध नाट्यलेखक 'विलीयम शेक्सपियर', हे देखील ऐक टोपणनावच होते.
माझे टोपणनाव हे माझे व्यक्तिमत्व लपवण्यासाठी केलेला उपद्व्याप नसून, मुळी तेच माझे व्यक्तिमत्व आहे.---पगला गजोधर

प्रतिक्रिया

महेश अशोक खरे's picture

30 Jan 2015 - 2:31 pm | महेश अशोक खरे

माणसं टोपणनाव का घेतात हा एक मस्तच प्रश्‍न श्री. पगला गजोधर यांनी मांडला आहे. माझ्या मते जेव्हा स्वतःची ओळख न लपवता आपण आपले मत मांडले तर त्यामुळे समोरची व्यक्ती / समोरच्या व्यक्ती दुखावतील, त्यांची प्रतिकूल प्रकिक्रिया येईल या भितीतून टोपणनावाने लिखाण करण्याची सुरुवात झाली असावी. कोणत्याही प्रकारचे दडपण नसलेल्या समाजात टोपणनाव घेण्याची आवश्यकताच राहणार नाही. व्यक्तिशः मला टोपण नाव घेणे कमकुवतपणाचे - दुदैवी वाटते. जसे मला विग घालणारी, केसांना रंग लावणारी माणसे दुदैवी वाटतात, तसेच आहे. हे माझे मत आहे. याविषयी टोपणनाव घेणार्‍यांची, विग घालणार्‍यांची, केसांना रंग लावणार्‍यांची आणि हे सर्व न करणार्‍यांचीही वेगवेगळी मते असू शकतात. पण चर्चा चांगली होईल. एक मुद्दा असाही टाईपता टाईपता सुचला की वि. वा. शिरवाडकरांनी ‘कुसुमाग्रज’, राम गणेशांनी ‘गोविंदाग्रज’ अशी टोपणनावेच घेऊन काव्यनिर्मिती का केली असेल?

अत्रन्गि पाउस's picture

30 Jan 2015 - 3:07 pm | अत्रन्गि पाउस

मोठ्या विषयाला हात घातलास रे गजोधरा...ह्या विषयावर परिसंवाद व्हायला हवा असे परवाच आमचे हे म्हणत होते ...
माई मोड ऑफ

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 3:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

चांगला लेख आणि उत्तम विश्लेषण !

खरं तर, आंतरजालावर जोपर्यंत "संस्थळ प्रत्येक सभासदाला विश्वासू सचित्र ओळखपत्र (उदा. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, इ) दाखवून त्यावरचेच नाव आयडी म्हणून घेण्याची सक्ती करत नाही" तोपर्यंत स्वतःची प्रत्यक्ष खात्रीची ओळख नसलेल्या सर्व सभासद व्यक्ती (व्यक्तीचे खरे असलेले नाव या अर्थाने) आयडी की (व्यक्तीचे खरे नसलेले नाव या अर्थाने) डूआयडी आहेत, हा केवळ पुस्तकी प्रश्न राहणार आहे.

आंतरजालासारख्या खुल्या माध्यमावर जर कोणी सुरक्षा, अनामिकता किंवा इतर कोणत्या कारणाने स्वतःचे खाजगी अस्तित्व गुप्त ठेवू इच्छित असेल तर ते सावधगिरीचे आहेच आणि अवैध तर नक्कीच नाही.

बहुतेक सर्व संस्थळावर तरुण/वयस्क लोक वयस्क/तरूण नावे घेऊन आणि स्त्रिया/पुरुष पुरुष/स्त्रियांची नावे घेऊन वावरत असल्याचे दावे/संशय सतत व्यक्त होत असतात. गमतीने असो की इतर काही कारणाने पण तशी नावे घेणे कायदेशीर आहे या वस्तुस्थितीला कोणीही नाकारू शकत नाही.

याशिवाय, सर्वसामान्यपणे पटणारे नाव घेतले म्हणून ती आयडी लगेच विश्वासू कशी काय बनते बुवा ?... असे समजणाराच 'बनत' नाही याची काय शाश्वती आहे ?! :) म्हणजे उद्या मी इस्पीकचा एक्का (जे माझ्या पासपोर्टवरचे नाव नाही) ही आयडी सोडून श्रीकांत मुंबईकर (हे सुद्धा माझ्या पासपोर्टवरचे नाव नाही) अशी आयडी घेतली की नविन आयडी आणि तिचे लेखन लगेच ताबडतोप जास्त अ/विश्वासू होणार की काय ?!!! *ROFL*

असे असेल तर टोपणनावाने प्रसिद्ध असलेले सर्व भूत/वर्तमान कवी आणि लेखक अविश्वासू/भ्याड/अजून काही म्हणायचे की काय ? आणि मग सर्व बँकांनी सगळ्या ग्राहकांना त्यांचे खरे नाव हाच त्यांचा यूजर आयडी असावी अशी जबरदस्ती करायला हवी, नाही का ? :)

आंतरजालाच्या मूलभूत व्यवहारपद्धतीमुळे, टोपणनाव वापरल्याने, त्यावरचे लेखन व विचार व्यक्तीकेंद्रित न राहता मजकूर(मुद्दा)केंद्रित असतात... म्हणजेच, कोणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे याला जास्त महत्त्व येते. यामुळे एका अर्थाने आंतरजाल मानवी मनात येणार्‍या पूर्वग्रहांना (उदा. लिहिणार्‍याचा देश, धर्म, जात, लिंग, राजकीय पार्श्वभूमी, रंग, जवळीक, इ इ इ ना) अडवणारी चाळणी बनून केवळ लिखाणातील मुद्द्यांवर नजर केंद्रित करायला मदत करते. हा आंतरजालाचा एक फार मोठा गूण आणि मोठी ताकद आहे.

अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत "काय लिहिले आहे" यापेक्षा "कोणी लिहिले आहे" हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यावर ज्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते, त्यांना आंतरजालावरची सर्वच आभासी असणारी / वाटणारी नावे अडचणीची वाटणारच... तोही एक मानवी स्वभावच आहे, नाही का ? :)

अर्थातच, ज्यांच्या मानसिकतेत "काय लिहिले आहे" यापेक्षा "कोणी लिहिले आहे" हे जास्त महत्त्वाचे आहे आणि त्यावर ज्यांची प्रतिक्रिया अवलंबून असते, त्यांना आंतरजालावरची सर्वच आभासी असणारी / वाटणारी नावे अडचणीची वाटणारच...

आंगाश्शी!!!! मिपावर या बाबतीत तारे तोडणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यांची वृत्ती नेमकेपणी अधोरेखित केल्याबद्दल धन्यवाद.

नाखु's picture

31 Jan 2015 - 9:01 am | नाखु

चार पैसे..

