नोटा रद्द -बदल . काही विरोधाभासी विधाने :)

सुज्ञ's picture
सुज्ञ in जनातलं, मनातलं
14 Dec 2016 - 2:09 pm

नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. पण या निमित्ताने मात्र अनेक चर्चांमधून , नेत्यांकडून अथवा पक्षांनी मांडलेल्या भूमिकेतून, मीडिया मधून बाहेर आलेली व जाणवलेली ही मजेशीर विरोधाभासी विधाने. काही विधाने वेगवेगळ्या वेळेस केली गेली ती सलग वाचता यावीत म्हणून त्याचे भाग पाडले आहेत . ( अ , ब वगैरे ) तर . एन्जॉय ..

१. ज्यांच्या पैसा पांढरा आहे तेच रांगेत उभे आहेत . काळ्या पैशेवाले मजेत घरात बसून आहेत . पैसे बदलायला बँकेत नाही आले . :))))

२. घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत . आता उद्यापासून काय खायचे हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे .
( म्हणजे आत्तापर्यंत नोटा न वापरता घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवल्या होत्या तर सर्व सुरळीत चालू होते आणि आता त्याच नोटा स्वतः च्याच बॅंक खात्यात भरल्यावर खायचा प्रश्न उभा राहिला )

३. अ ) मोदी मनमानी निर्णय घेत आहेत . कुणालाही विश्वासात घेत नाहीत . मंत्रिमंडळास देखील अंधारात ठेवले आ) भाजपीयांना हे सर्व आधीपासूनच माहीत होते .त्यांनी आधीच पैसे पांढरे केले. ई) इन्कम टॅक्स च्या धाडीत भाजपेयी च जास्त सापडत आहेत :)))))

४. अ) सर्व राष्ट्रीय बँका बुडवायचे सरकार चे धोरण आहे . ब ) मल्ल्या चे कर्ज बँकांनी माफ करून टाकले आणि आता बॅंका बुडू नयेत म्हणून पाचशे हजार च्या नोटा आपल्याकडूनच गोळा करत आहेत ( म्हणजे आत्तापर्यंत फक्त मल्ल्या च्या कर्जवसुलीवरच बँक चालू आणि फायद्यात होत्या ) :)))

५. मल्ल्या ला आणखी कर्ज पाहिजे. बँका ते द्यायला तयार आहेत फक्त बँकेत पैसे नाहीत. :)) ( म्हणजे मल्ल्या च्या संपत्तीवर जप्ती वगैरे खोटे आहे तर )

६. अ) अनेक दुकानदार धंदा तोट्यात आहे असे दाखवून टेक्स बुडवतात. सरकार अशा लोकांना किती रोखणार . हेच ते छोटे मासे वगैरे. आ) दुकानदार वगैरे लोकांना कार्ड कटकटीचे ठरत आहे. सोयीचे असेल तेथे मी पण नोटाच प्रेफर करेन.

७. सरकार ला काळ्या पैशाबाबत काहीच करायचे नाही. त्यांना फक्त स्वतः चा टैक्स वाढवायचा आहे (म्हणजे काय ??)

८. अ) लोक बैंक मॅनेजरशी वगैरे आपापसात सेटिंग लावून पैसे पांढरे करत आहेत . आ)लोक काहीही करून आपले पैसे पांढरे करतच आहेत म्हणायचे इ)लोकांचे असले हे आपापसातील व्यवहार हेच सरकारचे व या योजनेचे अपयश आहे. ( बहुदा प्रत्येक बँक मॅनेजर च्या पाठीमागे एक गुप्त हेर लावला असता तर असे झाले नसते व योजना यशस्वी ठरली असती किंवा नोटबंदी नंतर एका रात्रीत सर्व लोक प्रामाणिक वागू लागतील हा या योजनेचा उद्देश होता असे कोणी समजले कि काय ?)

९. सैनिक शाहिद होत असताना आपण काही वेळ रांगेत रांगेत उभे नाही राहू शकत ? ( सैनिक व आपलेच पैसे रांगेत भरण्यासाठी थांबलेल्या लोकांचा तसा संबंध नाही . कदाचित लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी असे म्हणत असतील )

१०. अ )रांगेतील लोकांबाबत सरकार जागरूक नाही . लोकांशी त्यांना काहीच देणेघेणे नाही ब) नोटबंदी संदर्भात सरकार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत व बदलत आहे ( म्हणजे वेळोवेळी घेतलेले निर्णय लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून घेतले का कसे?)

