नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ किमी.
**************************************************
मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ या धाग्यावर अनेकांनी घामटा काढला, धापा टाकल्या आणि एकमेकांचा हुरुप वाढवत एक नवीन "मिशन" लाँच केलं. अगदी आमच्यासारखे लठ्ठंभारतीदेखील पोट सावरत धावायला नाही तरी किमान चालायला तरी लागले.
"सिम्पली वॉकिंग" या साध्यासरळ अॅपमुळे कोणत्याही सोशल मीडियाशिवाय आणि संपूर्ण डेटा आपल्याच डिव्हाईसवर ठेवून शेअरिंगचा कंट्रोल आपल्या हातात ठेवणं सोपं झालं. बाकी मॅप, स्टॅटिस्टिक्स वगैरे सगळं यात उत्तमपैकी आहे.
तर पहिला धागा भरुन वाहू लागल्याने जानेवारी २०१७ साठी नवा भाग काढतो आहे. यावेळी सर्वांना सहज जमणारा आणि तुलनेत सुरक्षित असा "चालणे" हा जो व्यायाम आहे त्यावर भर द्यावा आणि अगदी बिगिनरपासून रेग्युलर फिटनेस फ्रीकांना "चालणारा" चालणं हा व्यायाम अधिकाधिक लोकांनी सुरु करावा आणि त्याबाबत चर्चा करावी अशी विनंती.
मी स्वतः शून्य किलोमीटर चालत चालत बरीच वर्षं काढली. आता दीड महिना झाला, सातत्य बर्यापैकी आहे. भराभर चाललं की भरपूर दमतो पण तसंच न थांबता चाललं की एक प्रकारची सुखद "हाय" नशासदृश जाणीव होते. असा अनुभव आणखी कोणाला आहे का?
लठ्ठ व्यक्ती वेगाने चालली असता गुडघे भरपूर दणकतात. यावर काय करावं? शिवाय मांड्या एकमेकांवर घासून वेदनादायक स्किन इरिटेशन होतं,
ऑफिसच्या मधल्या वेळात चालणं साधता येतं पण इतका घाम येतो की फॉर्मल कपडे भिजून जातात आणि जवळजवळ ओल्या अंगाने एसीत परत यावं लागतं.
कोणाला अशाच इतर अडचणी येतात का?
चला ...लिटरली चला... चाला.....
कीप वॉकिंग... चियर्स...
प्रतिक्रिया
2 Jan 2017 - 1:44 pm | खेडूत
चला...! तुमच्यासारख्या समस्या जाणवल्या नाहीत.
मी सकाळी घराजवळ १-२ किमी, तसेच दुपारी ऑफिसच्या -१ नावाच्या पार्किंगमधे ४ किमी चालतो. इतर एखादा किमी होतेच.
प्रॉजेक्ट बदलला की सहप्रवासी बदलतात. कंपनीच्या न दिसणार्या बाजूची माहिती मिळते हा एक जास्तीचा फायदा. शनिवार-रविवारी कमी चालणे होते.
एकूण ५ किमी किमान चालणे चार वर्षे चालू आहे. वजन सुरुवातीस तीन किलो दोन महिन्यात कमी झाले (७० वरून ६७) नंतर प्रत्येक १०० ग्रामही अंत पहातात. पण आता वजन पहात नाही. निव्वळ चालण्यातच आनंद मिळतो..
2 Jan 2017 - 2:02 pm | अजया
चालणं नाही पण बंद बॅडमिंटन सुरु केलंय आजच. बाकी २५ सु नमस्कार रोजचे सुरुच आहेत.
Thighs irritation टाळण्याचे काही उपाय
१ सायकलीस्ट घालतात तसे कपडे वापरणे.आतून किंवा तेच वापरले तरी चालतील.
२ काॅटन शाॅर्ट्स अजिबात वापरु नये.सिंथेटीक कपडे वापरावेत चालायला जाताना.
३ घर्षण होणाऱ्या भागावर निघताना बेबी पावडर लावावी भरपूर
४ हल्ली शेपवेअर मिळतात.ती थाइज पर्यंत असतात. तो प्रकार वापरता येईल ड्रेसच्या आतून
५ लहान मुलांचं डायपर रॅश क्रिम किंवा खोबरेल तेल लावून बघता येईल.
६ वजन कमी होईल तसा त्रास कमी होत जाईल.
