विमा कंपनीविरुद्ध यशस्वी लढा
"माझे व माझ्या पतीचे दोन विमा कंपन्यांचे स्वतंत्र मेडिक्लेम विमे आहेत . दोन्ही विम्यांमध्ये आमची दोघांची नावे घातलेली आहेत . माझ्या पतीची बायपास शत्रक्रिया एशिअन हार्ट इंस्टीट्युट येथे दि. ८ ऑगस्ट २००८ रोजी झाली . या शस्त्रक्रियेचा खर्च रु. ३ लाख २६ हजार ७४८ इतका झाला . आम्हाला दोन्ही विम्याचे मिळून रु. ३ लाख , २० हजार रु. मिळायला हवे होते . त्यापैकी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब विम्याचे पैसे रु. एक लाख ७० हजार हॉस्पिटलकडे पाठवले . मात्र न्यू इंडिया अशुअरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पाठवूनसुद्धा हॉस्पिटल सोडेपर्यंत पैसे आले नाहीत . त्यामुळे कंपनीच्या टी . पी .ए.