ढकलपत्रे....

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
24 Nov 2015 - 8:11 am

ढकलपत्रे करा, पण केवळ ढकलपत्रेच वाहिली तर माथाडी कामगार बनाल.
स्वत:चे काही लिहा रे please ! ईश्वराने लिहिण्याची शक्ती फक्त माणसालाच दिली आहे. ती लोप होऊ देऊ नका.
मिसळपाव चा पुर्ण फायदा घ्या आणि लिहिते व्हा !
------------------
कोणीही स्वत:चे लिहू शकतो.. त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय कसे होणार?
------------
आज असेच आणखी एक ढकलपत्र समोर आले, त्याला हे माझे उत्तर-->
.....................................
काहीच बदललेले नाही. बदलली आहे ती फक्त ऑफीसची जागा. पूर्वी ऑफीस सिमेंटच्या भिंतीत होते, आता आभासी आहे.
त्यामुळे आता देखील,
'Window' म्हणजे स्क्रीन वरील एक 'खिडकी' च आहे. आणि
'Applications' म्हणजे स्क्रीनवर दिसणारी आभासी ऑफीसला केलेली 'विनंती’ आहे...
'Keyboard' म्हणजे संगणकावरचा 'पियानो' आणि
'Mouse' म्हणजे ऑफीस मधे फिरून सगळीकडे पोहोचू शकणारा 'उंदिरच' आहे...
'Hard Drive' म्हणजे ऑफीस महामार्गावरील 'एक महत्वाचे वाहन आहे...
'File' ही अजूनही कार्यालयातील त्यां महामार्गात अजूनही 'एक महत्वाची वस्तू' आहे आणि
'Cut' हे आभासी शस्त्राने' करतात आणि
'Paste' हा आभासी 'डिंका' ने...
'Web' म्हणजे ‘मकडी’ पकडण्याचे 'जाळेच' आहे, कोळी मात्र आपण आहोत, आणि
'Virus' ने आभासी ऑफीसला अजूनही 'तापच' होतो....
'Apple' आणि 'Blackberry' ही व्यावसायिक मेहनतीची 'फळेच' आहेत, जी पूर्ण जग चाखते...
त्यावेळी म्हणे आपल्याकडे कुटुंबासाठी व मित्र-मैत्रिणींसाठी मुबलक वेळ होता...!!!
अजूनही तसेच आहे, कारण आता आपले कुटुंब आणि मित्र खूप विस्तारले आहे.
कोणे एके काळी म्हणे...
खरंच आज देखील काहीच फरक नाहीयं..??
--------------------------------------
-Whatsapp fwd ला माझे चोख उत्तर.

वावरसंस्कृतीसमाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटन

प्रतिक्रिया

रिम झिम's picture

24 Nov 2015 - 8:42 am | रिम झिम

पहिला