७ Anti chafing gel / balm पण मिळू शकतील.
2 Jan 2017 - 2:39 pm | सानझरी
माहितीपूर्ण प्रतिसाद. धन्यवाद.
2 Jan 2017 - 8:14 pm | गवि
थँक्स. उपयोगी माहितीबद्दल.
9 Jan 2017 - 1:08 pm | माझीही शॅम्पेन
2 Jan 2017 - 2:21 pm | नितीन पाठक
मी दररोज नियमित पणे सकाळी ६.५ किमी चालतो.
2 Jan 2017 - 2:44 pm | सूड
काल आणि आज काय्येक केलेलं नाही.
2 Jan 2017 - 2:58 pm | मोदक
आज सकाळपर्यंत कोकणांतच असल्याने गविंना धागा काढण्याची विनंती केली, धागा काढल्याबद्दल गविंचे अनेक आभार्स..!!
मिपाकरांचे मागच्या महिन्यातील व्यायामाचे आकडे लवकरच अपडेट करतो.
2 Jan 2017 - 3:34 pm | अप्पा जोगळेकर
गेल्या वीकांताला लोणावळा-खोपोली-पेण-पाली-खोपोली-लोणावळा अशी १२० किमी सायकल चालवली. बोर घाटात आणि एक्ष्प्रेसवे ला सायकल चालवणे फारच थरारक. बोगद्यात तर इतर वाहनांसमोर अगदी फट्टू झाली.
8 Jan 2017 - 9:57 pm | लीना कनाटा
आप्पा,
एक्स्प्रेस वे वर सायकल किंवा दुचाकीला परवानगी आहे का?
हे कितीही चित्त थरारक असले तरी सुरक्षितता महत्वाची आहे. काळजी घ्या.
No Safety, Know Pain.
Know Safety, No Pain.
9 Jan 2017 - 12:59 pm | कपिलमुनी
घाटामधे काही कीमी एक्स्प्रेस वे वर सायकल किंवा दुचाकीला परवानगी आहे.
2 Jan 2017 - 8:02 pm | दादा कोंडके
किलोमिटर वगैरेचे हिशेब ठेवत नाही पण गेले दहा वर्षे ऑफिसमधली लिफ्ट वापरत नाही. त्यामुळे रोज किमान १००० पायर्या चढाव्या आणि उतराव्या लागतात.
2 Jan 2017 - 8:55 pm | बाळ सप्रे
1000???
कितव्या मजल्यावर आहे आॅॅफीस???
3 Jan 2017 - 12:07 pm | मोदक
आज २१ किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो.
3 Jan 2017 - 2:07 pm | वेल्लाभट
जुजवी बॉर्म अप
१५*३ पुश अप्स (हात जवळ ठेवून [ट्रायसेप साठी])
१५* २ काफ रेजेस
१५ * २ वन लेग काफ रेजेस
इतकाच.
धाग्यातील 'चालणे' या च्यायामप्रकाराबद्दल असहमती नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये. चालणं, हा 'व्यायाम' होत नाही.
3 Jan 2017 - 3:07 pm | अप्पा जोगळेकर
चालणं, हा 'व्यायाम' होत नाही.
काहीच्या काहीच.
3 Jan 2017 - 3:34 pm | वेल्लाभट
काहीतरीच अपेक्षा ठेवू नका म्हणजे झालं.
3 Jan 2017 - 3:40 pm | वेल्लाभट
यावर आधी चर्चा झाली असल्याने हा धागा भरकटत नाही याची खबरदारी घेतो.
3 Jan 2017 - 3:19 pm | प्रास
आमची नोंद -
नोव्हेंबर महिन्यापासून जॉगिंग सुरू केलंय. त्यापूर्वी साडे तीन वर्ष दिवसाला तीनेक किमीची चाल करत होतो.
नूम कोच नावाचं अॅप वापरतोय सध्या पण हे मधून मधून गळपटतंय.
असो.
मोदकरावांना दिलेल्या आश्वासनानुसार
माझी आजची धाव - ०९ किलोमीटर
वेळ - १ तास १४ मिनिटे
जाळलेल्या कॅलरीज - ११९६
(काही डीलिटलेले आणि काही न नोंदवलेले न धरता)
गेल्या ३० दिवसात
मी १ तास ११ मिनिटे चालून ८०० कॅलरीज् जाळल्यात
आणि
१८ तास ३९ मिनिटे पळून १९००० कॅलरीज् जाळल्यात.
