दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे.
त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले.
कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते.
भाजपचा पूर्ण नि:पात झाला. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार सुद्धा निवडणूक हरला.
याची कारणे काय याची चर्चा होईल.
मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
पुढेमागे राज ठाकरे बाउन्स ब्याक करुन भरघोस यश नक्की मिळवतील. पण सध्यातरी मनसे ची अवस्था फार काही बोलावे अशी नाही. पण दिल्ली निवडणूक ही मनसे साठी एक उत्तम वस्तुपाठ ठरावा अशीच आहे. कोणतेही पाठबळ नसताना निश्चित अजेंडा आणि कार्यकर्त्यांची जोड यामुळे केजरीवाल निवडून आले.
मनसे ची बहुचर्चीत ब्ल्यू प्रिंट कुठे वाहून गेली हे त्यानाही समजले नाही.
रामनसे ने त्यांचा पक्ष नक्की काय करणार आहे. कशावर लक्ष्य केम्द्रीत करणार आहे आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा कसा होणार आहे यावर भर द्यावा म्हणजे मनसे महाराष्ट्रात पुन्हा तळपू शकेल. सध्यातरी त्यांचा आवाज कुठेच ऐकु येत नाहिय्ये.
पक्ष आह एकी विसर्जीत झाला हेच कळत नाही
केजरीवाल / राज ठाकरे
गाभा:
प्रतिक्रिया
10 Feb 2015 - 1:30 pm | पदम
+१०० सहमत.
10 Feb 2015 - 1:37 pm | गणेशा
तळागाळातुन आलेले आणि लोकांसाठी लोकांच्यात राहुन काम करणारे लोक जोपर्यंत महाराष्ट्रात पुढे येत नाहित तोपर्यंत मनसेच काय कुठला ही नविन पक्ष महराष्ट्रात उभारी घेवु शकत नाही.
आप ही महाराष्ट्रात जास्त चालणार नाही. कारण स्वच्छ प्रतिमा असली तरीही लोकांपर्यंत त्यांचे कार्य येथे त्यांचे नाही. जे दिल्लीत केजरीवाल यांचे गेल्या १० वर्षांपासुन आहे.
राज ठाकरे अभ्यासु नेते आहेत, परंतु लोकनेता असावा असा कुठलाही नेता सध्या मनसे कडे नाही.
मास लिडर ठरावेत असे लोकनेत्यांची गरज येथे सर्व पक्षांना आहे
10 Feb 2015 - 1:41 pm | ऋषिकेश
मुळात महाराष्ट्र हे बर्यापैकी संपन्न व व्यापारी मानसिकता असलेले राज्य आहे. तिथे तळागाळातील जनतेसाठी लढतोय असे म्हणणारा पक्ष एका मर्यादेहून अधिक यशस्वी होऊ शकत नाही.
संपन्नतेसोबत आलेल्या प्रश्नांना जो सोडवण्याची ग्वाही देईल तो जिंकेल असे वाटते.
आआप हा अनेक नव्या पक्षांसाठी अभ्यासाचा विषय हवा याब्द्दल +१
10 Feb 2015 - 3:23 pm | गणेशा
मुंबई पुणे नागपुर कोल्हापुर नाशिक अशी काही शहरे सोडली तर खरेच व्यापारी मानसिकता आहे का महराष्ट्राची असे वाटते आहे.
महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे, जसे त्याला पुणे मुंबई तसे इतर ठिकाणी तशी माणसिकता नाहिये कदाचीत.
मागे मावळामध्ये झालेला गोळीबार, कोकणात अनुभट्टी ला झालेला विरोध असेल किंवा कापसा साठी, उसा साठी शेतमाला साठी लढणारे ही येथे आहेतच की.
आणि तळागाळात जावुन काम करण्यासाठी फक्त गाव नाही शहरात पण ते करता येते.
असो. मुद्दा निट मांदता आला नाही पण महाराष्ट्र हे व्यापारी मानसिकतेचे राज्य नक्कीच नाहीये.