आंतरजालाच्या मूलभूत व्यवहारपद्धतीमुळे, टोपणनाव वापरल्याने, त्यावरचे लेखन व विचार व्यक्तीकेंद्रित न राहता मजकूर(मुद्दा)केंद्रित असतात... म्हणजेच, कोणी लिहिले आहे यापेक्षा काय लिहिले आहे याला जास्त महत्त्व येते. यामुळे एका अर्थाने आंतरजाल मानवी मनात येणार्‍या पूर्वग्रहांना (उदा. लिहिणार्‍याचा देश, धर्म, जात, लिंग, राजकीय पार्श्वभूमी, रंग, जवळीक, इ इ इ ना)

मुळात समक्ष चर्चेत्-वाद्-विवादातही धर्म, जात, लिंग, राजकीय पार्श्वभूमी अध्यारुत्/काही ठोकताळे मनात ठेवूनच प्रतिक्रिया दिल्या जातात.
मिपावरच काही व्यावसायिकांना जणू ते त्या व्यवसायाचे "अधिकृत प्रतिनिधी" म्हणून्च आले आहेत असे समजून शेरे/टोमणे वाचले आहेत. तस्मात आपली ओळख गोपनीय ठेऊन "टोपण नाव" घेणे रास्तच आहे.

गुरुकूल-होस्टेल-शाळेपासून कॉलेजपर्यंत किमान ८-१० टोपणनावांनी ओळखला गेलेला
पण तरी मूळ प्रतिमा अबाधित राहिलेला नाखु

महेश अशोक खरे's picture

30 Jan 2015 - 6:19 pm | महेश अशोक खरे

श्री. इस्पिक एक्का यांच्या काही मुद्द्यांशी मी सहमत आहे. नावाला (विशेषतः आडनावाला) चिकटलेल्या जात / विचार / वर्ग यांच्या रंगांमुळे मांडत असलेल्या मद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे अनुभव (ब्राह्मण या तथाकथित उच्चवर्णीय जातीत जन्मल्याने व खरे हे आडणाव ऍफिडेविट करून बदलावे असे वाटत नसल्याने) येत असतात. लोकशाही हे उत्तम मूल्य आहे आणि भारतासारख्या देशात कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली जात नाही व जाऊही नये.
मात्र टोपणनावाने गोष्टी प्रसिद्ध केल्या की काहीही व्यक्त करता येते अशा अविर्भावाने काही जण वागतात असेही वाटते. अर्थात फारच चुकीच्या गोष्टी झाल्या तर त्यावर संपादक मंडळ योग्य ती कारवाई करत असेलच. टोपणनावाने लिहिण्याचा मला अनुभव नसल्याने तसे करण्याच्या मानसिकतेविषयी कुतुहल वाटले. ज्यांचा तो अनुभव आहे त्यांनी त्याविषयी लिहून आमच्या माहितीत भर घालावी. त्याच हेतूनी आधीच्या प्रतिक्रियेत शिरवाडकर, गडकरी यांची नावे घेतली होती. माझ्या आठवणीप्रमाणे प्रचंड वादळी व्यक्तिमत्त्व असलेले आचार्य अत्रेही केशवकुमार या टोपणनावाने कविता करत होते. अत्र्यांवर भ्याडपणाचा आरोप त्यांचे शत्रूही करू शकणार नाहीत. असो. त्यामुळे टोपणनाव घेणार्‍यांवर टीका करण्याचा कोणताही हेतू नाही एवढेच सांगू इच्छितो.

सुबोध खरे's picture

30 Jan 2015 - 7:29 pm | सुबोध खरे

आपल्या नावाला कोणते टोपण लावता येईल हे न समजल्याने खरे नावच लिहिणारा खरे.

सौंदाळा's picture

30 Jan 2015 - 7:40 pm | सौंदाळा

गगनविहारींचे गवि, मुक्तविहारींचे मुवि, चेतन सुभाष गुगळे चे चेसुगु झाले तसेच तुम्हीए सुबोध रे : सुख हे टोपणनाव घ्यावे एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो.

तिमा's picture

1 Feb 2015 - 5:08 pm | तिमा

महेश खरे यांनी मखरे हे टोपण नांव घ्यावे असा तिसरा शब्द जोडतो.

बॅटमॅन's picture

1 Feb 2015 - 6:08 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

त्याच धर्तीवर जे लोक महेश, सुबोध किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे खरे नाहीत त्यांनी "न-खरे" हा आयडी घ्यावा असे सुचवतो.

आनन्दिता's picture

2 Feb 2015 - 1:21 am | आनन्दिता

=))

बॅटमॅन's picture

2 Feb 2015 - 3:03 am | बॅटमॅन

ठ्ठो =))

क्लिंटन's picture

2 Feb 2015 - 12:03 pm | क्लिंटन

मी खरे असूनही टोपणनाव वापरतो. मग मी खरे की नखरे? :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2015 - 1:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरे खरे असुनही टोपणनावाचे नखरे करणारे खरे :)

अत्रुप्त आत्मा's picture

2 Feb 2015 - 3:34 pm | अत्रुप्त आत्मा

@ त्यांनी "न-खरे" हा आयडी घ्यावा>>> =)))))) ए.......ढिश्क्यांव!!! =)) ढिश्क्यांव!!! =)) ढिश्क्यांव!!! =))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 4:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खरे सांगु का आता? डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन लागणारेतं. =))

डॉक तुमच्या मागे बंदुक घेउन लागणारेतं.

ते 'शांतपणे' सांगतात, दोन्त योउ क्नोव चिमणराव? ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 11:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

हओ वुद आय नो सुदकाका? नो वन तोल्द मी सो!!

हाडक्या's picture

3 Feb 2015 - 1:52 am | हाडक्या

ह्या ह्या ह्या...
अरे ये पीएस्स्पीओ नै जानता..!!

क्लिंटन's picture

31 Jan 2015 - 2:46 pm | क्लिंटन

आपल्या नावाला कोणते टोपण लावता येईल हे न समजल्याने खरे नावच लिहिणारा खरे.

आणि मी म्हणजे खरे नाव वापरावे की नाही हे न समल्यामुळे टोपण नाव वापरणारा खरे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 2:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरेपणाची हद्द झाली +D

क्लिंटन's picture

31 Jan 2015 - 2:54 pm | क्लिंटन

:) आवडले.

हे बाकी अगदी खरे आहे हो!

अत्रुप्त आत्मा's picture

1 Feb 2015 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा

@खरेपणाची हद्द झाली >> =)) खरे'च झाली! =))

सुबोध खरे's picture

30 Jan 2015 - 7:41 pm | सुबोध खरे

सुख के सब साथी
दुख मी न कोई

अनन्त अवधुत's picture

31 Jan 2015 - 12:19 am | अनन्त अवधुत

बरे झाले तुमचे नाव दुष्यंत नाही. उगाच आम्ही एका चांगल्या मिपाकराला मुकलो असतो.

स्थितप्रज्ञ म्हैस's picture

30 Jan 2015 - 10:02 pm | स्थितप्रज्ञ म्हैस

मलापण टोपणनावाने लिहायला अजाबात आवडत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jan 2015 - 11:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

खरं आहे. परवा रावडी रेडा भेटला होता तेव्हा त्याने हे सांगितले होते ;) +D

अजया's picture

31 Jan 2015 - 9:52 am | अजया

=))

सुबोध खरे's picture

31 Jan 2015 - 10:05 am | सुबोध खरे

एक्का साहेब
तुम्ही म्हणजे हसत हसत एखाद्याच्या चड्डीला हात घालता.

अस्वस्थामा's picture

31 Jan 2015 - 7:39 pm | अस्वस्थामा

हसत हसत एखाद्याच्या चड्डीला हात घालता.