नोट : वरील लिखाण हे केवळ आत्तापर्यंत अनेक विधानांमध्ये विरोधाभास जाणवला म्हणून केले आहे. आणि केवळ एक गंमत म्हणून लिहिले आहे मणिपूर मधील एका छोट्याशा गावातील मजुरापासून ते मुंबई मधील मोठ्या दुकानदारांपर्यंत सर्वाना या नोटबंदीची कमीअधिक प्रमाणात झळ पोचली आहे आणि हे सर्वाना मान्य आहे . आम्ही त्यांच्या भावनांशी प्रामाणिक आहोत. वरील लिखाणामध्ये अशा सर्व लोकांची थट्टा करण्याचा कोणताही हेतू नाही. कृपया परत चालू होऊ नका.

तर येउद्या अजून काही.. :)

वावरप्रकटनसद्भावना

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 2:49 pm | संदीप डांगे

बरं झालं तुम्ही हा धागा काढला. काही गमती जमती चालूच होत्या. नेमक्या कुठे टाकाव्या तेच कळत नव्हतं.

१. सौ के नोट की कोई किमत थी क्या आठ नवंबर से पहले? ५० रुपये की किमत थी क्या? छोटे को कोई पूछता था क्या? गरिब की ताकत बढाने के लिये मैने ये काम किया.
00 rupee note had no value earlier but since 8 November everyone understands the value of 100, 50 and 20 rupee notes. This move is to empower the poor.
- माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे दिव्य विचार.

२. कॅशलेस ट्रॅन्झॅक्शन्स ची संख्या ३००+ टक्के (आता जास्तच असेल) वाढली. >> म्हणजे नाक दाबायचं आणि मग तोंडाने श्वास घेणार्‍यांची संख्या वाढली याबद्दल पाठ थोपटून घ्यायची. रोख उपलब्धच नाहीये तर कॅशलेस वाढणारच. त्यात अचिवमेंट असल्यासारखे काय ते कळले नाही. =)) असो. कुणाला कशात आनंद वाटेल आपण काय सांगणार.

और भी बहुत है... =))

क्रमशः

पुंबा's picture

14 Dec 2016 - 5:00 pm | पुंबा

यातला क्र. १ अक्षरशः निर्लज्जपणा आहे. मोदींसारख्या लोकनेत्याला असलं बोलणं शोभत नाही. निव्वळ पप्पूगिरी.

आनंदी गोपाळ's picture

14 Dec 2016 - 2:57 pm | आनंदी गोपाळ

घर मे शादी है, पर नोट नही है! हाहाहा

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 3:49 pm | संदीप डांगे

• कांग्रेस के नेता कांग्रेस के मुख्यालय में बैठकर काले धन को सफेद करने का काम कर रहे हैं। - प्रकाश जावडेकर.

(पण आतापर्यंत तर भाजप कार्यकर्तेच पकडले गेलेत नव्या नोटांच्या मोठ्या रकमांसह... =)) )

प्रचेतस's picture

14 Dec 2016 - 6:22 pm | प्रचेतस

(पण आतापर्यंत तर भाजप कार्यकर्तेच पकडले गेलेत नव्या नोटांच्या मोठ्या रकमांसह... =

म्हणजे नोटाबंदी बाबत मोदी सरकार आपल्या कार्यकर्त्यांची देखील गय करत नाही असा अर्थ होत नाही का?

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 7:37 pm | संदीप डांगे

हे तर मत झालं हो. वैयक्तिक मतानुसार अर्थच काढायचे तर बरेच अर्थ काढता येतील. सध्या तथ्य व विसंगती असा विषय आहे धाग्याचा. :)

सुज्ञ's picture

14 Dec 2016 - 10:15 pm | सुज्ञ

आपल्याला धाग्याचा विषय अजूनही समजलेला नसावा तरीच असले प्रतिसाद देताय.

एकाच विचाराच्या समूहाने,पक्षाने,किंवा त्याच व्यक्तीने वेगवेगळ्या वेळी आपण आधी दिलेल्या मताविरुद्ध / अथवा त्या मताशी विसंगत मते देणे (बोलणे) याला सर्वसामान्यपणे विरोधाभास म्हणतात.
जावडेकर एक बोलणार आणि त्यावर आपण आपले वैयक्तिक मत ठोकून देणार यास विरोधाभास नाही तर विरोध म्हणतात.

