आम्ही बाजींच्या लेकी
हुश्श. दररोजची माझी सीट पकडली आजपण. समोरची ओळखीचे हसली. तसे तिचे तिरकस हसणे सोडून तिच्या बद्दल मला काहीच माहित नाही मात्र सकाळी तिचे दर्शन नाही झाले तर दिवसाची चांगली सुरुवात होत नाही असा माझा वेडा समज आहे. नवरा, सासू, आई आणि दररोजची ट्रेन मधली सखी साऱ्यांना फोन लावून सगळे ठीक आहे तपासून घेतले. शांत होते कुठे ते पुढचे स्टेशन आले. आणि दुसरी फौज चढली ट्रेन मध्ये. कोण कुठे उतरणार चौकशी करून आपापल्या सीट राखून ठेवल्या. मग पुढचे स्टेशन आणि तिसरी फौज, आणि अशा ट्रेन मध्ये फौजा चढू लागल्या आणि उतरू हि लागल्या.