नक्की कोण हसत असतं हो खरे साहेब.. नै म्ह्ंजे घोटाळा व्हायचा... ;)

बॅटमॅन's picture

31 Jan 2015 - 12:50 pm | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

एकसारख्या नावांमुळेही प्रश्न उद्भवू शकतात. कित्येक देशपांडे, कुलकर्णी, जाधव, पाटील यांची अजय, विजय, संजय, स्वाती, स्मिता, वैशाली अशी नावे असल्यास वेगळे नाव घेणे अपरिहार्य ठरते. मिपावरच स्वातीदिनेश, स्वातीराजेश, स्वातीमहेश, स्वाती२ असे आयडीज आहेत.
प. ग., माहिती मनोरंजक वाटली.

संचित's picture

30 Jan 2015 - 11:26 pm | संचित

व. पु म्हणतात तस "आपल नाव म्हणजे आपण नसतो . बारश्याला नाव ठेवतात ते आपल्या शरीराच नाहीतर उल्हास नावाचा माणूस कायम टवटवीत दिसला असता."
शिवाय मिपावरील टोपण नावे फार interesting असतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 6:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचंड आवडतं वाक्य. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

इरसाल's picture

31 Jan 2015 - 3:33 pm | इरसाल

या आणी अशाच कारणाने वर्जिनल नाव न्हाई घेतलं....म्हटलं स्वभाव आहे तसं घेवु नाव ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Jan 2015 - 11:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आंतरजालासारख्या जगामधे मला तरी टोपणनावाच्या मास्कमागे लपायला आवडतं....तेवढाचं बसल्या जागी "व्हिजीलांते" असल्याचा थोडाफार आनंद मिळतो. आणि गुप्तता राखायच्या धोरणांबद्दल म्हणाल तर मी कोण आहे, काय करतो हे इथल्या ज्या लोकांवर माझा विश्वास आहे त्यांना माहित आहेचं.

(मुखवट्याआडच्या मुखवट्यामागचा) कॅप्टन जॅक स्पॅरो, राहणार "ब्लॅक पर्ल" टोर्टुगा.

आमचे आंजा नाव तरी आम्हाला सुट होते, असे भेटणारे म्हणतात.

(हे विश्र्वची माझे घर, असे म्हणणारा आणि तसाच वागणारा) मुवि.

बॅटमॅन's picture

31 Jan 2015 - 12:51 pm | बॅटमॅन

शेम हिअर.

-वाल्गुदाचार्य गौतमहळ्ळीकर.

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2015 - 8:47 am | कैलासवासी सोन्याबापु

टोपण नावाने जात/धर्म इत्यादी लपत असले तरी काही काही आयडी आपली मानसिक विकृती लपवायला ह्याचा गैरफायदा घेतात हा आत्ताच इथल्याच एका भक्तिरसा च्या धाग्या चा वानरविचका पाहुन काढलेला निष्कर्ष आहे माझा

+ १...

आणि अशाच लोकांना अवतार घ्यायला लागतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

या जगात हे होणारच.

या जगात १००% सफेद अथवा १००% काळे काहीच नाही... सगळा करड्या रंगाचा वर्णपट आहे... आपण शक्य तेव्ढे सफेदीच्या बाजूला राहायचे / निवडायचे / समर्थन द्यायचे इतकेच आपल्या हातात आहे.

: इस्पीकस्वामी एक्काचार्य

कैलासवासी सोन्याबापु's picture

31 Jan 2015 - 2:46 pm | कैलासवासी सोन्याबापु

मान्य!!!!

पगला गजोधर's picture

31 Jan 2015 - 3:31 pm | पगला गजोधर

ल. तों. मो. घा. ………. पण
काळा = दुष्ट, वाईट, पाशवी, तिरस्करणीय
सफेद = सुष्ट, चांगला, दैवी, स्पृहणीय
असा रंगविषयक पूर्वग्रह आपल्या लोकांमध्ये कसा रूढ झाला ?
(अती अवांतर (ह. घ्या.): पत्त्यांमध्ये इस्पिक काळा रंगाने दर्शिवितात नं ? )

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 7:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

पत्त्यांमध्ये इस्पिक काळा रंगाने दर्शिवितात नं ?

१. तोही चांगल्याने वाईटावर मात करण्यासाठी घेतलेला एक (टोपणनावाप्रमाणेच) बुरखा आहे. झोरो वगैरेचे पिक्चर बघितले नाहित का ?! :)

२. पांढर्‍या रंगाचे कपडे राजकारणात फार्फार आवडते आहेत हे ध्यानात असेलच ;)

(अवांतर : "दिसते तसे नसते..." या विषयावर एक लेख पाडण्याचे बरेच दिवस मनात आहे.)

मनोरंजक माहिती!स्त्रियांनी टोपणनावे घेण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा बरंच कमी आहे ही माहिती रोचक आहे!जालावर वावरताना मला व्यक्तिशः टोपणनाव बरे वाटते.बाकी इ ए काकांच्या प्रतिसादाशी सहमत!
रच्याकने- व्यवसायावर आधरित काय टोपणनाव घेऊ शकते मी(दंतोत्पाटिका?)या विचारात दंग टोपणनावधारी अजया ^_~

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 12:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

पेशंट कमी येतील ओ यायचे अश्यानी ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 12:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कमी होतील असे वाचावे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 2:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

इंग्लंडमधल्या तुमच्या एका व्यवसायबंधूंच्या चारचाकीवर "2THDOC" अशी नंबरप्लेट होती. :)

अजया's picture

31 Jan 2015 - 2:57 pm | अजया

:)

दंतोत्पाटिका

अग्ग्ग्ग्गगगगग =))

बाबा पाटील's picture

31 Jan 2015 - 12:58 pm | बाबा पाटील

माझ्या क्रिकेट टीम मधल्या डेंटिस्ट लोकांना आम्ही दातपाडे मंडळी असेच म्हणतो,आणी त्यातले दोघे साले खरच तसे आहेत्,साल्यांचा बाउंसार बर्‍याचदा बॅट्समनच्या थोबाडावर आदळतो, मागच्याच महिन्यात आमच्या एका फिजिशियनचे दोन दात अश्याच प्रकारे पाडले गेले होते.आणी त्याचा मारुतीराया करुन टाकला.

सुबोध खरे's picture

31 Jan 2015 - 6:13 pm | सुबोध खरे

बाबासाहेब
बी डी एस चा पूर्णावतार ( फुल फोर्म) "बत्तीस दातांचा सत्यानाश" असाच आहे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 6:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

टवाळ कार्टा's picture

31 Jan 2015 - 6:42 pm | टवाळ कार्टा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 7:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजया's picture

31 Jan 2015 - 7:34 pm | अजया

दोन डाॅक्टर(Myself Broken Bones and Spirit)वाले आणि दोन कम्पाऊंडर लईच हसताएत.यांच्या बत्तीस दातांचा सत्यानाश करायची इच्छा कशी पूर्ण करावी?
तिसरे स्वतःच बत्तिशी दाखवत आहेत.त्यांच्यापासूनच सुरुवात करते *aggressive*

आमच्या व्यवसायबंधुंकडे जायची वेळ तुमच्यावर येवो *biggrin*

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 8:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याच्यावरुन आठवण झाली, आमच्या एका डेंटीस्ट मैत्रिणीला आम्ही

"दातं कोरुन पोटं भरणारी" म्हणतो. त्यावर तिचं ठरलेलं उत्तर असतं "३२ च्या ३२ दात घशात घालेनं म्ह्णुन"