अर्थात जावडेकरांच्या बोलण्यावर आपण जे स्वतः मत मांडले त्यात खरेच तथ्य असल्यास येथे सर्वाना दाखवा ( म्हणजे अ) कांग्रेस के नेता कांग्रेस के मुख्यालय में बैठकर काले धन को सफेद करने का काम कर रहे हैं एकतर असे अजिबात होत नाही असे तरी दाखवा किंवा ब)आपण बोलल्याप्रमाणे आतापर्यंत तर (फक्त)भाजप कार्यकर्तेच पकडले गेलेत असे तरी दाखवा तर त्यास आम्ही जावडेकरांच्या विधानाचा विरोधाभास समजू)

कृपया कशाच्याही विरुद्ध मत ठोकून दिले म्हणजे त्याला विरोधाभास म्हणत नसतात. इतके मराठी यानिमित्ताने समजले तरी पुरे.

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 11:14 pm | संदीप डांगे
कांग्रेस के नेता कांग्रेस के मुख्यालय में बैठकर काले धन को सफेद करने का काम कर रहे हैं एकतर असे अजिबात होत नाही असे तरी दाखवा

जावडेकर जे म्हणाले त्यामागे एका साप्ताहिकाचं स्टींग ऑपरेशन आहे ज्यात ते नेतेमंडळी जुन्या नोटा बदलुन द्यायची 'ऑफर' देत आहेत. नोटा बदलून देतांना रंगेहाथ पोलिसांनी, आयकरविभागाने कोणाला पकडलं आहे ह्याची बातमी आली असेल तर सांगा. आता ४८ तास उलटून गेलेत बातमी येऊन. स्टींग झाल्यावर धाडी पडायला हव्या होत्या ताबडतोब त्या स्टींगमधे सापडलेल्यांवर. का नाही पडल्यात काय माहीत?

आपण बोलल्याप्रमाणे आतापर्यंत तर (फक्त)भाजप कार्यकर्तेच पकडले गेलेत असे तरी दाखवा

इतर कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नव्या जुन्या नोटांसह पकडल्या गेल्याची बातमी आली असेल तर सांगा बॉ.... मलाही नवीन काहीतरी कळेल.

बाकी, मोदी फक्त आपल्याच पक्षातल्या लोकांना पकडतात मात्र दुसर्‍यांना (सापडले असतील तर) सोडून देतायत हे काही पटत नै बॉ. का मालूम इसमें भी कोनो गुप्त प्लान हो. :)

जावडेकरांना आपल्या नाकाखाली काय जळतंय ते सांगायचं नाही पण दुरून कुठेतरी वास आला तर वणवा पेटल्याचा आभास करायचाय. ह्यात विरोधाभास नसेल तर नसो बापडा, आम्हाला मराठी कळत नाही, हिंदीही कळत नाही. काहीच कळत नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2016 - 8:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

मोदी सरकार एकही गोष्ट बरोबर करणार नाही, हे फायनल ठरलेय ना आपले ? मग अजिबात दुसरा विचार करायचा नाही. =)) =)) =))

प्रचेतस's picture

14 Dec 2016 - 9:03 pm | प्रचेतस

अगदी =))

नितिन थत्ते's picture

14 Dec 2016 - 4:31 pm | नितिन थत्ते

>>कांग्रेस के नेता कांग्रेस के मुख्यालय में बैठकर काले धन को सफेद करने का काम कर रहे हैं। - प्रकाश जावडेकर.

अशी ऑफिसात बसून पैसे पांढरे करण्याची काय ऐड्या आहे काय?

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 4:51 pm | संदीप डांगे

७० वर्षे तळघरात साठवल्यामुळे कुजून काळ्या झालेल्या नोटांना डिस्टेम्पर मारुन सफेद करत असतील... =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2016 - 5:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

बहुदा प्रत्येक बँक मॅनेजर च्या पाठीमागे एक गुप्त हेर लावला असता तर असे झाले नसते व योजना यशस्वी ठरली असती हे तर लै भारी !

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 5:59 pm | संदीप डांगे

ओवेसीने मुस्लिम भागातले एटीएम जाणून बुजून बंद ठेवल्याचा ठणाणा करुन गोची केली न्यूजचॅनेलची.
कालपर्यंत सांगत होते, सगळीकडे पैसे नीट मिळतायत, आता म्हणतायत ओवेसे खोटं बोलतो, पैसे तर सगळीकडेच गायब आहेत....