इत्यलम्म|
3 Jan 2017 - 3:27 pm | मोदक
मला अंतर द्या हो प्रासदा... गेल्या महिन्यात किती किमी अंतर चाललात..?
3 Jan 2017 - 3:43 pm | प्रास
अॅपमधल्या नोंद झालेल्या माहितीनुसार (नोंद न केलेली आणि नोंद काढलेली माहिती वगळून)
गेल्या महिन्याभरात (३० दिवसात)
चालणे - ७.२८ किमी
धावणे - १४९.८५ किमी
इत्यलम्म|
3 Jan 2017 - 4:44 pm | वन्दना सपकाल
मी रोज ५० सूर्यनमस्कार घालते.
4 Jan 2017 - 2:19 am | अंतु बर्वा
हो, आधी जाणवायचं नाही, पण आता दिड-एक मैल धावल्यावर एक प्रकारची लय जाणवायला लागते. पाय, ह्रद्याचे ठोके आणि श्वासाची गती एका ठेक्यात येतात आणि एक मस्त फिलिंग यायला लागतं... दुसरं म्हणजे एखादा जरी दिवस बुडाला की चुकल्याचुकल्या सारखं वाटु लागतं.
बॅचलर असताना माझा रुममेट होता तो बाहेर पाच-सहा इंच बर्फ पडलेला असतानाही जिमला जायचा, उन असो पाउस असो, एखादी पार्टी कींवा काही कमिटमेंट असेल तर वेळेआधी जाउन अर्धा तास का होईना जायचाचं.. आम्ही तेव्हा खुप चिडवायचो त्याला पण आता कळतय याच फिलिंगसाठी तो एवढा जीव काढुन जात असणार... :-)
4 Jan 2017 - 2:06 pm | मोदक
आज पण २१ किमी सायकल चालवून हाफिसात पोहोचलो.
4 Jan 2017 - 2:33 pm | बबन ताम्बे
तारकेश्वर मंदिर टेकडीवर (बंडगार्डन,येरवडा) १ जाने. पासून फिरणे सुरू केलेय. मी आणि पत्नी जातो. सकाळी छान हवा आणि कोवळे ऊन असते. टेकडी पण खुप उंच नाहीये. पाच राउंड (५ वेळा चढणे आणि ५ वेळा उतरणे) मारल्या तरी खूप फ्रेश वाटते.
4 Jan 2017 - 2:52 pm | अनन्त अवधुत
फक्त आपणच व्यायाम करत नाही असे वाटायला लागते.
उद्यापासून मी पण करेन काहीतरी.
4 Jan 2017 - 8:43 pm | खग्या
हल्ली दररोज १०००० पावले चालतो.
4 Jan 2017 - 9:03 pm | सही रे सई
सोमवारी जवळपास ३० मिनिट चालणे (अंदाजे ३ माईल्स) आणि अप्पर बॉडी वर्क आउट केला. आणि मंगळवारी २० मिनिट सायकलिंग (४.२ माईल्स) व लोअर बॉडी वर्क आउट केला.
रोज असाच व्यायाम केला कि इथे टाकेन.
10 Jan 2017 - 8:27 pm | सही रे सई
मागच्या आठवड्यात ४ दिवस व्यायाम झाला. सध्या २० मिनिट सायकलिंग (इंटर्वल प्रोग्राम) वर ५ लेवेल ला केलं. अंतर -८ किलोमीटर दर दिवशी.
याशिवाय मशीन्स वर अप्पर बॉडी व लोअर बॉडी वर्क आउट एक दिवसा आड करत आहे. तसेच २ दिवस अॅब्स आणि झोपून करायचे व्यायाम केले.
आता हळूहळू ३० मिनिट सायकलिंग करणार आहे.
मशीन्स वरचा व्यायाम सेट्स आणि वजन हळू हळू वाढवत आहे. त्याने आता हात पाय दुखायला सुरुवात झाली आहे.
5 Jan 2017 - 12:22 pm | अमर विश्वास
मागच्या आठवड्यात भारतात परत आलो. गेले महिनाभर व्यायाम बंदच होता.
आता पुनश्च हरिओम
काल ३ किलोमीटर पळालो
नंतर १५*२ सेट जोर
२५*२ सेट बैठका
जिम चालू करायची आहे
5 Jan 2017 - 8:18 pm | सूड
झेपेल इतपत पोहणे चालू आहे.