बाबा पाटील's picture

31 Jan 2015 - 7:02 pm | बाबा पाटील

*biggrin* :-D :D +D =D :biggrin:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2015 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटतं की टोपन नावाने लिहिणा-यांना वाटेल तसं लिहिता येतं आणि वावरता येतं. मी मागेही लिहिलं होतं की भविष्यात प्रत्येक आयडीला आधार कार्ड किंवा तत्सम ओळख पत्र असल्याशिवाय जालावर वावरता येणार नाही असा नियम केला तर काय होईल ? आपण समाजात वावरतो तेव्हा आपली ओळख असते आणि ओळख असणा-यांना एक सामाजिक संकेत पाळावे लागतात. सामाजिक संकेत पाळले नाही की कायदेशीर कार्यवाहीला सामोरं जावं लागतं. सामाजिक संकेत पाळायचे नाहीत, आपण कोण आहोत लोकांना कळु द्यायचं नाही आणि अभिव्यक्त व्हायचं यासाठीही टोपन नावं लोक वापरत असावीत असे मला वाटते. मनात असलेली भिती जावी आणि ओळख व्यक्त न होता मनातल्या भावना व्यक्त करता याव्यात यासाठी अशा आयडींना कदाचित फायदाही होत असावा. पण, टोपन नावांनी वावरणारी लोक भित्रे असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे.

बाय द वे, मिपावर टोपन नावाने वावरणा-यांना वरीजनल आयडी देण्यात येईल अशी घोषणा केली तर किती लोक वरीजनल नाव देण्यात यावे असा आग्रह धरतील ? काही लोक मला वरीजनल नावाचा आयडी द्यावा असा आग्रह धरतील यावर माझा विश्वास आहे.

-दिलीप बिरुटे
(वरीजनल नावाने आ.जालावर वावरणारा)

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Jan 2015 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे काय ? साडेपाच तास झाले तरी अजून धूर पण नाही ???

(फूsss... फूsss... फूsss... ;) :) )

बॅटमॅन's picture

1 Feb 2015 - 1:11 am | बॅटमॅन

स्वतःच्या खर्‍या नावाने जालावर वावरणे म्हणजे मोठा तीर मारणे असा समज पाहून मजा आली. सामाजिक संकेतांच्या नावाखाली दडपशाही करणार्‍यांना टोपणनावे गैरसोयीची वाटणे अगदी साहजिक आहे. पण अशी विचारसरणी आता मागे पडते आहे हे बरेच आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला इतकं काय जिव्हारी लागलंय. तुम्ही राहु द्या की तुमचं टोपननाव.
उलट टोपननावाने खुप तीर मारता येतात हे मला चांगलं माहिती आहे.

मागे अशाच चर्चेत आम्हाला टोपननाव मिळालं नाही तर आम्ही जालावर वावरणं सोडून देऊ
असंही कोणी तरी म्हटल्याचं आठवतं, त्यात काही विशेष नाही.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 12:29 pm | टवाळ कार्टा

बॅट्याच्या प्रतिसादावर असले कोणीतरी लिहिणार असे वाटलेच होते पण त्याचा मुद्दा एका प्राध्यापकाला न समजलेला बघून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे काय ते...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 12:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिगत रोखाचं टोपन नावाने असं काहीही बरळता येतं हा एक नवा मुद्दा.
बाकी, काही शरम वगैरे काही वाटून नका घेऊ...

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 1:12 pm | टवाळ कार्टा

पण जे काही लिहिले आहे तेच बघायचे की...कोणी लिहिले आहे याला का महत्व द्यावे
आणि भारतासारख्या देशात जिथे RTI चा उपयोग करणार्यांचा खूनसुध्धा होतो तिथे स्वतःच्या नावाने सगळेच लिहिता येत नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 1:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयडी काय लिहिते ते महत्वाचेच आहे.

एखादा टोपननावाने लिहितो आणि नेहमी चांगलेच लिहितो त्यांच्याबद्दल सोडून देऊ. पण, टोपननावाने समजा तुम्ही मला कोणतंही भांडन झालेलं नसतांना '' मी तुला पाहुन घेईन, तुला अक्कल नाही, तुझा गळा दाबेन'' असं तुम्ही लिहु शकता. पण, तेच जर तुम्ही माझ्या परिचित आहात मी तुम्हाला ओळखतो की तुम्ही एका बीएसएनल कंपनीत नौकरी करता हे माझ्याबरोबर आपण सर्वांना माहित आहे, तर तुम्ही मला असं लिहु शकाल काय ? लिहु शकणार नाही. कारण आपण एक सामाजिक संकेत पाळतो. टोपननाव असतं तेव्हा असं काही विचार करायची गरज नसते, असे मला वाटतं. दिली ना शिवी आपलं काय होणार, एक तर प्रतिसाद अप्रकाशित होतील किंवा आयडीवर ब्यान येईल. मुळ आयडीने लिहाल आणि आंजावर तुम्हाला नियमित लिहायचंच असेल तेव्हा यासर्व गोष्टींचा विचार करावा लागेल असं मला वाटतं.

बाकी, राहीलं सुरक्षिततेचा प्रश्न. आपली खासगी माहिती आपण कितीतरी ठिकानी सार्वजनिक केलेली असते. नाव, पत्त्यासकट माहिती पुरवलेली असते. रेशन, गॅस, फोन, मोबाईल, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, इ.इ. तेव्हा आपले सरसकट खुन होतात का ? नाही.

टोपननावाने वावरतांना (लिहितांना) खुप सुरक्षित वाटतं आणि वरीजनल आयडींनी लिहिलं की जरा असुरक्षित वाटतं हा एक मुद्दा ग्रहित धरु तर टोपननावाने आंजावर वावरण्याचे फायदे तोटे तुम्ही अगदी मनमोकळेपणाने लिहाच. आणि उद्या संस्थळावर वावरतांना संस्थळचालकास आंजावर वावरणा-या सदस्यांना आपली सर्व माहिती यापुढे द्यावी लागेल असं शासनाने आदेश काढले तर टोपननावाने वावरणारे संस्थळावर वरीजनल आयडीनी वावरतील का ? जरा कळु द्या तुमची मतं ! ( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

जो पर्यंत संस्थळचालकाला दिलेल्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही याची खात्री आहे तोपर्यंत संस्थळचालकाना माहीती देण्यास काहीच हरकत नाही...पण लिहिताना स्वतःचे खरे नाव सगळ्यांना दिसते त्यामुळे समोरचा वाचणारा त्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही याची काहिच हमी नाही त्यामुळे तोटे होउन नंतर निस्तरण्यापेक्षा मुदलात तोटा होउ नये याची काळजी घ्यावीच...माहिती कधीही शेयर करता येते पण आधीच शेयर केलेली माहीती नंतर पुसता येत नाही

( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही)
मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम :)

बॅटमॅन's picture

1 Feb 2015 - 3:38 pm | बॅटमॅन

सोडा हो. सामाजिक संकेत इ. च्या नावाखाली हडेलहप्पीचे समर्थन करणार्‍यांना हे समजेल अशी आशा करणे व्यर्थ आहे.

तुम्ही राहु द्या की तुमचं टोपननाव.

ते माझं मी पाहीन हो. सेव्हॉयर काँप्लेक्स नका येऊ देऊ फुकटचा. :)

तदुपरि तीर मारणार्‍यांना मारू द्यावेत या मताचा मी आहे. चालूद्या तीरंदाजी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्च्यासारखे हजारो पाहिलेत जालावर मला कशाला कोम्लेक्स येतोय. दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...!