10 Feb 2015 - 3:26 pm | पिंपातला उंदीर
सहमत . मुंबई पुणे नाशिक अशी काही विकासांच्या बेटा पलीकडे खूप मोठा महाराष्ट्र आहे
10 Feb 2015 - 3:35 pm | ऋषिकेश
मराठवाडा आणि खान्देश व कोकणातील थोडासा भाग सोडला (तिथेही देशातील कित्येक भागांशी तुलना करता परिस्थिती बरी आहे) तर महाराष्ट्रात उद्योगधंदे, कारखाने, शेती, सिंचन, रस्ते इत्यादी अनेक बाबतीत संपन्नता आहे. मी पश्चिम महाराष्ट्र व मुंबईशी या भागांची तुलना नाही करत आहे, तर देशातील इतर राज्यांशी - जिथे समाजवादी म्हणा, डावे म्हणा किंवा भाजपा/काँग्रेस व्यतिरिक्त अन्य म्हणा असे प्रश्न तग धरून आहेत त्या राज्यांशी - तुलना करतोय.
दुसरे असे मुंबई+ठाणे+पश्चिम महाराष्ट्र +शहरी भाग मिळून महाराष्ट्रातील मतदार डॉमिनेटिंग आहे. तेव्हा इथे जिंकणार्या पक्षांचा तोंडावळा अधिकाधिक शहरी होत जाणे अनिवार्य आहे.
आआप ने दिल्लीच्या निवडणूकीतही तद्दन शहरी प्रश्नांवर बोट ठेवले. महाराष्ट्रातही विदर्भात शेतकर्यांची आत्महत्या वगैरेपेक्षा विदर्भात उद्योगाची वाढ, "गडकरी मार्ग" अधिक महत्त्वाचा ठरला.
उत्तरप्रदेश किंवा बिहार वगैरे राज्यात तितकी संपन्नता नसल्याने पारंपरिक राजकारण अजून काही वर्षे तग धरून राहिल
10 Feb 2015 - 2:12 pm | वेल्लाभट
खूप आशा होती माणसाकडून. मराठीची चाललेली गळचेपी बंद करेल, आणि शिवाय शिस्तबद्ध विकास बिकास करेल. पण सर्र कन वर गेलेल्या अपेक्षा सर्र कन खाली आल्या. एका माळेचे मणी निघाले सगळे. अतिशय वाईट. आता पुन्हा वर येईल वगैरे तुम्ही म्हणता; पण माणसाने विश्वास का आणि कसा ठेवावा? उद्या भाऊ एकत्र आले तरीही भुवया संशयानेच वर जातील; आनंदाने नव्हे.
10 Feb 2015 - 2:18 pm | गणेशा
बरोबर, अआणि शक्यता कमी आहे वर येण्याची. पक्षीय संघटन खुप कमी आहे त्यांचे.
याउलट भाजप.. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉन्ग्रेस ची पक्षीय संघटनता खुप आहे
10 Feb 2015 - 2:44 pm | विजुभाऊ
त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ठाकरे घराण्याचे महाराष्ट्रातील राजकारणातील स्थान महत्वाचे मानले तरीही त्यानी एकूणातच महाराष्ट्रात किती समाजकारण केले आहे हे अभ्यासण्यासारखे आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या नंतर त्या बाबतीत जमेची बाजू कमीच आहे. महाराष्ट्र म्हणजे फक्त मुंबई नव्हे. आणि मुंबईतील समाजकारणात त्यांची भूमिका किती हे सुद्धा ठरवावे लागेल.
मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपात त्यावेळेस जेंव्हा गिरणीकामगार उध्वस्थ होत होता त्यावेळेस सेनेने केवळ बघ्याची भुमिका घेतली.
महाराष्ट्रभर काम करायचे म्हणजे शेतकरी तेही जिरायती आणि बागायती, ग्रामीण भागातील उद्योग रोजगार शिक्षण सोयी, या सर्वांवर भर द्यायला हवा.
सेना भाजप युतीच्या पूर्वीच्या काळातही सेमेने हे विषय कधीच आपल्या अजेंड्यावर आणले नव्हते. ते केवळ मुंबई पुणे नाशीक फारफार तर औरम्गाबाद इथपर्यन्तच राहीले. सेनेबद्दल आपुलकी असूनही हे खेदाने म्हणावे लागते की त्यानी समाजकारणाच्या कोणत्याच मुद्द्याला स्पर्षही केलेला नाहिय्ये. त्या बाबतीत त्यांची पाटी कोरडीच आहे.