5 Jan 2017 - 8:27 pm | गवि
पोहण्याने का कोण जाणे पण फारच भूक लागते. दुप्पट खाशी अशी स्थिती होते. इतर कोणाला असा अनुभव आहे का?
5 Jan 2017 - 8:37 pm | सूड
भूक लागते, पण दुप्पट वैगरे नाही.
5 Jan 2017 - 8:56 pm | मोदक
गणामास्तरने एका प्रतिसादात हे लिहिले होते.
12 Jan 2017 - 10:53 am | गणामास्तर
दुप्पट खाशी असा अनुभव मला पण आलाय गवि. मध्यंतरी सकाळी लवकर पोहायला जात होतो तेव्हा अशी सपाटून भूक लागायची कि घरी आल्यावर नाश्ता करून निघायचो आणि हापिसात पोचल्यावर परत ऑम्लेट नाय तर उकडलेली अंडी हाणायचो. ४ दिवसात वजन ६८ वरून ७१ झाले.
मग बंद केलं पोहायचं. :)
12 Jan 2017 - 12:20 pm | बाळ सप्रे
हे म्हणजे त्या जोकसारखं झालं..
खूप वाचलं 'दारूचे दुष्परीणाम' याच्यावर आणि ठरवलं .. आता बंद...
.
.
अशी पुस्तकं वाचणं :-)
12 Jan 2017 - 12:30 pm | गणामास्तर
काय करणार. पोहणे थांबवू शकतो, खाणे नाही :(
जन्म खायला झालाय ते व्यवस्थित चालूये. पुढच्या जन्मी मासा व्हावे कसे ;)
12 Jan 2017 - 12:50 pm | बाळ सप्रे
सहज गमतीत लिहिलं.. हलकेच घ्या. (हे लिहायच राहिलं :-) )
खाण्यावर पुढेमागे (आणि आत्तादेखिल) रिस्ट्रिक्शन्स येउ नयेत हा माझ्यादेखिल व्यायामामागचा एक हेतु आहे.. :-)
12 Jan 2017 - 12:56 pm | गणामास्तर
अहो मजेतचं घेतलं होतं. जस्ट चिल्ल.
मी अजून खूप तरुण आणि फिट आहे, एवढी थंडी जरा कमी झाली कि चाललोचं परत पोहायला ;)
12 Jan 2017 - 3:35 pm | सूड
माझ्या खाण्यात एक जास्तीची पोळी वगळता शष्प फरक पडला नाहीये राव.
12 Jan 2017 - 3:45 pm | बाळ सप्रे
पोहोताना श्वसनाचे तंत्र नीट न जमल्यास उगाच जास्त दमल्यासारखे वाटते .. त्यामुळे असेल का ??..
12 Jan 2017 - 3:58 pm | सूड
तुम्हाला नीट घेणं जमत नसेल तर दमल्यासारखं वाटतं हे खरंच आहे!! पण गणामास्तरचा तो प्रकार असेल असं वाटत नाही. खायला बसल्यानंतर मुळातच रवंथ करत खायची माझी सवय भुकेच्या वरताण होत असावी. =))
6 Jan 2017 - 11:53 am | प्रशांत
आज ऑफिस ला सायकल ने आलो, १० किमि २८ मिनिट मधे
6 Jan 2017 - 12:59 pm | सुकामेवा
मी ३ जानेवारीला ३० किमि व आज १५ किमि सायकल हाफिसात येताना चालवली आहे. घरी जाताना १५ आजुन होइलच....
6 Jan 2017 - 3:06 pm | प्रशांत
strava app वापरता कास?
6 Jan 2017 - 4:37 pm | सुकामेवा
आता सेटअप मध्ये थोडेसे बदल केले आहेत बघू घर
6 Jan 2017 - 5:04 pm | सुकामेवा
strava app हँग त आहे आता सेटअप मध्ये थोडेसे बदल केले आहेत बघू घरी जाताना वापरून बघतो
6 Jan 2017 - 8:33 pm | गोपिनाथ राजाराम काले
सकाळी ५की.मी. चालतो.