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 8:35 pm | टवाळ कार्टा

कश्याला उग्गीच वाद...गप्पा मारान्नू...हादाडी करवान्नू...कट्टानी लाईफ :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमचा अभ्यास कळलाय. प्लीज. तुम्ही कशाला वादात पडताय. :)
(तुम्हाला तर मला उपप्रतिसाद टाकायचंयही जिवावर येतं)

तुमचं वाचन किती, तुमचा अभ्यास किती
तुम्ही बोलता किती, तुम्ही लिहिता किती.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 9:31 pm | टवाळ कार्टा

माझा अभ्यास नक्कीच तुमच्यापेक्षा फार फार कमी आहे (किंबहूना बर्याच मिपाकरांपेक्षा फार फार कमी आहे) तरीसुध्धा माझे ४ पैसे...

आज्काल मिपावर वादावादी जास्तच जाणवायला लागली आहे असे वाटायला लागले आहे (जवळ जवळ दर दुसर्या धाग्यात) म्हणून माझा "कश्याला उग्गीच वाद...गप्पा मारान्नू...हादाडी करवान्नू...कट्टानी लाईफ" हा प्रतिसाद जास्त करून बॅट्यासाठी होता पण कदाचित तुम्ही जास्त मनावर घेतलात...असो

( व्यक्तिगत रोखाचं लिहायचं सोडून चर्चा करु, भांडन नाही) हे तुम्हीच लिहिलेले

आणि त्यावर मी लिहिलेले की

मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम

तरीसुध्धा तुम्ही

तुमचा अभ्यास कळलाय. प्लीज. तुम्ही कशाला वादात पडताय. Smile
(तुम्हाला तर मला उपप्रतिसाद टाकायचंयही जिवावर येतं)

तुमचं वाचन किती, तुमचा अभ्यास किती
तुम्ही बोलता किती, तुम्ही लिहिता किती.

हे लिहिलेत...यावर खालील पैकी जो अ‍ॅप्लिकेबल असेल तो प्रतिसाद वाचावा व दुसरा सोडून द्यावा

जर हे फक्त मी मनावर घेतो की नाही इतकेच चेक करण्यासाठी लिहिले असेल तर मी इतकेच म्हणेन की असे लिहिणारे तुम्ही मिपावर पहिलेच नाही आणि शेवटचे तर नक्कीच नाहीत...मैनू फर्क नै पैंदा :)

पण जर फक्त मला "गप्प बसा" असे सांगायला असे लिहिले असेल तर ... मी कधी बोलायचे आणि कधी बोलायचे हे मी ठरवतो...तुम्ही सुचना केलीत त्याबद्दल माझे काहीही म्हणणे नाही...भारतीय लोकशाहीचा १ नागरिक या नात्याने तो तुमचा हक्कच आहे...पण मी मिपापे अपुन कुच्चबी दिल पे नै लेता...बिन्दास लिख्खनेका मेरे सात बातां कर्ते टैम असे लिहिले असतानासुध्धा स्वतःहून टोमणा मारलात...उग्गीच??

यातला तुम्ही कोणता प्रतिसाद निवडलात ते इथेच धाग्यावर सांगा (व्यनी वगैरे छुपाछुपी नको) मग तुमच्या प्रतिसादावर उपप्रतिसाद द्यायचा की नाही...दिला तर कसा द्यायचा ते ठरवेन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी, तुमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचं अजिबात कारण नाही.
मी प्रतिसाद लिहितांना कोनालाच व्य.नि. फिनी करत नाही.
जे असतं ते शंभर टक्के धाग्यावर मग मान असो की अपमान.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 9:45 pm | टवाळ कार्टा

इतके टंकूनसुध्धा पहिला प्रतिसाद घेतलात की दुसरा ते लिहिलेच नाहीत...माझा अंदाज आहे की दुसरा पण म्हटले नक्की करून घेऊ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 9:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा पास.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 9:58 pm | टवाळ कार्टा

छान...आता कसे क्लियर केलेत...यापुढे मिपावर तुमच्या प्रतिसादांना उपप्रतिसाद देणार नाही असा शक्य तेव्हडा प्रयत्न करेन

यसवायजी's picture

1 Feb 2015 - 9:42 pm | यसवायजी

दम असेल तर वरीजनल नाव घेऊन वावरा...!
काय पण लॉजिक हाय? मान गए!! फ़क्त नावावरुन कुणाच्या xxमध्ये किती दम आहे ते ठरवता येते? .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाही, असं माझं मत आहे.
वाटल्यास तुम्हीही वरीजनल नावाने किती लिहिता येतं. आणि टोपननावाने किती आणि कसं लिहिता येतं ते नक्की पाहा.

-दिलीप बिरुटे

निनावी नावाने वाटेल ते लिहिता येतं. वरीजनल नावाने वाटेल तसं लिहिता येत नाही
याचा मला समजलेला अर्थ असाकी,वरीजनल नावामुळे लिहिण्यावर बंधने येतात. म्हणजेच एखादी व्यक्ति पुर्णपणे व्यक्त होऊ शकत नाही. (पोटात१ आणि ओठावर १ ऎसे)।
तुम्ही असे नसाल (नाहीच), पण मग अशा खऱ्या नावामुळे फ़ायदा काय? कुणाचा?
आणि तुमच्या दृष्टीने टोपण नावाचा तोटा काय? कुणासाठी?

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 9:49 pm | टवाळ कार्टा

ब्रोब्र ना..."काश्मिर भारताचे आहे हे" मिपावरच्या "श्रीगुर्जी" आयडीने लिहिणे आणि "माईसाहेब कुरुंदीकर" आयडीने लिहिणे...फरक आहे ना ;)

अवांतर - "श्रीगुर्जी" आणि "माईसाहेब कुरुंदीकर" ही नावे इथे फक्त उदाहरणे म्हणून लिहिलेली आहेत...त्या आयडींचा आणि या प्रतिसादांचा काहीही संबंध नाही :)

सुबोध खरे's picture

3 Feb 2015 - 1:32 pm | सुबोध खरे

@ टवाळ कार्टा
ओ त्या कुरुन्दिकर नसून कुरसुन्दीकर आहेत. त्यांच्या "ह्यांना"असे नाव वाकडे केलेले चालणार नाही.

हाडक्या's picture

3 Feb 2015 - 3:45 pm | हाडक्या

काय हो खरेकाका, माईंचे "हे" पण मग "शांतपणे" दंबूक घेऊन येतात का ? :))))

टवाळ कार्टा's picture

3 Feb 2015 - 3:47 pm | टवाळ कार्टा

आय माय स्वारी बर्का :)

बॅटमॅन's picture

1 Feb 2015 - 10:55 pm | बॅटमॅन

अरेरेरे...यत्ता चौथीतल्यासारखी च्यालेंज देता? फीलिंग ज्यामच नॉस्टॅल्जिक.

वाढदिवसाच्या कचकून शुभेच्छा बरं का प्राडॉ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2015 - 11:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फीलिंग नॉस्टॅल्जिक असु द्या. प्रयोग आपल्यावर करायला काय हरकत आहे ? प्रयोगासाठी आपण योग्य आयडी आहात असे मला वाटते. आपल्या प्रतिसादातला मोकळे ढाकळेपणा वरिजनल आयडीने दिसतो का ? आव्हान स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं !

बाकी, बड्डेच्या माझ्याही तुम्हाला शुभेच्छा आहेतच... :)

-दिलीप बिरुटे

या गोष्टी तुम्हांला या जन्मी कळणे नाही हे बाकी कळून चुकलंय आता. तस्मात वाढदिवसाच्या शुभेच्छा! शान्ति:पुष्टिस्तुष्टिश्चास्तु!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2015 - 1:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समजायला माणसाला अनेक जन्म लागतील,मलाही तुमच्या न कळल्या गोष्टी समजायला आणखी एखादा जन्म लागू शकतो हे मला मान्य. पण माझा मुद्दा असा आहे की वरिजनल आयडीने लिहितांना तुमच्यात किती फरक पडतो, किती परिणाम करते मुळ ओळख...ओळख लपविण्याचं खरं कारण काय असू शकेल असं मला तुमच्या निमित्तानं समजुन घ्यावं वाटत आहे, बघा कसं जमतं ते मी फार मागे तर तुमच्या लागू शकत नाही ना, नै का !

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

2 Feb 2015 - 2:37 pm | बॅटमॅन

जे लोक विचारांपेक्षा व्यक्तीला महत्त्व देतात त्यांनाच खर्‍या ओळखीचे अप्रूप आहे, बाकीच्यांना नाही.

उलट अनामिक व्यक्तींच्या विचारांना काहीही महत्व नसतं. (असे अनामिक विचार वाट्सपवर फिरत असतात, क्षणभर वाचतो आणि आपण ते विसरुन जातो) माणुस आणि त्यांचा विचार एकमेकांशी जोड्ला गेलेला असतो त्या त्या व्यक्तीच्या विचारांना महत्व असतं. ”महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला आणि त्यांनी कोणतेही प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसात्मक मार्गाचा विचार मांडला. अल्बर्ट आइंस्टीन हे भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांनी सापेक्षातावादाचा सिद्धांत मांडला. कोणतंही शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाई चौधरी यांची कविता आयुष्यात येणा-या उत्तम अनुभवांची कविता असते. म.फुल्यांनी बहुजन समाजाला शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. वरील सर्व उदाहरणावरुन प्रत्येक व्यक्ती आणि त्यांचा विचार आयुष्यभर त्यांच्याशी निगडीत राहीला. म.गांधी, अल्बर्ट आइंस्टीन, बहिणाबाई, म.फुले यांनी वास्तविक जीवनात आणि खासगी जीवनात जे केलं असेल ते आपल्या समोर आलं म्हणुन आपण सर्वांना व्यक्ती विचाराचं महत्व पटतं. व्यक्ती आणि त्याचा विचार हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षही सारखाच वाटला पाहिजे, असे मला वाटतं.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

2 Feb 2015 - 6:04 pm | बॅटमॅन

"गुणा: पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः" हे विसरलात की काय हो? महात्मा फुलेंचं आडनाव फुले नसतं तर तुम्हांला काय फरक पडला असता? फुले हे नाव महत्त्वाचं की त्यांचे विचार?

मुसलमान नाव दिसले की त्याकडून राष्ट्रभक्ती, उच्चवर्णीय नाव दिसले की प्रो-दलित दृष्टिकोन आणि पुरुषाचे नाव दिसले की स्त्रीप्रधानता वदवून घेऊ पाहणारी मनोवृत्ती अशातूनच तयार होते. अशी उदाहरणे मआंजावर कैक पाहिली आहेत. कर्त्याऐवजी कर्म महत्त्वाचं वाटत नसेल तर उद्या गुन्हेगाराचीही जातपात पहावयास कमी करणार नाही तुम्ही. :)

संदीप डांगे's picture

2 Feb 2015 - 6:15 pm | संदीप डांगे

डॉक्टरसाहेब, तुमचा युक्तिवाद वरकरणी पटत असला तरी काही प्रश्न उभे राहतात.

१. विचार ह्याची नक्की काय व्याख्या असावी? म्हणजे एखादा कुजकट टोमणा हा काही विचार होऊ शकत नाही. तसेच एखादा विचार स्वतः आचरणात आणला तरच त्याचे महत्व प्रस्थापित होते काय? एखादी कल्पना किंवा विचार स्वबळावर उभी राहू शकत नाही का? आता योग्य ते उदाहरण आठवत नाही पण कदाचित याचा इतिहासात काही पुरावा असेल.

२. भूमिकांची अदलाबदल केली तर विचारांचे महत्व कमी होते काय? म्हणजे सुभाषबाबूंनी सत्य अहिंसा यावर व्याख्यान दिले तर ते त्यांच्या एकंदर आयुष्याशी सुसंगत नाही म्हणून नक्की कुणाचे अवमुल्यन होईल? सुभाषबाबूंचे कि अहिंसेचे? विचारांवर कुणाची मालकी असते काय?

३. टोपणनाव घेतल्याने दमन न होता मोकळेपणाने प्रदर्शित होता येते हा बॅट्मॅन यांनी मांडलेला विचार अर्धवट वाटत आहे. माझ्या मते गर्दीमागे दडून "मारो इसको" असा तोंड लपवून ओरडणारा गर्दीचा पुढारी नसतोच आणि त्याची पुढे येउन झाल्या किंवा होणाऱ्या प्रकाराची जबाबदारी घेण्याची धमक नसते. टोपणनाव घेऊन कुणी कुजकट टोमणे आणि निरर्थक वाद घालत असेल तर त्याला स्वातंत्र्याचा उपमर्दच म्हणावा लागेल. टोपणनाव घेणाऱ्याला उत्तरदायित्व घ्यायची भीती वाटते का?

४. माझा चौथा प्रश्न बॅट्मॅन यांना आहे. टोपणनाव घेतल्याने अभिव्यक्तीमध्ये खुलेपणा नेमका कसा येतो आणि खरे नाव वापरून त्याची गळचेपी कशी होते हे जर सोदाहरण सांगता आले तर तुमचे मत समजायला बरे पडेल.

चाललेल्या चर्चेवरून मला वरचे मुद्दे सुचले. आता माझे व्यक्तिगत मत.

आज मी जळी, स्थळी खऱ्या नावानेच वावरतो, भविष्यात पण तसेच करेन. मला कुठेही कसल्याच बाबतीत अभिव्यक्त होण्याची भीती वाटत नाही. मी चुकीचा असेल तर योग्य व्यक्ती मला बरोबर काय ते सांगेलच. व्यक्त झाल्याशिवाय माझे विचार चुकीचे का बरोबर हे कळणारच नाही. कुठलाही मान-अपमान-टोचणी लावून घेत नाही. त्यासाठी टोपणनाव घेण्याची जरूर वाटत नाही. गम्मत म्हणून किंवा जसे वर एकेठिकाणी सांगितल्याप्रमाणे एकसारखी खूप नावं असली तर टोपण नाव गरजेचे असू शकते. पण ओळख लपवणे चुकीचे वाटते.

सतत विनोदी लिहिणाऱ्याने पोटतिडकीने काही गंभीर लिहिले तर आणि सतत गंभीर व वैचारिक लिहिणाऱ्याने निखळ विनोदी टिप्पणी केली तर लोक बावरतात हेही खरेच. लोक नावाला प्रस्तुत अनुभवावरून व्यक्तिमत्व चिकटवतात असा अनुभव आहे.

