''कुठे चालले ? सातारा का?''
''नाई सांगलीला'' .
''अरे वा ! मी पण !''
'त्यात काय अरे वा ?'
बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले .
''तुम्हाला प्रवासात झोप येते? ''
''हं ''
''बरंय बाबा !''
शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता.
जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही.
भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते .
''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक ! कुठलंच क्षेत्र चुकलं नाही - नाही का?''
''हं !''
''आता बघा, लोकं शितोळे- शितोळे करून रांगा लावतात, काय त्या मिठाईत येव्हढं ?
पुणेकरांचं एकेक फ्याड नुसतं !''
''अहो, क्वालिटी आहे तशी - साठ वर्षं त्याच धंद्यात आहेत .
लोकं उगाच नाही रांगा लावत!''
''तुम्हाला कस्काय म्हाईत ?''
''मग कुणाला माहीत असणार? ''मीच बाबासाहेब शितोळे !''
प्रतिक्रिया
27 Sep 2015 - 11:48 am | जव्हेरगंज
''आता बघा, लोकं शितोळे- शितोळे करून रांगा लावतात, ">>>>>
ईथचं अंदाज आला.
धक्कातंत्र मजबुत पाहिजे होते.
कल्पना छान!
27 Sep 2015 - 12:48 pm | मांत्रिक
:)
बाकरवडी मात्र जबराच असते चितळेंची.
27 Sep 2015 - 2:54 pm | प्रचेतस
अगदी अगदी.
त्याला तोडच नाही. मात्र चितळ्यांचे पेढे मशिनवर बनत असल्याने तुटता तुटत नाहित.
27 Sep 2015 - 3:02 pm | पैसा
=)) बुवांच्या हातात चितळ्यांचे पेढे असताना चिडवू नका हो!
27 Sep 2015 - 3:05 pm | प्रचेतस
हो ना.
फेकून मारायचे दगड म्हणून.
27 Sep 2015 - 4:41 pm | बोका-ए-आझम
चितळे बाकरवडी, आंबाबर्फी आणि श्रीखंड हे अ फ ला तू न असतात. त्यामुळे पेढे एवढे धन्यवाद असतात हे जरा विचित्र वाटलं.
27 Sep 2015 - 5:43 pm | प्रचेतस
इतके वाईटही नसतात अगदी मात्र पेढ्यांच्या बाबतीत चितळे कधीच पुण्यात चांगले नव्हते. पुण्यात सर्वात भारी पेढा घोडकेचा.
27 Sep 2015 - 5:57 pm | मांत्रिक
सातार्याचा सर्वात भारी मोदी किंवा लाटकरचा. सगळ्यात मस्त तुळजाराम मोदीचा केशरी पेढा.
27 Sep 2015 - 6:07 pm | प्रचेतस
दोन्हीकडचे पेढे खाल्लेत. मोदीचा अंमळ अगोड असतो त्यामुळे जास्त चांगला लागतो.
28 Sep 2015 - 12:50 pm | नाखु
बाबत आणखी एक नाव काका हलवाई. बाकरवडी, चितळे आणि काका हलवाई दोन्ही स्व तंत्र अस्तित्व टिकवून आणि दाखवून आहेत.
स्व तंत्र या शब्दाचे स्वामीत्वहक्क अत्मुगुरुजींकडे असून विनापरवाना वापरू नये.
खुलासे दार नाखु.
चिमण्च्या खफवरील संघातर्फे मिपा खफ वाचक संघाचे हिअतार्थ प्रसारीत.
28 Sep 2015 - 1:05 pm | खेडूत
सहमत.
त्यांची खासियत म्हणजे अंजीर बर्फी. गेल्या वीस वर्षांत तोच दर्जा पहातोय . इतरांनी पण केले- तरी ती सर नाही.
काकांचे जायफळवाले साखरी पेढेही चांगले असतात.
शिवाय मिश्रा पेढे पण बदल म्हणून मस्त वाटतात.
27 Sep 2015 - 2:21 pm | dadadarekar
छान
27 Sep 2015 - 2:36 pm | पैसा
:) नशीब दुकान दुपारी बंद करण्यावरून काही जोक्स सांगितले नाहीत शेजार्याने!
27 Sep 2015 - 3:27 pm | ज्योति अळवणी
अजून छान जमवता आली असती. पण आवडली
27 Sep 2015 - 4:51 pm | पद्मावति
मस्तं खुसखुशीत कथा. आवडली.
28 Sep 2015 - 9:30 am | अमृत
कथा आवडली
28 Sep 2015 - 1:06 pm | खेडूत
सर्वांना धन्यवाद.
ते अत्यंत साधे रहात आणि वडिलांचे स्नेही असल्याने जवळून माहीत होते.
अर्थात हे काही त्यांच्या बाबतीत घडलेली कथा नाही. पण अन्यत्र तशीच्या तशी घडलीय !
29 Sep 2015 - 2:06 pm | शित्रेउमेश
चितळें ची आंबा बर्फी... वाह...