6 Jan 2017 - 8:52 pm | पिलीयन रायडर
३ जानेवारी- १ तास योगासने
४ जानेवारी - १५ मिनिटं ट्रेडमिल आणि इतर बारिक सारिक गोष्टी करुन पाहिल्या जिममध्ये. अॅब्ससाठी वगैरे काय काय असतं ना.. ह्यात एक प्रश्न आहे. ट्रेडमिलवर किती चालायला हवं? किती स्पीडने? मी रॅण्डम प्रोग्राम घेतला होता ज्यात मध्येच इलावेशन वाढायचं.. मध्येच कमी व्हायचं.. स्पीड ४ ठेवुन पाहिला आणि टोटल १ माईल चालले. १०० कॅलरीज जळाल्या. तर ह्या सगळ्या पॅरामीट्र्सचे आदर्श प्रमाण हवे आहे. ह्यात ट्रेडमिलवर पळायचं सुद्धा असतं का? मी चालु कितीही शकते.. पळलं की लवकर दमते.
५ जानेवारी - १ तास बॉलीवुड डान्स
६ जानेवारी - विश्रांती!
6 Jan 2017 - 10:25 pm | सूड
ट्रेडमिलवर पळण्यापेक्षा, एखादं मैदान असेल तर बघा. फन्कशन ट्रेनिंग लावलं होतं एक महिना, एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं.
7 Jan 2017 - 12:23 am | पिलीयन रायडर
इथे थंडी आहे हो खुप. बाहेर पडुन पळणं सध्या शक्य नाहीये.
7 Jan 2017 - 1:34 am | आनंदयात्री
मी शिकाऊ आहे, मागच्या ४-5 महिन्यात केलेली हि प्रगती.
१. पहिला महिना -
सलग ४० मिनिटे चालणे जमवले. सुरुवात २० मिनिटांपासून केली होती. रोज हळूहळू २-३ मिनिटे वाढवली.
या महिन्यात चालण्याचा जास्तीत जास्त वेग ३.६ एलेव्हेशन ०.
पायात दुखणे वैगेरे साध्य साध्य अडचणी आल्या. अगदी पहिल्या दिवसामध्ये दार दहा मिनिटांनी ३० सेकंदाचा ब्रेकही घेतला.
काय शिकलो?- मध्ये मध्ये पाण्याचा घोट घेतला कि स्टॅमिना टिकून राहतो.
२. दुसरा महिना -
सलग ४० मिनिटे चालणे. एलेव्हेशन ०.५, ३.७ ते ३.८ ने चालता यायला लागले.
काय शिकलो?- चालणे मोनोटोनस. वर्कआउटला साजेशी गाणे ४० मिनिटे ऐकणे म्हणजे कानांवर अन मेंदूवर अत्याचार व्हायला लागले. बातम्या किंवा आवडीच्या विषयांचे व्हिडीओ, लेक्चर्स पाहायला सुरुवात केली.
३. नंतर आजवर-
२-३ आठवडे सलग गॅप पडला, भीती वाटली कि 'ये रे माझ्या मागल्या' .. पुन्हा चालणे बंद होतेय. पण सुरु करता आले.
दर वीस मिनिटांच्या सेक्शन मध्ये २ मिनिटे असे पळायला सुरुवात केली. आता मागच्या दोन आठवड्यात सलग ४-५ मिनिटे जमायला लागले आहे.
काय शिकलो?- पळणे आवडीच्या गाण्याला सुरु करावे. कमी स्पीडने पळाले तर जास्त काळ पळता येते. स्टॅमिना नुसार स्पीड आपोआप वाढेल.
सध्या - चालणे ३.७-३.८ ने, पळणे ४.१ - ४.५ ने. एलेव्हेशन १.५. वीकडेज मध्ये ४० मिनिटे (२.५-३.० माईल) आणि विकेंडला ६० मिनिटे पूर्ण (3.५-4.० माईल).
कॆलरीज? - यंत्रावर करेक्ट कॆलरीज मोजायला रोज वजन एंटर करावे लागते, त्यामुळे कॆलरीजचा ट्रॅक ठेवला नाहीये. फिटनेस गॅजेटहि घेतलेले नाही. गुगल फिट मध्ये नोंद मात्र ठेवतो.
टार्गेट- बरोबर व्यायाम करणारा मित्र ६.५ च्या स्पीडने एक तास पळतो. साताठशे कॆलरी सहज उडवतो. त्याच्यासारखे पळणे जमवायचा मानस आहे .. त्यामुळे दिल्ली दूरही नाही बहोत दूर है .. हे जाणून आहे :)
थोडक्यात काय पॅरामीटर्सचे आदर्श प्रमाण हे तुमच्या स्टॅमिनाशी डायरेक्ट्ली प्रपोर्शनल आहे, अशी माझी सध्याची धारणा आहे.