10 Feb 2015 - 2:55 pm | निनाद मुक्काम प...
ठाकरे घराणे आणि महाराष्ट्र
माझ्यामते पवार घराणे सोडता अजून कोणत्याही घराण्याने
संपूर्ण महाराष्ट्रात ह्या न त्या प्रकारे आपले अस्तित्व राजकारणात दाखवले नाही.
कोकण व मुंबई ठाणे पट्यात सेनेचा बालेकिल्ला पण साधन वेस्ट महाराष्ट्र पवारांचा होता त्याखेरीज देश मुख शिंदे दर्डा
असे जुने व नाईक राणे मुंडे असे नवीन संस्थानिक सुद्धा आहेत.
आता साहेब जर हिंदुरुदय सम्राट मानले तर बाकीचे नेते जे महाराष्ट्राच्या अनेक भागात आपले साम्राज्य पिढ्यानपिढ्या राखून आहेत ते तेथील हिंदू जनतेचे सम्राट नाहीत का
10 Feb 2015 - 3:18 pm | पिंपातला उंदीर
या निकालाने राज ठाकरे आणि मनसैनिकांना नक्कीच गुदगुल्या झाल्या असतील . कारण जे आप करू शकत ते आपण का नाही करू शकत असे त्यांना वाटेलच .
राज्यातल्या फडणवीस सरकारची वाटचाल पण केंद्रातल्या मोदी सरकारच्या पायवाटेवरून चालू आहे . थोडक्यात यु टर्न मारण्याची परंपरा इथेही चालू झाली आहे . कॉंग्रेस च्या दुबलेपनामुळे विरोधी पक्षाची स्पेस जी निर्माण झाली आहे ती राज भरून काढू शकतात . कारण त्यांचा स्वतःचा करिष्मा आहेच . शिवसेना स्वतः सत्तेत सामील असल्याने राज्य सरकार विरुद्ध चा असंतोष capitalize नाही करू शकणार . आणि राष्ट्रवादी च भाजप शी जे उघड उघड इलू इलू चालू आहे ते तर उघड गुपित आहे . दिल्ली मध्ये भाजप ने ज्याप्रमाणे आप च्या नाराज लोकांना फोडले तसेच भाजप राज्यात मनसे नेते फोडत आहे . त्यामुळे मनसे मध्ये आप विरुद्ध राग धुमसत आहे .
पण त्यासाठी राज यांना केजरीवाल यांच्याप्रमाणे सर्व राज्यात फिरावे लागेल . संघटन मजबूत करावे लागेल . आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी available राहावे लागेल . बाळासाहेब , पवार साहेब आणि केजरीवाल सारख .
10 Feb 2015 - 3:56 pm | विजुभाऊ
महाराष्ट्रात सेनेने स्थानीक विकासास किती हातभार लावला आहे हे स्वतःला विचारून पहावे.
शिव-वडा वगैरे सारख्या सम्कल्पना म्हणजे विकास नव्हे. सेनेने किंवा त्यांच्या नेत्यानी किती ठिकाणी शिक्षणाच्या सोयी उपलब्द करुन दिल्या आहेत. मनसेची रोजगार पुरवणारी जी शाखा आहे त्यांनी रेल्वेत स्थानीक लोकाम्ची भरती व्हावी म्हणून मार्गदर्शन केलेले आहे. हा अपवाद वगळता काँग्रेसी नेत्यानी केले तसे सेनेच्या किंवा मनसेच्या नेत्यानी कुठे कॉलेजे कारखाने , सहकारातून उद्योग वाड वगैरे काही केल्याचे ज्ञात नाही.
महाराष्ट्राचे ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत त्याबद्दल सेना नेत्यानी गर्जना घोषणा व्यतीरिक्त काहीच केलेले नाहिय्ये.
उलट इथे येवू शकतील अशा आय आय एम आयटी सारख्यां संस्थांना अडसरच निर्माण केले.
स्थानीक पातळी वर उद्योग निर्मान व्हावेत म्हणून पवारानी बारामती ,जेजुरी ,येथे जे केले ते सेनेच्या मनसेच्या अजेंड्यावरसुद्धा नाहिय्ये हे दुर्दैव आहे.
मनसे ने त्यांच्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंट मधे यांचा उल्लेख केलेला आहे मात्र त्यापुढे ते गेले नाहीत.
