हॉप फ्रॉग २
एका बारीक पण धारदार आवाजाने शांतता भंग पावली.तो आवाज घर्षणाने तयार झाल्यासारखा वाटत होता.कुठल्या तरी टणक वस्तुंच्या घर्षणाने.
उदाहरणार्थ दातांच्या.
जणू कुणीतरी अमानवी त्वेषाने दातओठ खात होतं.
तो आवाज ऐकून राजाच्या मानेवरचे केस उभे राहीले. “ तू-तू तो आवाज का काढतोयस? " राजा हॉप फ्रॉग वर खेकसला.
बुटका आता बराच सावरल्यासारखा दिसत होता .
“ मी ? मी का बरं ? मी कसा..." तो राजाकडे स्थिरपणे पाहत म्हणाला.
“तो आवाज बाहेरुन आल्यासारखा वाटतं होता. " एका मंत्र्याने आपले निरीक्षण नोंदवले. “एखादा पोपट असावा , बाहेर येण्यासाठी पिंजरा खरवडत असेल."