ये कहाणी थी दियेकी और तुफानकी

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
10 Feb 2015 - 2:01 pm
गाभा: 

जर तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल, कि ८ वी किंवा ९ वी मध्ये इंग्रजीच्या पुस्तकात बायबलमधील ऐक कथा धडा म्हणून होती, 'डेविड आणी गोलायथ' असा, अश्याच काहिश्या आधुनिक कथेचा मी आज इंटरनेटद्वारे अनुभव घेत आहे. अस म्हणतात, जेव्हा इस्रायेलचा राजा सॉल आणि फिलीस्तिनी सैन्य लढाईमधे एकमेका समोर उभे ठाकले होते, जेव्हा फिलीस्तिनी योद्धा गोलायथ, जो की जवळ जवळ ९ हात उंच, व बराच धिप्पाड, मजबूत चिलखताने मढलेला, मैदानात पाहून, इस्रायेली सैन्यातले बहुसंख्य भीतीने चळाचळा कापू लागले, त्यांची लढ्याची उर्मी कमी होऊ लागली. अश्या परिस्थितीत ऐक तरुण पुढे आला, तो होता डेविड. डेविडला खरंतर त्याच्या वडिलांनी, मोर्च्यावर नक्की काय घडतंय त्याची बातमी कळण्यासाठी पाठवले होते, जमलं तर, फिलीस्तीनींना ऐक दोन शिव्या हासडून यायला सांगितलं होतं. पाहतो तर काय, अन्य मोहिमांवर नुकत्याच मिळालेल्या विजयामुळे फिलीस्तिनी सैन्याचे मनोबल फारच वर होते, त्यात त्यांचा कारीस्माटीक लढाऊनेता गोलायथ प्रतिस्पर्ध्याला '१ समोर १' प्रकारच्या युद्धाचे आवाहन देऊन, लीलया धुळीस मिळवत असे, अशी त्याने नुकतीच काही राजघराणी, व काही नामांकित योद्ध्यांना पराभूत केलेले होते. त्याच्या भात्यात अनेक विविध अस्त्रे, अनेक हेर, पैसा हे तर होतच पण त्याबरोबरच, 'प्रक्षोभक व तेढ निर्माण करणारी वक्तव्ये' हेही त्याचं छुप अस्त्र होत. त्याची वाणी ऐकून त्याचं सैन्य अगदी चेकाळून उठत व शत्रूवर तुटून पडत, शिवाय त्याच्या मागे धर्मयोद्धा म्हणून धर्मसत्तेचा पाठींबा होता तो वेगळाच. असल्या जगत्जेत्याच्या मानात वावरणाऱ्यासमोर मिसरूड फुटलेला तरुण येतो काय, अंन आवाहन स्वीकारतो काय. फिलीस्तिनी काय, इस्रायेली तळावरच्या काही लोकांनी आश्चर्याने तोंडात बोट घातली. बहुसंख्य सर्वांना या गोष्टीचा शेवट काय झाला ते माहिती आहे. सर्व जमेच्या बाजू विरोधकाकडे असताना, केवळ साध्या सरळ विचारावरील श्रद्धेच्या जोरावर, न डगमगनार्या आत्मविश्वासाच्या बळावर डेवीडने तो सामना इस्रायेलच्या बाजूने झुकवला. नंतर त्याला अनेक सेनापतींचे अभिनंदनाचे निरोप गेले असतील. कदाचित नेतृत्वाची एकाधिकारशाहीने त्रस्त फिलीस्तिनी गोटातील काहीजनाकडूनही निरोप गेले असतील. (ख. खो. त्यांचा दे. जा. ) पुढे यथावकाश डेवीड इस्रायेलचा राजा झाला असेही म्हणतात …म्हणूनच जेव्हा जगात कधीही 'अतीसबळ विरुद्ध दुर्बल' लढत होते, तेव्हा आवर्जून या लढाईचा उल्लेख येतोच, क्योंकी 'ये कहाणी थी दियेकी और तुफानकी'.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

10 Feb 2015 - 2:53 pm | टवाळ कार्टा

हे तुमचा देव आमचा देव असेच करत बसा तुम्ही लोक

देव, धर्म, रिटर्न-टीकीट हे सर्व त्यांचीच मक्तेदारी हो.

पिंपातला उंदीर's picture

10 Feb 2015 - 3:24 pm | पिंपातला उंदीर

स्तलीनग्राद ची लढाई आठवली . आता आम्ही भाजप ला हिटलर सारखा किंवा नाझिवादी म्हणतो असा आरोप करू नये . फ़क़्त उपमा दिली हो *lol* *LOL* :-))

विवेकपटाईत's picture

10 Feb 2015 - 7:31 pm | विवेकपटाईत

खरा हिटलर कोण आहे, डोकं खाजवा कळेल

म्हणजे नरेंद्र का अमित या दोघांमधला, खरा कोण ? असाच ना ?

पगला गजोधर's picture

10 Feb 2015 - 5:03 pm | पगला गजोधर

डेविड आणी गोलायथ
David

मृत्युन्जय's picture

10 Feb 2015 - 9:05 pm | मृत्युन्जय

डेविडचे भक्त चेकाळणार आता. ;). सॉरी. सॉरी. डेव्हिडचे भक्त नसतात नाही का? त्याचे प्रशंसक असतात. गोलिएथ वेडा त्याचे भक्त असतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2015 - 10:37 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो मागे त्या गोलियथाचे प्रराक्रमाचे गोडवे गायले जात असताना प्रशंसक कसे १०व्याच्या (टेन्थ मॅन) थियर्‍या प्रसवायचे ते पहा. :)
तेव्हा आव तर लई भारी विचारवंत (टेन्थ मॅन) असल्याचा होता प्रशंसकांचा. आता व्हा बरे टेन्थ मॅन. :-)

पगला गजोधर's picture

11 Feb 2015 - 1:32 pm | पगला गजोधर

दिल्लीतल्या जनतेने टेन्थमन होवूनच मतदान केलाय बर का !

पगला गजोधर's picture

11 Feb 2015 - 1:35 pm | पगला गजोधर

तेवढीच गोलियाथच्या सैन्याला चेकाळन्यापासून थोडी विश्रांती, बिच्चारे किती दामालेय्त, मागच्या काही महिन्यांच्या चेकाळन्यातून.

अर्धवटराव's picture

10 Feb 2015 - 9:14 pm | अर्धवटराव

:)

बाबा पाटील's picture

10 Feb 2015 - 9:17 pm | बाबा पाटील

*mosking* *JOKINGLY* 8P 8p

पगला गजोधर's picture

11 Feb 2015 - 2:39 pm | पगला गजोधर

अशाच प्रकारचा लेख (गोफणीचा दगड! ढिंग टांग), इ सकाळ मध्ये आज ११ फेब , हा लेख मिपावर प्रकाशित झाल्याच्या दुसर्या दिवशी आलेला आहे.
माज्जानु लाईफ.

डिस्क्लेमर: पण तो (ढिंग टांगवाला ) मी नव्हे ह.

सणकवलीतला नारो डेविड पुन्हा उसळी मारणार का ?