=)) =))

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Dec 2016 - 8:34 pm | हतोळकरांचा प्रसाद

कोणते न्युज चॅनेल्स हो?

रामपुरी's picture

14 Dec 2016 - 9:02 pm | रामपुरी

असले अडचणिचे प्रश्न विचारू नका मालक, गोची होते. उद्या विचाराल रोख २० लाख घेऊन कुठे ट्रक फिरतात काय? :) :) ते सांगतात, आपण फक्त "ब्वॉर्र" म्हणायचं असतंय.

धर्मराजमुटके's picture

14 Dec 2016 - 9:10 pm | धर्मराजमुटके

प्रश्न बरोबर असो की चुकीचा पण इथल्या बर्‍याच जणांना घाण्याच्या बैलाप्रमाणे तिथेचं गोलगोल फिरायचा कंटाळा कसा येत नाही असा विचार करतोय आजकाल.
असो.

संदीप डांगे's picture

14 Dec 2016 - 9:30 pm | संदीप डांगे

=)) =))

करणार तरी काय बिचारे. चुकून माकून एक अगदी क्षुद्र मुद्दा हाती लागलाय (वीस लाखाचा ट्रक धरुन बसलेल्यांच्या मेंदूच्या मानाने बराच डोंगराएवढा असावा तो). बसतायत वाजवत. कुणाला कशात आनंद सापडेल आपण काय सांगणार?

लेट द बुल्स एन्जॉय द ट्रक्स!!!

आजानुकर्ण's picture

14 Dec 2016 - 11:28 pm | आजानुकर्ण

=)) =))

रामपुरी's picture

15 Dec 2016 - 2:47 am | रामपुरी

" मेंदूच्या मानाने बराच डोंगराएवढा असावा तो"
लहानपणी एक म्हण ऐकली होती. "आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला". अचानक तिचा वापर करायची वेळ आली बघा. कुठ्ल्या ज्ञानाचा कधी कसा कुठे उपयोग होईल सांगता येत नाही. :) :)
बसा वाजवत किंवा आनंद साजरा करत किंवा गोल गोल फिरत, कसेही. आम्ही चाललो. इत्यलम

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Dec 2016 - 11:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे त्या विषयावरचा ओवेसीसंबंधीचा १३ डिसेंबर २०१६ चा एक संपूर्ण इपिसोड पाहता येईल.

तो पाहिल्यास, त्यावर इतरांचे भाष्य ऐकण्याची फारशी गरज नाही. :)

खटपट्या's picture

14 Dec 2016 - 11:28 pm | खटपट्या

अजून एक विधान - "जरा खेड्यात जाउन बघा लोकांचे कसे हाल होतायत. खायचे वांदे झालेत"

संदीप डांगे's picture

15 Dec 2016 - 1:00 am | संदीप डांगे

"विधाने वेगवेगळ्या वेळी केलीत पण एकत्र मांडलीत" हाच किती मोठा विरोधाभास आहे नाही का? "वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी विधाने वेगवेगळ्या वेळी केलीत पण ती फक्त विरोधातल्या लोकांनी केली म्हणून ती एकत्र मांडलीत आणी त्यातला विरोधाभास दाखवायचाय" हे लॉजिक लय भन्नाट. लॉजिकपिपासू लोकांनी जरा समजवून सांगावे ह्यातले लॉजिक. जल्ला मला काय बी कल्ला नाय.

१. ज्यांच्या पैसा पांढरा आहे तेच रांगेत उभे आहेत . काळ्या पैशेवाले मजेत घरात बसून आहेत . पैसे बदलायला बँकेत नाही आले . :))))

ह्या वाक्यात काय विसंगती किंवा असत्य आहे? हे वाक्य रांगेत उभ्या असलेल्या लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल आहे. काळ्या पैशावाल्यांना रांगेतल्या लोकांसारखा कोणता विझीबल त्रास झालाय? काळयापैशावाल्यांना मजेत घरात बसून पैसे बदलून मिळालेत. (आता कारवाया चालू झाल्यात, त्यामुळे काळेपैसेवाले पकडलेत इत्यादी सांगू नये. ही विधाने भूतकाळातील आहेत, आताची नव्हे.)

बाकी ह्यांना कोणी पैसे बदलून दिले असावेत असा तुमचा अंदाज आहे?

