मेपोल - एक आनंदोत्सव
नमस्कार, शीर्षक वाचून कुणी या धागा लेखास निवडणूक मतदान/राजकारणाचा विषय समजून उघडले तर तुर्तास तरी क्षमस्व :) पोल हा शब्द येथे खांब अथवा काठी या अर्थाने घ्यावयाचा आहे. मेपोल हा एक बर्याच युरोपीय देशांमधला १ मे ला ( अथवा पासून चालू) होणारा ख्रिश्चनपूर्व काळापासून चालत आलेला एक मोठा आनंदोत्सव आहे. ज्यात काठ्यांना सुशोभित करणे त्यांच्या भोवती सामुहीक फेरनृत्य, गाणी अथवा मिरवणूकींचा देशपरत्वे समावेश असू शकतो.