पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट..
रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !!
त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त..
युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !!
केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात...
जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !!
अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी...
बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !!
आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता...
त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !!
कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता..
पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !!
क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती तोंडे..
छोटासा एकच अणू, ठरे सुकाणू, हरवले युद्ध !!
प्रतिक्रिया
19 Jul 2015 - 12:07 pm | उगा काहितरीच
एकदा व्हावेच अणुयुद्ध ! सगळी पृथ्वी व्हावी नष्ट क्षणार्धात . नसावे कुणीच कुणासाठीही शोक करायला , नसावे कुणी याचा परिणाम अभ्यासायला. खरंच आपण नाही लायक या सुंदर जगाचे , आपल्याला मिळायलाच पाहिजे शिक्षा विध्वंस केल्याची . भांडत बसल्याची. एकदा व्हायलाच पाहिजे अणुयुद्ध , क्षणार्धात व्हावे नष्ट हे विश्व ...त्यायोगे चालू तर होईल उत्क्रांती पुन्हा पहिल्या पासून !