8 Jan 2017 - 7:52 am | पिलीयन रायडर
ओके!
तुमच्या प्रतिसादतुन मी काय शिकले?
१५ मिनटं चालणं अगदीच बाळबोध आहे. अजुन फार म्हणजे फार जास्त चालायला हवंय. आणि ते ही रोज.
साधारण तुमच्या सारखीच स्ट्रॅटर्जी ठेवते. आणि हळुहळु वाढवत नेते.
8 Jan 2017 - 11:03 am | अमर विश्वास
एरवी ट्रेडमिलवर नीट पळणार्या आम्हा लोकांना सणस ग्राऊंडचे दोन राउंड मारताना धापा टाकायला व्हायचं....
हे फारसे पटत नाही.
मी स्वात: गेले ५+ वर्षे ट्रेडमिलवर पाळतो आहे . पण १० किमी रनिंग रेस कम्प्लिट करताना किंवा हिमालयात ट्रेकिंग करताना मला अजिबात धापा टाकाव्या लागत नाहीत.
ट्रेडमिलवर पाळण्याची (अर्थात प्रत्येक व्यायामाची) एक पद्धत असते व योग्य पद्धतीने व्यायाम केल्यास योग्य फायदे मिळतात
ट्रेडमिलवर पळताना मला जाणवलेल्या काही गोष्टी :
१. ट्रेडमिल वर रोज पळू नये. आठवड्यात जास्तीतजास्त ३ ते ४ वेळा ट्रेडमिल वापरावी. उरलेले दिवस सायकलिंग / क्रॉस जॉगर वापरावा
२. पळण्यात प्रगती होण्यासाठी पायाचे स्नायु तयार होणे फार म्हत्वाचे असते. आठवड्यातून किमान २ वेळा पायांचा व्यायाम करावा (Squats / lunges / calf Raises यासारखे व्यायाम )
३. पाळण्यापूर्वी वॉर्म अप जरूर करावा
४. ट्रेडमिल वर पाळताना एकाच वेगाने फार वेळ पाळण्यापेक्षा वेग कमीजास्त करावा / एलेवेशन बदलावे
५. ट्रेडमिल झिरो एलेवेशनवर न ठेवता ०.५ इन्क्लीनशनवर ठेवावी
६. ट्रेडमिल वर ६ KM /Hrs व झिरो एलेवेशन हे ब्रिस्क वॉलकिंग समजावे ६ ते ८ KM /Hrs हे जॉगिंग व ८ KM /Hrs च्या पुढे रनिंग समजावे
पळण्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी काही गोष्टी :
१. हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग चा वापर करावा
२. ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट ठेवून जास्तीतजास्त अंतर पाळण्याचा प्रयत्न करावा (रेकॉर्ड ठेवावे) सुरवातीला ३० मिनिटे जास्त वाटत असतील तर वीस मिनटे किंवा १५ मिनिटांचे दोन सेट करावे
३. एका आठवड्यात ४ वेळा पळत असाल तर एकदा हाय इंटेन्सिटी इंटर्वल ट्रैनिंग, दोन वेळा ३० मिनिटे पाळण्याचे टार्गेट व एकदा लॉन्ग डिस्टन्स रनिंग / ब्रिस्क वॉकिंग करावे
परत एकदा .. वॉर्म अप आणि कुलडाऊन विसरू नये
हॅपी रनिंग
8 Jan 2017 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गविशेठ अभिनंदन. लव यू यार... चालायला सुरुवात केली बरं वाटलं. हळुहळु स्पीड नाय वाढवलं तरी चालेल पण चलते रहो. :)
गेली दोन महिन्यांपासून माझं चालणं बंद आहे, अर्थात कामाचा व्याप होता आणि जरा पडलेली थंडीही कारणीभूत होती. पण, गविसेठ तुम्हाला शब्द देतो या आठवड्यात माझं चालणं नियमित असेल.
कुछ अजीब सा रिश्ता हो गया है
मेरे और उसके दरमियान
ना नफरत हो रही है
और ना मोहब्बत....!
-दिलीप बिरुटे
9 Jan 2017 - 7:36 am | मोदक
विकांताला प्रशांत मालकांसोबत सायकलने तिकोना पायथा गाठला
एकूण सायकलिंग - 135 किमी
10 Jan 2017 - 10:49 am | वेल्लाभट
२५+२५ पुश अप्स
२५ ट्रायसेप डिप्स
५२ सेकंद प्लँक
हे वॉर्म अप नंतर
सध्या वेळेअभावी असं तुटपुंजंच काहीतरी केलं जातंय, पण काहीच नाहीपेक्षा हे बरं या विश्वासाने करतोय.