Finance Minister Arun Jaitley topped the list with over Rs. 65 lakh, followed by Shripad Yesso Naik, Minister of State (Independent) with Rs. 22 lakh and Hansraj Ahir, MoS (Home) with a little over Rs. 10 lakh. Prime Minister Narendra Modi has declared cash holdings of Rs. 89,700.

(अवांतरः जेटलींना ६५ लाख कॅश का लागत असावी? स्वतःला कधी व्यापारी तर कधी फकीर म्हणवणार्‍या मोदींना एवढी कॅश का सोबत हवी असावी? कॅशलेसचा तोंड फाटेस्तोवर पुरस्कार करणार्‍या या दोन्ही महारथींना 'आधी केले मग सांगितले' ही उक्ती माहीत नसावी)

२. घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत . आता उद्यापासून काय खायचे हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे .
( म्हणजे आत्तापर्यंत नोटा न वापरता घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवल्या होत्या तर सर्व सुरळीत चालू होते आणि आता त्याच नोटा स्वतः च्याच बॅंक खात्यात भरल्यावर खायचा प्रश्न उभा राहिला )

इथे दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र आणून विरोधाभासाचा आभास निर्माण केलाय. अशीच दोन्ही वाक्ये बॅकटूबॅक कोणी म्हटली आहेत का त्याचा पुरावा मिळेल काय?

बहुतेक ही वाक्ये अशी स्वतंत्र असावीत.
१. घरात अडीअडचणी साठी साठवून ठेवलेल्या नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत
२. नोटा बदलण्यासाठी गरीब लोक रांगेत उभे आहेत. (कॅश लगेच संपत असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे) आता उद्यापासून काय खायचे हा त्यांच्यापुढील प्रश्न आहे.

दोन्ही वाक्ये जशीचीतशी कोणीही कुठेही उच्चारली लिहिली असतील तर जरूर दाखवा. अन्यथा विरोधकांना बावळट दाखवण्यासाठी तुमची तुम्ही ड्राफ्ट केली असावीत असं वाटतंय.

३. अ ) मोदी मनमानी निर्णय घेत आहेत . कुणालाही विश्वासात घेत नाहीत . मंत्रिमंडळास देखील अंधारात ठेवले आ) भाजपीयांना हे सर्व आधीपासूनच माहीत होते .त्यांनी आधीच पैसे पांढरे केले. ई) इन्कम टॅक्स च्या धाडीत भाजपेयी च जास्त सापडत आहेत :)))))

अ) हे विधान मोदींनी स्वतः केलेल्या, भाजपने स्वतः केलेल्या वक्तव्यांतून पुढे आलेले आहे. नोटाबंदीची खबर कुण्णाकुण्णाला नव्हती असे भाजपेयी स्वतःच सांगतायत. त्यामुळे तेच वाक्य परिप्रेक्ष्य बदलून म्हटलं गेलंय. ह्यात काय खोटं असल्यास सांगावे.

आ) हे विधान भाजपसंबंधित अनेक बातम्या आल्यात त्यावर आधारित आहे, जसे अनेक ठिकाणी झालेली जमिन खरेदी, ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान बॅन्कांमधे वाढलेल्या पैशाचे प्रमाण, इत्यादी (ह्यातले खरेखोटे काय त्यात पडायचे नाही) पण हा पवित्रा विरोधकांचा ओरिजिनल पवित्रा आहे, अ विधानाप्रमाणे हे कोणाच्या भूमिकेवर आधारित नाही.

ई) हे तर सत्यच आहे ना? ह्यात काय विरोधाभास? तसंही हे वाक्य वरच्या दोन वाक्यांशी जुळत नाही. वरचे दोन आरोप आहेत तर ई हे विधान सत्य परिस्थिती आहे.

आता ज्या कोणी एकाने, एका पक्षाने ही तीनही वाक्ये आपल्या प्रवक्त्यांमार्फत प्रसृत केली असतील तर तोही पुरावा द्यावा. तीन वेगवेगळ्या व्यक्तींनी, पक्षांनी, वाहीन्यांनी वेगवेगळ्या वेळी केलेले दावे एकत्र मांडून विरोधाभास कसा सिद्ध होईल?