राज ठकरेना जर खरोखरच महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर त्यानी या बाबतीत प्रामाणीक पणे प्रयत्न केरायला हवेत
10 Feb 2015 - 4:06 pm | ओल्द मोन्क
ग्रामीण भागात रुजण्यासाठी कमीत कमी ५-१० वर्षांचा कार्यक्रम राबवावा लागेल यांना
11 Feb 2015 - 4:16 pm | दुश्यन्त
स्थानीय लोकाधिकार समिती बद्दल काही माहित आहे का?
10 Feb 2015 - 3:57 pm | प्रसाद१९७१
त्या साठी राज यांना सकाळी वेळेवर उठावे लागेल. काकांनी त्यासाठी घड्याळ देण्याची तयारी दाखवली होती.
10 Feb 2015 - 3:58 pm | ओल्द मोन्क
राज ठाकरे देखील आता त्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात आणू पाहताय असे वाटते
http://www.loksatta.com/mumbai-news/amit-thackeray-meets-bmc-commissione...
10 Feb 2015 - 4:08 pm | स्वधर्म
एक तळागाळातून अालेला, दुसरा गादीचा वारसदार
एक अापली चूक झाली म्हणण्याचे धैर्य असलेला, दुसरा इतरांच्या नकला करून टाळ्या मिळवणार
एक दिल्लीच्या थंडीतही फूटपाथवर रात्र काढू शकणारा, दुसरा लॅंड क्रुझरमध्ये फिरणार…
एक गांधीमार्गाने अांदोलन करणारा, दुसरा खळ्ळ खट्याक
दिल्लीच्या लोकांइतके महाराष्ट्रातले लोक शहाणे होतील, तो सुदिन.
तूर्त तरी कसलीच तुलना होणार नाही साहेब.
- स्वधर्म
10 Feb 2015 - 4:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अगदी बरोबर बोललास रे स्वधर्मा.
अरविण्दचा,त्याच्या पक्षाचा प्रामाणिकपणा ही एक जमेची बाजू आहे. राजबद्दल काय बोलणार? कधी उत्तर भारतियांबद्दल बोल तर कधी शरद पवारांचे कौतुक.कधी मोदींचे कौतुक तर काही दिवसानी त्यांच्यावर टिका.
10 Feb 2015 - 5:41 pm | विशाखा पाटील
प्रतिसाद आवडला.
त्यात अजून भर - एक योगेन्द्र यादव सारख्या विचारवंतांचं ऐकणारा, दुसऱ्याला विचारांचं वावडं, आपण सांगू तीच पूर्वदिशा असं म्हणणारा...
10 Feb 2015 - 5:06 pm | अमोल केळकर
सध्यातरी अनेक शुभेच्छा एवढेच म्हणेन
अमोल
10 Feb 2015 - 5:55 pm | विजुभाऊ
एकुणातच मनसे कडे कोणताच प्लॅन / ब्ल्यू प्रिंट नाहिय्ये असे दिस्तय.
यांचे तारु कुठे भरकटणार आहे सांगता येत नाही
10 Feb 2015 - 6:36 pm | चौकटराजा
राज ठाकरे व केजरीवाल यांची तुलना ? काय डोके फिरले आहे की काय ?
आपण मूळ गडबड कुठे आहे ते पाहू या ! सावरकर, आंबेडकर, गांधीजी याना मानणारे एकेक मोठे समुदाय आहेत. तरी ते सर्वमान्य नेते नव्हतेच ! ही त्यांची कथा तर बाळासाहेब ठाकरे, लालूप्रसाद, एम जी आर , ममता, बादल, ई ई ची काय कथा ? सर्वच माणसांचे काहीसे प्रतिनिधीत्व १९६९ पर्यंतची कोंग्रेस करीत असे तो पर्यंत हिंदुत्व वादी जनसंघ लोकांच्या मधे कोठेतरी फक्त अल्प प्रमाणात जिरलेला होता.