10 Jan 2017 - 8:39 pm | गवि
दुपारी दोन तास शवासन केले. पाठदुखीने.
रात्री आठ तास करणार.
10 Jan 2017 - 11:23 pm | कुंदन
लढ बाप्पु
11 Jan 2017 - 12:02 am | मोदक
कॅलरीज किती जळाल्या म्हणे..? ;)
11 Jan 2017 - 11:30 am | हकु
10 किमी धावलो.
स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन ची तयारी.
माझ्यासाठी हाफ मॅरेथॉन.
11 Jan 2017 - 11:42 am | बाळ सप्रे
मुंबई मॅरॅथॉनसाठी शुभेच्छा..
आणखी कोण कोण मिपाकर धावणार आहेत मुंबइत या रविवारी ??
11 Jan 2017 - 12:42 pm | अनिल मोरे
मी पण!!!
11 Jan 2017 - 1:21 pm | बाळ सप्रे
ऑल द बेस्ट..
हाफ की फुल??
12 Jan 2017 - 12:54 pm | अनिल मोरे
फुल्ल. पहिलाच प्रयत्न आहे.
11 Jan 2017 - 1:39 pm | शलभ
मी पण. फुल.
12 Jan 2017 - 12:58 pm | माझीही शॅम्पेन
मी सुद्धा हाफ मॅरेथॉन धावतोय __/\__
12 Jan 2017 - 1:31 pm | बाळ सप्रे
अरे वा..
३ फुल २ हाफ मिपाकर्स @SCMM
सोमवारी इथे नक्की अपडेट करा सगळ्यांनी..
12 Jan 2017 - 6:26 pm | मोदक
हा एक फॉरवर्ड मेसेज आला आहे.. खराखोटा माहिती नाही.
**************************************
Central Railway has decided to run 2 suburban special trains one each from Kalyan and Panvel Station on Sunday 17.01.2016 for the benefit of the participants of Standard Chartered Mumbai Marathon being held at CST, Mumbai on 17.01.2016.
The details are as under-
Kalyan – CST special will leave Kalyan at 03.00 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus, Mumbai at 04.30 hrs stopping at all stations.
Panvel – CST special will leave Panvel at 03.10 hrs and will arrive Chatrapati Shivaji Terminus at 04.30 hrs via Harbour line stopping at all stations.
However, local trains towards Chatrapati Shivaji Terminus leaving Kalyan at 04.41 and leaving Vashi at 04.00 will remain cancelled.
All concerned to please take note of this and avail the facility.
**************************************
12 Jan 2017 - 6:58 pm | शलभ
मला पण आलाय. पण गेल्या वर्षीचा आहे. १७.०१.२०१६.
11 Jan 2017 - 11:56 am | नावातकायआहे
९८.९ कि मी चालणे झाले सरासरी रोज ३.१९
एक दिवस हि खाडा नाही हि जमेची बाजु..
11 Jan 2017 - 10:29 pm | एस
या महिन्यात काही अपरिहार्य कारणास्तव व्यायाम पूर्ण बंद झाला. पण आता सुरू करणार आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने पळणे किंवा जिने चढणे इ. प्रकारांवर मर्यादा आली आहे. पण तरीही अधूनमधून डोंगरयात्रा सुरू असतात. आता सायकलिंग पुनःश्च सुरू करेन.
12 Jan 2017 - 10:34 am | बाळ सप्रे
फिजिओथेरपी/ रीहॅब सातत्याने चालू ठेवा.. अजिबात दुर्लक्ष करू नका.. शस्त्रक्रीयेनंतरही पुन्हा धावता येतं ..
11 Jan 2017 - 10:40 pm | स्रिहेरि
पोट कमी कसे करावे ... याबद्दल कोणी माहिती देईल काय
12 Jan 2017 - 1:53 pm | गवि
तीन किमी एका फेरीत चाललो. माझ्यासाठी अचिव्हमेंटच.
आता ध्येय चार किमी. मग पाच.
सातत्य जास्त महत्वाचं. वजन पुढे फार नाही उतरलं तरी सलग "चालता येतंय", " दम कमी लागतोय", "पूर्ण श्वास येतोय" हेच आनंदाचं वाटतंय.
