हे फक्त माणसातच !
रात्री मासे आणणाऱ्या एकाकी माणसाला
बोकेमांजरे चहुबाजूने घेरतात.
माणूस पळू लागला कि,
त्याच्यावर झेप घेऊन त्याला बोचकारतात.
त्याच्या हातातील मासे क्षणार्धात लंपास होतात.
मासे मिळताच बोकेमांजरे
माणसाला तिथेच सोडून देतात.
हे सगळे किती विश्वासाहार्य, predictable आहे!
मासे मिळाल्यावर,
मासे तर फस्त करायचेच
पण माणसाची आतडी बाहेर येईपर्यंत
त्याला ओरबाडत, बोचकारत रहायचे,
मग, रात्रीच्या भयाण शांततेत फिस्कारत हिंडायचे .......
हे मात्र फक्त माणसातच !
- शिवकन्या.