दिल्लीतील सरकार हे गरीब व श्रीमंतांचे दोघांचे ही असेल ही भारताच्या इतिहासातील अद्वितीय घोषणा केजरीवाल यानी केली आहे. रोजगार निर्मिती साठी श्रीमंतांची गरज असते व श्रीमंतांची नफ्याची स्वप्ने गरीब गरजू माणूसच साकार करू शकतो हे अर्थशास्त्र मोदींप्रमाणेच केजरीवाल यानीही जाणले आहे. मग हे सगळे, ठाकरे, यादव, मोदी, पवार, पाटील , पटेल, यांच्यात व केजरीवाल यांच्यात मूलभूत फरक काय ? तर ते लोकांचे नेते होउ पहात आहेत.पदे मिळालेले कार्यकर्ते, वाळू माफिया, बिल्डर, गणपती उत्सवातून पुढे सरसावलेले पण गुंड लोक याना पक्षात घ्यावेच लागते. चरण्यासाठी महामंडळ द्यावेच लागते. त्याना सांभाळले की आपल्याकडे सामान्यजन फारसे फिरकत नाहीत हे पारंपारिक राजकारणाचे फंडे आहेत. राष्ट्रवादी हे तर या राजकारणाचे जागते पण मरू घातलेले उदाहरण आहे. जनलोकपाल वगैरे भंपक पणा असेलही पण त्याच्यात नक्की गैर काय आहे याबाद्द्ल एक तरी व्याख्यान जाणता राजा यानी दिले आहे काय ? म्हणूनच त्यांचा महापौर प़कडला गेला उजवा हात तुरुंगात अनेक महिने गेला. उद्धव व राज यांचे ही तोंड या विषयावर उघडत नाही. मी सुडाचे राजकारण करणार नाही या नरेंद्र मोदींच्या उक्तीत मी कलमाडीना या देशातील रटाळ न्यायव्यवस्थेवर सोडतो असाच आहे. केजरीवाल यानी अशी सवलत कोणालाही देता कामा नये. सुडाचे राजकारणाचा आरोप झाला तरी चालेल पण भाजपा हा केशरी कॉंग्रेस असून कॉंग्रेस हा सफेद भाजपा आहे हे बर्याच सामान्य जनांचे निरिक्षण किती बरोबर आहे हे त्यानी लोकाना दाखवून द्यावे. लोकांचा केजरीवालाना धाक, केजरीवालांचा नोकरशाहीला धाक व युक्त ठिकाणी नोकरशाहीचा लोकाना धाक असे चक्र दिसले पाहिजे. आप चे यश सर्व देशात दिसेल असे नाही पण आपल्या सदस्य नोंदणी साठी त्यांचा उत्साह या जयामुळे नक्कीच वाढेल.
10 Feb 2015 - 8:14 pm | असंका
सुरेख!!
धन्यवाद!
11 Feb 2015 - 4:30 pm | प्रसाद१९७१
उत्तम उत्तर.
जनतेला राजकारण्यांना तुरुंगात गेलेले बघायचे आहे. शिक्षा झालेल्या बघायच्या आहेत. पण मोदी आणि इथे देवेंद्र सरकारनी एक सुद्धा केस अजुन केली नाही. शिक्षातर फारच दुरची गोष्ट.
मोदी तर आता जा.रा.. च्या गावी जातायत. ही फसवणुक आहे.
11 Feb 2015 - 6:07 pm | विजुभाऊ
देवेन्द्र सरकार तसे काही करेल याची शक्यत शून्यवत आहे.
त्यांच्या सरकारला पवारांचा टेकू आहे. नाही म्हणायला तटकरे वगैरेंची चौकशी चे नाटक चालू ठेवतील.
देवेन्द्र सरकार ने सेने ज्या पद्धतीने लोळवले आहे ते पहाता पवार राज्यात आणखी कायकाय गेमा करतील आणि स्वतःची सुरक्षितता अबाधीत ठेवतील याचे अंदाज कोणालाच करता येणार नाहीत
11 Feb 2015 - 7:00 pm | पिंपातला उंदीर
सहमत
10 Feb 2015 - 8:07 pm | पगला गजोधर
"भाजपा हा केशरी कॉंग्रेस असून कॉंग्रेस हा सफेद भाजपा आहे" क्या बात …क्या बात …क्या बात …!
10 Feb 2015 - 8:37 pm | विजुभाऊ
चौकट काका
राज ठाकरे नी या घटनेतून काय शिकायला हवे या बद्दलचा विचार आहे.