12 Jan 2017 - 3:04 pm | मोदक
आभिनंदन हो गवि. तुमच्या तुलनेत १०% जरी सातत्य मला मिळाले तरी महिन्याला हजार किमी सायकलिंग होईल.
12 Jan 2017 - 3:28 pm | गवि
तुम्हाला आमच्याकडून प्रेरणा मिळणं म्हणजे नळाच्या आशीर्वादाने पाऊस पडण्यापैकी आहे.
12 Jan 2017 - 5:29 pm | डॉ श्रीहास
गतवर्षी.... ५९४७ किमी सायकलींग,पळणं आणि चालणं असं झालंय; ह्या वर्षाची सुरवातच पायाच्या दुखावण्यानी झाली आहे पण बरं वाटलं (त्याहून महत्वाचं आळस झटकला की ) जोमात सायकलींग सुरू करणार आहे !
12 Jan 2017 - 6:30 pm | बाळ सप्रे
बापरे !!!
एवढ अंतर माझं ३-४ वर्षात मिळून झालं असेल..
दंडवत _/\_
12 Jan 2017 - 10:12 pm | डॉ श्रीहास
जमतय तेवढं केलं.... ह्या व्यायामाच्या धाग्याचा फार चांगला परिणाम दिसून येतो आहे !!
तुम्ही मॅरेथाॅनर आहात ... पळणाऱ्या लोकांबद्दल फाऽऽऽर आदर आहे मला म्हणून तुम्हाला _/\_.....
Keep going....Keep inspiring!!
13 Jan 2017 - 10:54 am | अप्पा जोगळेकर
सप्रे साहेब फक्त मॅरेथॉनर नाहीत. ते बीआरेम ला सायकल वगैरे पण चालवत असतात. त्यांच्या प्रतिसादात तसे लिहिले होते २-३ वेळा. आणि बहुधा एन्ड्युरो पण केली आहे.
14 Jan 2017 - 7:22 pm | डॉ श्रीहास
सप्रेसाह्येबांबात हे माहिती नव्हतं... धन्यवाद अप्पा :)
12 Jan 2017 - 7:13 pm | अनरँडम
मी जवळ जवळ ७-८ महिन्यांपासून रोज किमान ३ ते ४ मैल (ट्रेडमिलवर) पळतो. या काळात माझे वजन वीसेक पाउंड्स कमी झाले आणि पोटाचा घेर लक्षणीय कमी झाला (पण पूर्णपणे सपाट झाले नाही). नोवेम्बर-डिसेंबर काळात पळणे एकदमच थांबले. मागच्या दोन आठवड्यांपासून पुन्हा सुरू झाले. एकदा सवय झाल्यानंतर पळणे हे एक उत्तम तणावमुक्तिचे औषध आहे. सुरूवातीला (सवय नसल्यास) पळणे २-३ मिनिटांपेक्षा अधिक करवत नसे. पण रोज थोडीफार प्रगती होते. मागच्या खेपेला एकदा मी सलग ८ मैल पळू शकलो होतो. मी कुठलेही अॅप वापरत नाही.
काल २३ पुश-अप्स आणि साडेतीन मैल पळणे.
13 Jan 2017 - 6:15 pm | मोदक
अरे व्वा.. अभिनंदन..!!
13 Jan 2017 - 10:49 pm | अनरँडम
कालचे पळणे : साडेतीन मैल
पुशअप्स : २४
माझ्या फोननुसार पळणे सोडून इतरत्र चालणेणे: ६१११ पावले
14 Jan 2017 - 4:03 pm | जावई
कृपया समस्त जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन करावे ..
मला माझा धावण्याचा (100m,1600m)स्टॕमिना वाढविण्यासाठी पूरक व्यायाम सुचवा...आणि आहार पण सुचवा.
14 Jan 2017 - 10:50 pm | प्रशांत
आज 41 किमी सायकल चालवली
15 Jan 2017 - 2:43 pm | मोदक
काल 128 किमी सायकलिंग केले
आज कर्नाळा ट्रेक केला
15 Jan 2017 - 2:45 pm | वेल्लाभट
गेले दोन दिवस
३ किमी
३ किमी
धावलो. त्यात अर्धा किमी स्प्रिंट अंतर्भूत होती.
15 Jan 2017 - 6:19 pm | एस
सर्व मॅरेथॉन धावकांचे अभिनंदन.
आज ११ किमी सायकल चालवली.