४. अ) सर्व राष्ट्रीय बँका बुडवायचे सरकार चे धोरण आहे . ब ) मल्ल्या चे कर्ज बँकांनी माफ करून टाकले आणि आता बॅंका बुडू नयेत म्हणून पाचशे हजार च्या नोटा आपल्याकडूनच गोळा करत आहेत ( म्हणजे आत्तापर्यंत फक्त मल्ल्या च्या कर्जवसुलीवरच बँक चालू आणि फायद्यात होत्या ) :)))

"सर्व राष्ट्रिय बॅन्का बुडवायचे सरकारचे धोरण आहे" हे वाक्य माझ्या वाचनात आले नाही, कृपया लिन्क द्या.

ही दोन्ही वाक्ये कोठे व कोणी म्हटले त्याचा पुरावा मिळेल काय? "बॅन्कांच्या एनपीए चे सात-आठ लाख कोटी का काहीतरी होतायत आणि ते लोकांकडून गोळा करुन मोदी बॅन्कांना अघोषित बेल-आउट पॅकेज देत आहेत" अशी कुरकुर काही लोक करत होते. (त्यात किती तथ्य आहे ह्यावर आताच विचार करायची काहीच गरज नाही. त्या कल्पनेच्या भरार्‍याही असू शकतात)

५. मल्ल्या ला आणखी कर्ज पाहिजे. बँका ते द्यायला तयार आहेत फक्त बँकेत पैसे नाहीत. :)) ( म्हणजे मल्ल्या च्या संपत्तीवर जप्ती वगैरे खोटे आहे तर )

ह्या विधानाचाही पुरावा द्याकी राव. कुठून आली ही बातमी, केव्हाची आहे वगैरे.

६. अ) अनेक दुकानदार धंदा तोट्यात आहे असे दाखवून टेक्स बुडवतात. सरकार अशा लोकांना किती रोखणार . हेच ते छोटे मासे वगैरे. आ) दुकानदार वगैरे लोकांना कार्ड कटकटीचे ठरत आहे. सोयीचे असेल तेथे मी पण नोटाच प्रेफर करेन.

हे जरा इस्कटून सांगा. तसेच ही दोन्ही विधानं एकाच व्यक्तीचं, पक्षाचं मत असेल तर विरोधाभास होइल नै का? दोन वेगवेगळ्या व्यक्तींची दोन वेगवेगळी विधानं कशी विरोधाभासी होतील.

७. सरकार ला काळ्या पैशाबाबत काहीच करायचे नाही. त्यांना फक्त स्वतः चा टैक्स वाढवायचा आहे (म्हणजे काय ??)

ह्या विधानांचा मला समजलेला अर्थः काळ्यापैशाबाबत म्हणजे काळ्यापैशावाल्यांबाबत. करायचे असते तर बरेच काही नोटाबंदीशिवाय शक्य होते. नोटाबंदीनेच ते शक्य आहे असे मानणे योग्य नव्हे. तसेच टॅक्सबेस वाढवणेही नोटाबंदीशिवाय शक्य होतेच की!

८. अ) लोक बैंक मॅनेजरशी वगैरे आपापसात सेटिंग लावून पैसे पांढरे करत आहेत . आ)लोक काहीही करून आपले पैसे पांढरे करतच आहेत म्हणायचे इ)लोकांचे असले हे आपापसातील व्यवहार हेच सरकारचे व या योजनेचे अपयश आहे. ( बहुदा प्रत्येक बँक मॅनेजर च्या पाठीमागे एक गुप्त हेर लावला असता तर असे झाले नसते व योजना यशस्वी ठरली असती किंवा नोटबंदी नंतर एका रात्रीत सर्व लोक प्रामाणिक वागू लागतील हा या योजनेचा उद्देश होता असे कोणी समजले कि काय ?)

विधान अ व आ हे एकसारखेच आहे. सरकारचे यश हे योजनेच्या उद्दिष्टांच्या फलपूर्तीवर अवलंबून असते. आता जिथे योजनेची उद्दिष्टे दिवसागणिक बदलत चालली आहेत तिथे यश-अपयशाच्या काय बाता मारायच्या? तरी पहिले काही दिवस जी उद्दिष्टे दाखवलीत की अमूक एवढा पैसा परत आलाच नाही तर योजना यशस्वी होईल, रोखीत असलेला काळा पैसा नष्ट होईल इत्यादी. आता तसे होतांना दिसत नाही असे सरकारने स्वतःच न्यायालयात कबूल केले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त पैसा बॅन्कात परत आलाय म्हणे. अपेक्षेपेक्षा जास्त हे सरकारचे शब्द आहेत. त्यांना अपेक्षा नव्हती एवढा पैसा परत येईल याची. म्हणजेच योजनेचे सुरुवातीला दाखवलेले उद्दिष्ट फसले आहे असे दिसते. मग ते फसण्याचे कारण अ व आ ही दोन विधाने आहेत. त्यात विरोधाभास कसा?