राष्ट्रवादी चे आत्ताचे रूप सोडुन देवूया. पण काँग्रेस मधील नेत्यानी सहकारी कारखाने, सोसायट्या, दुध संघ , सूत गिरण्या यातून जनसमुहाला रोजगार मिळेल हे पाहिले. काही नेत्यानी शिक्षणसंस्था काढल्या ( या सर्वातील भ्रष्टाचार वगैरे जरा बाजूला ठेवूयात) यातून स्थानीक विद्यार्थ्याना शिक्षण उपलब्ध झाले. वसंतदादा पाटलानी खाजगी इंजीनिरिंग कॉलेजेसना परवानग्या देण्याच्या अगोदर सातारास, सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यात मिळून दोन मेडीकल कॉलेजेस आनि दोन इंजिनीरिंग कॉलेजेस उपलब्ध होती.
माझ्या म्हणण्याचा उद्देश होता की ठाकरे कुटुंबियाम्पैकी कोणीच अशा संस्था काढल्या नाहीत. त्यातून कोणाला शिक्षण , रोजगार वगैरे चा कधीच विचार केला नाही.
खॅळ्ळ खॅटॅक करणे सोपे असते. संस्था उभारणे अवघड असते.
11 Feb 2015 - 7:01 am | अर्धवटराव
दिल्ली निवडणुकांच्या निकालाने उत्साहात येऊन दोन दिवस बाहु फुरफुरणे, आरशात बघत स्वतःला छ. शिवाजी महाराज समजुन हातवरे करणे व तिसर्या दिवशी वास्तवाची जाणिव आल्यावर परत आपल्या तोडपणि, खळ्ळ खटॅक ( आता तर ते हि नाहि) वगैरे उद्योगाला लागणे, या पलिकडे कृष्ण्कुंजवर काहि होणार नाहि.
मातोश्रीवर २०१४ पासुन जे भिकेचे डोहाळे लागले ते अजुनही कमि व्हायचे नाव घेत नाहि. राजसाहेब पण शेवटी त्याच मुशीतले. यांच्या डोळ्यादेखत तो मयंक गांधि विराट रूप धारण करेल व हे ठाकरेद्वय त्यालापण दिल्लीचे आक्रमण , अमराठी माणसाचा माज वगैरे बिरुदं लाऊन आपला कपाळमोक्ष करुन घेतील.
11 Feb 2015 - 8:57 am | नाखु
खरच "आ.प." ची नितांत गरज आहे.
..
...
....
.....
......
.......
........
.........
..........
...........
............
.............
आत्म परीक्षण
11 Feb 2015 - 12:00 pm | विजुभाऊ
ते केले तरच मनसे चा रथ रुळावर येवू शकेल. दौडेल कधी ते त्यांचे त्याना माहीत.
अजूनतरी तो परप्रान्तीय , तेलकट वडा , चिकन सूप खळ्ळ खट्याक यातच रुतलेला आहे.
उद्धव ठकरे ना तर त्यांचा रथ कोणत्या दिशेला न्यायचा याचा रोज नव्याने साक्षात्कार होतोय. नको असलेल्या दादल्यासोबत संसार करण्याची वेळ त्यानीच स्वतःवर आणलीये.
11 Feb 2015 - 3:53 pm | कानडाऊ योगेशु
बुल्स आय. थोरले ठाकरे भाजपाचा उल्लेख नेहेमी कमळाबाई असेच करायचे. पण नाऊ रोल्स हॅव चेंज्ड.
11 Feb 2015 - 3:44 pm | पुतळाचैतन्याचा
शरद पवारांनी एका ओळीत सांगितले होते राज ना...." सकाळी उशिरा उठून पक्ष चालवता येत नाहीत". हि ओळ पुरेशी आहे सगळा सांगायला.(टिप: मी पवारांचा विरोधक आहे)
11 Feb 2015 - 6:42 pm | गणेशा
हसतो आहे .. कोणॅए भसक्कन अंगावर येउ नये म्हणुन आधीच सावधानता बाळगली म्हणुन :)
विरोधक पण ज्यांना साहेब म्हणतात ते पवार आहेत.
आमच्या बारामतीत मोदिंचे स्वागत असो
13 Feb 2015 - 6:24 pm | बाप्पू
तुलना करायची तर दोन्ही गोष्टी एकाच जातीतील हव्या. जसे कि हत्तीची तुलना हत्तीशी, वाघाची तुलना वाघाशी करायची असते.