आंतरजालावरील विचारांवरून खऱ्या वैयक्तिक आयुष्यात व्यक्तीवर विशिष्ट लेबल लावून व्यवहार होत असेल तर ते चुकीचेच आहे. हे टाळण्यासाठी टोपणनाव वापरत असावेत. तेंव्हा अजून एक प्रश्न उभा राहतो कि असे टोपणनाव घेऊन विचार मांडणाऱ्या व्यक्तीची विश्वासार्हता किती? खूप गोंधळ होतोय यार… उत्तर द्या कुणीतरी… कुठल्याही नावानी द्या पण उत्तर महत्वाचे … बघा परत गोंधळ...

आंतरजालावर टोपणनावाने वावरले तर फालतूचा त्रास होत नाही हा फायदा आहे. व्हायचा तो होतोच काही वेळेस पण जनरली कमी. ते फीचर कुणी ट्रोलिंगसाठी वापरत असेल तर तो दोष त्या ट्रोल माणसाचा आहे, त्या फीचरचा नाही. मआंजावर उदाहरणे पाहिली आहेत याची. खर्‍या नावाने लिहिणार्‍यांना मुद्दाम जातधर्मविषयक खोचक प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत. असला फालतूपणा नको असेल तर पाहिजे कशाला कटकट? असा विचार करून जर टोपणनाव घेतले तर ते घेणारी व्यक्ती भ्याड आहे असा समज करून घेणे ही त्या समज करून घेणार्‍याची वैचारिक पातळी दर्शवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2015 - 6:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपली वैचारिक पातळी फार उंचीची आहे, हेही मला मान्य आहे. एवढ्या प्रतिसादात मला हा एक चांगला मुद्दा वाटला की फ़ालतूपणाचा त्रास होत नाही. अगदी मान्य आहे हा मुद्दा. मुळात समोरच्याने टोपननावाला थेट शिवी दिली तर ती मुळ आयडीला ती तितकी लागत नाही. टोपननावाने वावरण्याला एकाच्या बदल्यात दोन शिव्या देता येतात हाही एक फ़ायदा असतो. मुळ आयडीवर त्याचं कोणतंही ओझं येत नाही, हा फ़ायदा. एक दिली तर दोन देता येतात. मुळ आयडीला तसं करता येत नाही.

टोपननाव घेणारी व्यक्ति भ्याड असतात असं मी तरी म्हटलेलं नाही ती लोक भित्री असतात असं मी म्हटलं आहे, माझं मत चुक असेलही (ती भित्री नसतात हे सीद्ध झालं तर मला आनंदच वाटेल) भित्री यासाठी म्हणतो की आपली ओळख जालावर सिद्ध झाली तर उगं कटकटी नको असा एक विचार असतो त्यांची भीती साधार असेल पण मी म्हणतोय उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील आज वास्तव समाजात वावरताना जे अनुभव येतील तेच इथे येतील आशाही भागाचा विचार व्हावा.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

2 Feb 2015 - 6:53 pm | बॅटमॅन

उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील आज वास्तव समाजात वावरताना जे अनुभव येतील तेच इथे येतील आशाही भागाचा विचार व्हावा.

जर समजा खर्‍या नावाची सक्ती केली तर लिहिण्याच्या पद्धती बदलतील का? बहुधा हो.

त्यामुळे लोक अनेक गोष्टी लिहिताना बिचकतील. समाजात अनेक अप्रिय अनुभवही येत असतात. खरे नाव दिले तर तेवढ्यावरून लोक सुतावरून स्वर्ग गाठतील. आत्ताही गळ टाकणार्‍यांची संख्या कमी नाही, तेव्हा तर अजूनच त्रास होण्याची शक्यता आहे.

संदीप डांगे's picture

2 Feb 2015 - 7:23 pm | संदीप डांगे

खर्‍या नावाने लिहिणार्‍यांना मुद्दाम जातधर्मविषयक खोचक प्रश्न विचारले गेलेले पाहिले आहेत. असला फालतूपणा नको असेल तर पाहिजे कशाला कटकट?

ओके. गॉट इट.

असा विचार करून जर टोपणनाव घेतले तर ते घेणारी व्यक्ती भ्याड आहे असा समज करून घेणे ही त्या समज करून घेणार्‍याची वैचारिक पातळी दर्शवते.

भ्याडपणाचा अर्थ समजला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2015 - 6:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डांगे साहेब, प्रतिसाद आवडला. प्रतिसादातला मनमोकळेपणाने भावला. चर्चेतल्या मुद्द्यांवर अजुन लिहितो. तो पर्यन्त केवळ पोच.

-दिलीप बिरुटे

पगला गजोधर's picture

2 Feb 2015 - 7:34 pm | पगला गजोधर

What's in a name? that which we call a rose,
By any other name would smell as sweet;
नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो,
तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले, तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार.
--- रोमिओ जुलीएट

स्थितप्रज्ञ म्हैस's picture

1 Feb 2015 - 10:45 am | स्थितप्रज्ञ म्हैस

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे...हाय् कंबख्त, तुने कभी पिही नहीं।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Feb 2015 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही अन्य ठिकाणी काफी तराट होके 'पी' ली है.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

1 Feb 2015 - 12:29 pm | टवाळ कार्टा

ऐसाईच्च बोल्ता

सस्नेह's picture

2 Feb 2015 - 11:31 am | सस्नेह

म्हंजे म्हशीपण पितात ? *wacko*

खेडूत's picture

2 Feb 2015 - 7:17 pm | खेडूत

नव्हे नव्हे -
ते नाव घेणारा आयडी ज्याचा आहे, तो/ ती व्यक्ती मद्य पिणारा असतो/ असू शकतो/ शकते . . !

खरे नाव वापरण्याचे फायदे मला दिसले नाहीत. काही फायदे आहेत काय? डोक्याला त्रास व्हायचे चांसेस नक्की आहेत.

होकाका's picture

1 Feb 2015 - 11:12 pm | होकाका

या धाग्याचा टिआरपी चांगला असेल असं दिसतंय म्हणून ही लि़ङ्क टाकत आहे. जरूर बघा:

आजसे कोइ अपने नाम से नही जाना जाएगा....

व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी!!!

मी आधी माझ्या व्हर्जिनल नावाने लिहीत असे. नंतर मोबिल्यावरुन लॉगिन करताना नाव आडनाव टाईपण्यात आणि लॉगिन करण्यात प्रचंड वैताग यायचा. दरम्यानच्या काळात एफेम वर सूड नावाचं एक पात्र विनोद सांगायला यायचं, माझ्या नावाचा तो शॉर्टफॉर्म करुन हापिसात पार म्यानेजरपासनं सगळी लोकं सूड हाक मारायला लागली. मग तोच मिपा आयडी झाला. आता मराठीतला अर्थही सार्थ करतो बर्‍याचदा!! ;)

काळा पहाड's picture

2 Feb 2015 - 8:03 pm | काळा पहाड

उद्या जर कंपलसरी वरीजनल आयडीने लिहायची सक्ती केली

डॉक, जरा या गोष्टीतली अंदरकी बात सांगतो. आंतरजाल ज्या समाजाने पॉप्युलर केलं* त्यांचं मत हे वरीजीनल आयडीजची सक्ती होवू नये असंच होतं. किंबहुना त्याचमुळे ही टेक्नॉलॉजी मासेस ला द्यायला त्यांचा विरोध होता. फेसबूक आणि व्हाट्सएप नंतर कुठलाही सोम्या-गोम्या-दादा-भाऊ ब्राऊझिंग करून स्वतःचं मत द्यायला लागला. त्यांची कल्पना होती की बाहेर जसे आपले भाट आहेत तसे इथेही असतील. जशी उलट उत्तरं यायला लागली तसं त्यांचं डोकं भडकायला लागलं. पण काय करता येईना. तेव्हा ही जी वरीजीनल आयडीने लिहायची सक्ती आहे ती या सोम्या-गोम्या-दादा-भाऊ पैकी जे राजकारणी होते त्यांची आहे. अर्थातच, त्यांना किती महत्व द्यायचं हे तुम्ही जाणताच.