योजनेचे उद्दिष्टच जिथे स्पष्ट नाहीत, रोज बदलतात, पंप्र तर १०० आणि ५० च्या नोटेची किंमत वाढवण्यासाठी ये फैसला किया म्हणतात तेव्हा नक्की योजनेचं उद्दिष्ट काय ठरवायचं ते आधी स्पष्ट झाले तर विरोधाभास आहे की नाही हे ठरवता येईल.

९. सैनिक शाहिद होत असताना आपण काही वेळ रांगेत रांगेत उभे नाही राहू शकत ? ( सैनिक व आपलेच पैसे रांगेत भरण्यासाठी थांबलेल्या लोकांचा तसा संबंध नाही. कदाचित लोकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी असे म्हणत असतील )

हा विरोधाभास नाही तर बादरायण संबंध आहे.

१०. अ )रांगेतील लोकांबाबत सरकार जागरूक नाही . लोकांशी त्यांना काहीच देणेघेणे नाही ब) नोटबंदी संदर्भात सरकार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत व बदलत आहे ( म्हणजे वेळोवेळी घेतलेले निर्णय लोकांचा त्रास कमी व्हावा म्हणून घेतले का कसे?)

सरकार रांगेतील लोकांबाबत जागरुक नाही हे तर सत्य आहेच. लड्डू वाटण्यातून जागरुकता दिसत असेल तर दिसू देत बापडी. सरकारने वेळोवेळी बदललेले निर्णय हे लोकांच्या नव्हे तर नोटाबंदीच्या योजनेच्या सोयीसाठी घेतलेत. मागच्या ३६ दिवसातले सगळे सर्क्युलर काढून पाहावे. त्यात कुठेतरी लोकांच्या सोयीसाठी काही निर्णय केला असेल तर सांगावा. सगळे नवेनवे निर्णय फ्रॉड टाळण्यासाठी आहेत, त्याने लोकांच्या समस्यात वाढ होतेय की कमतरता येतेय ते बघावी. खूप मोठी लिस्ट आहे सगळी इथे देत बसणार नाही. लग्नासाठी अडीच लाख देतो अशी उपकाराची घोषणा वाजतगाजत केली पण अडीच लाख नको पण नियमावली आवर असे म्हणायची वेळ लोकांवर आली. २४००० देतो असं कागदावर म्हणतायत, प्रत्यक्षात आजही बॅन्केत कॅश असेल तरच पैसे मिळतात. (आजच आयसीआयसीआय मधे गेलो होतो, किमान दहा बारा लोक बॅन्केने परत पाठवले रिकाम्या हाती. सरळ सांगतात कॅश नाही. ३६ दिवसांनंतरही आपल्याच खात्यातून सरकार सांगते तेवढेही पैसे काढता येत नाहीत. )

काही प्रतिसादांमध्ये 'बाल की खाल' काढण्याची खुमखुमी दिसली, म्हटलं आपणही करुन बघावं... =)) =))

संदीप डांगे's picture

15 Dec 2016 - 1:19 am | संदीप डांगे

मागच्या ३६ दिवसातले सगळे सर्क्युलर काढून पाहावे. त्यात कुठेतरी लोकांच्या सोयीसाठी काही निर्णय केला असेल तर सांगावा. सगळे नवेनवे निर्णय फ्रॉड टाळण्यासाठी आहेत, त्याने लोकांच्या समस्यात वाढ होतेय की कमतरता येतेय ते बघावी.