हात्ती ची तुलना शेळी शी कशी करता येईल ?
आणि आप ला मिळालेल्या यश्याम्ध्ये एक मोठा वाट त्यांच्या तरुण सुशिक्षित कार्यकर्त्यांचा आहे. जे कि २-३ बीअर च्या बाटल्या किंवा पैशांची पाकिटे यासाठी काम करत नव्हते.
राज ठाकरे यांच्या विचाराने आणि वक्तृत्वाने प्रेरित होऊन बराच तरुण वर्ग त्यांच्या मागे गेला होता. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. कारण राज साहेब फक्त बोलके पोपट आहेत. प्रत्यक्ष सत्ता (उदा. नाशिक ) किंवा आंदोलने (उदा. टोल विरोधी) त्यांना कधीच व्यवस्थित हाताळता येत नाहीत. आणि कार्यकर्त्यांनापण ते कधीच आपल्यापैकी एक असे वाटले नाहीत.
28 Jul 2017 - 2:08 am | थिटे मास्तर
दिल्लीत केजरीवाळ यांच्या आम आदमी पक्षाला टोलेजंग बहुमत मिळाले आहे.
त्यांची लढाई अक्षरशः दिया और तुफान की लडाई होती. तरीही त्यानी नेत्रदीपक यश मिळवले.
कदाचित त्यांचेकडे नक्की काय करायचे आहे याचे प्लॅनिंग होते.
मात्र हा धागा काढलाय तो केजरीवालांच्या या विजयातुन महाराष्ट्रात मनसे या पक्षाला बरेच काही शिकण्यासारखे आहे.
{ तुफान हि करेगा अब रौशनि (तात्यावालि नाय) का फैसला
दिया वहि जलेगा जिस मे दम है
लंबी रेस का घोडा वहि होता है जो पहले धिरे दौडे और जब स्पिड पकड ले तो सब को पिछे छोड दे }
हे हिंदि शिनुमातल हाय जी, का ब्रे चालणार नाहि च्यामारी फक्त हिंदि शिनुमे पाहुन रिव्हु लिहिण्यासाठि तुम्हि दिया और तुफान की लडाई करुन मुख्यमंत्रि निवडुन देउ शकता आणि आम्हि २ डाईलोग नाय वापरु शकत.....खरच ह्या देशात आणिबाणि लागलिय का.
धागालेखक विजुभाउ आज सुद्धा आपण धाग्यात व्यक्त केलेल्या मतांवर ठाम आहात ?
मिपावर अजुन कोणि केजरिवाल बद्दल आशा ठेउन असलेले सुद्धा आपले मत मांडु शकतात.
कारण माझ्यामते तरी अरविंद केजरिवाल दिया बाति तुफान वग्रै काहि एक नव्हत तो एक ठग होता बास्स. आता बसलय गप्प.
लंबि रेस का घोडा तो कोई और था हे तर खेचर होत राव.
28 Jul 2017 - 11:02 am | नितिन५८८
एक मराठा लाख मराठा चे काय झाले पुढे, कोणाला काही माहिती आहे का?
28 Jul 2017 - 11:24 am | गॅरी ट्रुमन
केजरीवाल नावाच्या भामट्याने किती लोकांना किती काळ यडं बनवलं होतं हे दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळचे मिपावरील धागे बघून समजतं :)
28 Jul 2017 - 11:30 am | हतोळकरांचा प्रसाद
:):) इथले तेव्हाचे प्रतिसाद बघून आता हसू येते. त्या त्या प्रत्येकाने आता येथे येऊन त्यांची मते परत मांडली तर काय मजा येईल :):).
28 Jul 2017 - 9:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्याकाळी केजरीस्तुतीस्त्रोत्राची पारायणे करणारे लोक आता त्या आठवणी काढल्या की "इंटॉलरन्ट, इंटॉलरन्ट" असं म्हणत अंगावर येतात असा अनुभव आहे ! =))
28 Jul 2017 - 9:05 pm | विजुभाऊ
तीच परिस्थिती आहे अजून.
सेनेची तर अवस्था बिहार प्रकरणानंतर अजूनच बीकट झालीये.