जोक्स अपार्ट, इंटर्नेट वर अ‍ॅनोनिमिटी (अनोळखीपणा) हा महत्वाचा गुण आहे, नव्हे तो त्याचा एकमेव गुण आहे. जर तो काढून घ्यायचा राजकारण्यांनी प्रयत्न केला तर त्यांचा 'कच्चा चिट्ठा' काढून तो वेशीवर टांगायला फारसा अवघड नाही.

* म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या सुद्धा पहिले या क्षेत्रात काम करत होते आणि सी मध्ये कोडींग करायचे, जीमेल नंतर आले ते एएसपी-जेएसपी डेव्हलपर्स आणि फेस्बूक नंतर आले ते सॉफ्टवेअर कुलीज.. ही नवी वर्णव्यवस्था आहे. कुलीज ना लवकरात लवकर प्रोजेक्ट म्यानेजर व्हायचं असतं कारण "टेस्टींग म्हणजे टू मच डोक्याला त्रास" असं त्यांचं मत आहे.

म्हणजे टेकीजनी, जे जीमेलच्या सुद्धा पहिले या क्षेत्रात काम करत होते आणि सी मध्ये कोडींग करायचे, जीमेल नंतर आले ते एएसपी-जेएसपी डेव्हलपर्स आणि फेस्बूक नंतर आले ते सॉफ्टवेअर कुलीज.. ही नवी वर्णव्यवस्था आहे. कुलीज ना लवकरात लवकर प्रोजेक्ट म्यानेजर व्हायचं असतं कारण "टेस्टींग म्हणजे टू मच डोक्याला त्रास" असं त्यांचं मत आहे.

हा हा हा..
ह्याच्यावर काकू टाका भौ. मग बोलू..

थोडक्यात सांगायचे तर आयटी एक हत्ती आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या समोर जे येते त्यावरुन स्वतःची मते तयार करतो, मांडतो. मला भारतातल्या या क्षेत्रातल्या RnD ची खूपच कमी माहिती आहे पण जेवढे माहीत आहे त्यानुसार या क्षेत्रात भारतात काही दर्जेदार तयार होत नाही बहुतेक.
त्याला कारणपण हा असला (आयटी म्हणजे हमाल आणि लवकरात लवकर मुकादम बनावे आणि आराम करावा) दृष्टीकोन ठेवणारे असू शकतात.

माझीही शॅम्पेन's picture

2 Feb 2015 - 11:37 pm | माझीही शॅम्पेन

टोपण नावाने लिहिणे किंवा न लिहिणे हा ज्याचा त्याचा व्ययक्तित मत आहे , त्या वरून हमारी तुमरी येण हे काही योग्य लक्षण नाही. ज्याला ज्या प्रकारे योग्य वाटत त्या प्रमाणे त्यांनी मोकळ व्हाव :)
तसेच ज्या प्रकारे टोपण नाव घेतात त्या प्रकारे लोक त्या प्रकारे लोक प्रतिक्रिया देतात , मला बरेच वेळा माझ्या विचित्र नाव मुळे गमतीदार प्रतिक्रिया येतात , पण उंदीर नाव घेतलेल्या टोपण नावाला लोक कदाचीत सिंहा प्रमाणे ट्रीटमेंट देणार नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे , त्यामुळे मी सुध्धा हलकेच घेतो
मात्र कोणी टोपण नावमागे असलेली खरी ओळख जर सातत्याने लपवत असेल तर ते योग्य नाही

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Feb 2015 - 11:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत.

मुक्त विहारि's picture

3 Feb 2015 - 12:35 am | मुक्त विहारि

लपता लपत नाही...

संदीप डांगे's picture

3 Feb 2015 - 12:55 am | संदीप डांगे

१००% सहमत...

कवितानागेश's picture

3 Feb 2015 - 12:04 pm | कवितानागेश

येथे मान्यवरान्नी क्रुपया कुसुमाग्रज, गोविन्दाग्रज, आरती प्रभू वगरै विशयान्वर मत मान्डावे. :)

स्पा's picture

3 Feb 2015 - 12:08 pm | स्पा

fgf

बॅटमॅन's picture

3 Feb 2015 - 12:32 pm | बॅटमॅन

हल्कट =))

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2015 - 2:44 am | पिवळा डांबिस

समर्पक प्रतिसाद!
:)

प्रभाकर पेठकर's picture

3 Feb 2015 - 1:10 pm | प्रभाकर पेठकर

रोजच्या व्यवहारात, समाजात वावरताना कांही व्यक्तीविषयक वाईट अनुभव, राग, संताप येतो पण व्यक्त करता येत नाही. त्यामुळे हा 'कचरा' मनांत साठून राहून त्याचे दुष्परिणाम (स्वभावात नकारात्मक बदल) भोगावे लागू नये म्हणून पूर्वी होळी, शिमगा अशा सणांना एखाद्याच्या नांवाने 'बोंब' मारण्याची मुभा ठेवली आहे. त्यामुळे ह्या साठलेल्या 'कचर्‍याचा' निचरा होऊन मन पुन्हा शांत होतं. आपल्या स्वभावात नकारात्मतेचा शिरकाव होत नाही.

पूर्वी कवी, लेखकांनी आपले नांव लांबलचक किंवा कांही कारणाने आपल्या लेखनाला साजेसे न वाटल्याने टोपणनांवे घेतली. पण त्यांनी त्या टोपण नांवांच्या आडून इतरांवर अवमानकारक लेखन नाही केले. संस्थळांचा सुकाळ झाल्यानंतर प्रत्येकाला टोपणनांवाचा मोह होऊ लागला. तसेच 'टोपणनांवांच्या' आडून समोरच्यावर अकारण वार करण्याची वृत्ती वाढीस लागली. 'माझा वार कसा जिव्हारी लागला आणि तो कसा तडफडतो आहे' ह्या असुरी विचारात आनंद शोधणार्‍यांची संख्या वाढीस लागली. टोपणनांवाने लिखाण करण्यात कांही गैर नाही. पण टोपणनांवाच्या आडून कोणीच कोणावरही असभ्य आणि समक्ष भेटीत वापरली जाणार नाही अशी भाषा वापरू नये. स्वतःच्या मूळ नांवाने किंवा टोपणनांवाने लिहिताना कुणाही सदस्याने सभ्यतेची मर्यादा सोडू नये. तेव्हढे ताळतंत्र बाळगले तरी पुरेसे ठरेल.

मी माझ्या मुळ नांवाने सर्वत्र वावरतो. मला कधी कुठल्या समस्येला तोंड द्यावे लागले नाही.