वरच्या प्रतिसादातले माझे काही चुकार शब्द सरसकटीकरणाच्या भादंवि क्र. ३०२ अंतर्गत दखलपात्र गुन्हा असल्याचे बजावून काही लोक फासावर चढवायची शिक्षा ठोठावायला येतीलच.... =))

तेव्हा त्यांना सांगणे आहे, जस्ट चील ब्रो! तसेही तुम्ही मला सिरियसली घेत नाही ना... =)) =))

आपल्याला मराठी भाषा नक्कीच अवगत नाही अथवा प्रतिसादांच्या एकामागोमाग एक पिंका पडत राहायच्या इतकेच आपल्याला जमते असे आता वाटते. विधाने मुद्दामहून एकत्र आणली नसून अनेक चर्चांमधून अशा प्रकारची विरोधाभास दाखवणारी विधाने केली जात आहेत इतकेच येथे दाखवायचे होते.
धागा काय , विषय काय , नक्की कशासाठी मांडणी केली आहे हे काहीही समजून न घेता केवळ प्रयेक धाग्यावर राजकीय हेतूनेच पिंक मारत सुटायचे आपले कसब वाखाणण्याजोगे आहे . मुख्यमंत्र्यांवर हिणकस शेरेबाजी करणे, अनाकलनीय प्रतिसाद देणे , कुठल्याही सदस्यावर कशीही राळ उडवत बेफाम प्रतिसाद करणे वगैरे आपले उद्योग गेले कित्येक दिवस मिपावर चालू आहेत. ( आणि हो पुरावे हवे असल्यास आपणच आपले प्रतिसाद वाचा व मनन करून समजून घ्या आपल्याला आपल्याच प्रतिसादाचे पुरावे द्यायला आमचा वेळ फुकट नाही ).
काही थोडे मजेशीर विरोधाभास दाखवल्यावर आपण याच धाग्यावर शुद्ध मजा न घेता ( हो . फक्त एकाच बाजूचा विरोधाभास दाखवा वगैरे मी धाग्यात कुठेही म्हटले नाही आणि तुम्हालाही अडवले नाही नाहीतर ते एक रडगाणे चालू कराल ) हिणकस प्रतिसाद चालू करून केवळ राजकीय हेतूने मेगाबायटी प्रतिसाद देत इतके बेफाम झालात यातच सर्वकाही आले.
किंबहुना धाग्यात सुरवातीलाच व शेवटी लिहिल्याप्रमाणे हे केवळ एक गंमत म्हणून लिहिले आहे त्यास कोणताच राजकीय रंग देऊ नये असा हेतू होता .
असो आपल्या वरील प्रतिसाद शुद्ध भाषेत थर्ड क्लास आहे पण त्यास कोणत्याही भाषेत उत्तर दिले तर आपले अजून निरर्थक आणि विद्वेषाने भरलेले प्रतिसाद येत राहतील तस्मात कोणाशी वाद घालावेत हे आता इतर लोकांप्रमाणे आम्हीही शिकलो. कळावे लोभ असावा.

सुज्ञ's picture

15 Dec 2016 - 2:18 am | सुज्ञ

आणि हो 'मी फक्त लोकांना होणारे त्रास दाखवतोय तुम्हाला राजकीय हेतू वाटत असेल' छाप प्रतिसाद कृपया देऊ नका. आपण काय हेतूने लिहिता हे आता सर्व लोकांना समजते.

नितिन थत्ते's picture

4 Jan 2017 - 1:41 pm | नितिन थत्ते

आणखी एक विरोधाभास.

सर्व आर्थिक व्यवहार बँकिंग सिस्टिममधून व्हायला हवे असे प्रतिपादन करणारे अर्थक्रांतीवांतीचे प्रणेते अनिल बोकील यांचेच ब्यांकेत खाते नाही. ते आपल्या पेन्शनर आईकडून महिन्याला ३५०० रु रोख घेतात आणि रोखीनेच खर्च करतात. (ही माहिती त्यांनी स्वत: सांगितली).

विशुमित's picture

4 Jan 2017 - 2:41 pm | विशुमित

धक्कादायक आहे मग हे ..!!

सतीश कुडतरकर's picture

4 Jan 2017 - 5:39 pm | सतीश कुडतरकर

waa, chhan. bokilkakancha vijay aso.

माहिती कुठे सांगितली..? लिंक आहे का..?

त्यांनी कॅशलेस / लेस कॅश बद्दल मत मांडले होते की कमी रकमेच्या नोटांबद्दल..?

संदीप डांगे's picture

4 Jan 2017 - 6:19 pm | संदीप डांगे

३३.१४ च्या पुढे बघा...

मोदक's picture

4 Jan 2017 - 7:11 pm | मोदक

धन्यवाद.

संदीप डांगे's picture

4 Jan 2017 - 6:22 pm | संदीप डांगे

बरं झालं बोकिल स्वतःच बोलले....