समाज

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 9:34 am

सुधांशु नूलकर काकांसोबत ओरिगामी कट्टा- २२ नोव्हेंबर २०१५

नुकताच सुधांशु नूलकर काकांसोबत ओरीगामी कट्टा पार पडला.
तेव्हा काढलेली काही प्रकाशचित्रे येथे मिपाकरांसोबत शेयर करीत आहे.
तशी कट्ट्याला चर्चा बरीच झाली पण सध्या कसें आहें कीं संपादक विश्रांती घेत असल्याने , उगाच काही वाद उद्भवु नये अन आमचा आयडी ( ह्या कारणाने ) संपादित होवु नये म्हणुन कट्ट्याचा वृत्तांत लिहिण्याचा मोह आवरत आहे.
मिपा धोरणानुसार चारोळी धागे उडवले जातात तसे होवु नये म्हणुन उगाचच वरील ३ आणि हे वाक्य खरडले आहे , एरव्ही हा धागा ह्त्म्ल वापरुन अन एक्सेलमधे प्रोग्राम लिहुन लिहिण्यात आलेला आहे.

समाजजीवनमानमौजमजाअभिनंदन

बिहारचा प्रवास उलट ?

shawshanky's picture
shawshanky in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 8:30 am

बिहार विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. नीतिशकुमार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव आणखी काही काळ सुरू राहणार आहे. त्यास कोणाची हरकत नसावी कारण नीतिश हे अत्यंत मवाळ आणि नेमस्त नेते आहेत.बिहारचा विकासदर देशाच्या विकासदरापेक्षा जास्त करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली होती. मात्र चेहऱ्यासाठी बिहारी जनतेने मतांचे भरघोस दान केले त्या नीतिश यांचा चेहरा गेल्या काही दिवसांत भाजपच्या कमळापेक्षाही जास्त कोमेजलेला दिसतोय.

समाजराजकारणप्रकटनविचारसमीक्षालेख

ढकलपत्रे....

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 8:11 am

ढकलपत्रे करा, पण केवळ ढकलपत्रेच वाहिली तर माथाडी कामगार बनाल.
स्वत:चे काही लिहा रे please ! ईश्वराने लिहिण्याची शक्ती फक्त माणसालाच दिली आहे. ती लोप होऊ देऊ नका.
मिसळपाव चा पुर्ण फायदा घ्या आणि लिहिते व्हा !
------------------
कोणीही स्वत:चे लिहू शकतो.. त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कसे होणार?
------------
आज असेच आणखी एक ढकलपत्र समोर आले, त्याला हे माझे उत्तर-->
.....................................
काहीच बदललेले नाही. बदलली आहे ती फक्त ऑफीसची जागा. पूर्वी ऑफीस सिमेंटच्या भिंतीत होते, आता आभासी आहे.
त्यामुळे आता देखील,

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटन

आठवणी अज्ञातांच्या

निशदे's picture
निशदे in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 9:51 pm

आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही.

समाजजीवनमानप्रकटनअनुभव

जपान, जपानी आणि मी !....भाग ३

पद्मावति's picture
पद्मावति in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 7:28 pm

भाग १
भाग २

पुर्वी कधीतरी एक म्हण ऐकली होती की ज्या पुरुषाचे घर अमेरिकन आणि ज्याची बायको जपानी तो माणूस जगातला सर्वात सुखी माणूस आहे....अशा काहीशा अर्थाची...

समाज

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नजदिकीयाँ बन गई. . .

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 1:48 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

समाजजीवनमानप्रवासविचारअनुभव

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
23 Nov 2015 - 11:39 am

आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला

साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला

चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला

आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला

जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला

- स्वामी संकेतानंद जलेबीवाले

हझलधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयव्याकरणव्युत्पत्तीशुद्धलेखनसुभाषितेसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रराहणीऔषधोपचारप्रवासराहती जागानोकरीविज्ञानअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षण

गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
22 Nov 2015 - 10:48 pm

जिलब्या इथे कुणाला का आवडू नये?
वादात या कुणीही सहसा पडू नये

लपला टवाळ कोठे? तू शोधशी मला...
हातात आज धोंडा या सापडू नये...

गाईन मीच गाणी, गर्दभ नका म्हणू
आधीच सांगतो मी, कोणी नडू नये

राजाच मी मनाचा, हासू नका कुणी
खरडेन लेख माझे, तेव्हा रडू नये..,

तूही जरा चरावे, मीही चरेन ना,
बेकार भांडणांनी दोघे सडू नये

नाहीस तू तरीही आहे निवांत मी,
माझ्याविना तुझेही काही अडू नये,

वागा हवे तसे रे, जखमा नका करू
वाढेल वाद, वाढो, नाते झडू नये ... 

नव-हझलकार इरसाल म्हमईकर

हझलहास्यपाकक्रियाबालगीतशब्दक्रीडाविनोदसमाजजीवनमान

चहावाल्याचे पंख.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
19 Nov 2015 - 9:24 pm

चहावाल्याचे पंख.....
काय करतो? ......... चहा विकतो.
किती वर्षे झाली?........ चाळीसेक.
वय?...... साठीपार.
कर्ज?...... बरेच. कायमचे फेडतोय.
कशासाठी काढलेय?........ फिरण्यासाठी आणि shortfilm बनविण्यासाठी.

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानप्रवासभूगोलअर्थव्यवहारचित्रपटप्रकटनविचारप्रतिसादअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधमाहितीसंदर्भविरंगुळा

दौलतजादा

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जे न देखे रवी...
18 Nov 2015 - 9:26 pm

सरपटत येणाऱ्या हुंदक्यांचे
नाक चोंदुन पायबंध घालताना
फोडणीच्या भातावर
लिंबु पिळुन खाताना
तुळशीपत्राचे वृंदावन
लाथेने उडवताना
डबल बॅरल काढुन
रानडुक्कर टिपताना
मरतुकड्या बामणाला
दगड फेकुन घालताना
विसरु नकोस
हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय
अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन
रुळलेली वाट वाकडी करताना

°°°°°°°°°°°

मुक्त कवितासमाज