मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

डी फॉर डान्सबार

वरुण मोहिते ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुन रहा है ना तु रो राहा हू मै... क्या बात है ..आत गेलो आम्ही डान्सबार हा प्रकार काही नवीन नव्हता पण काही घटना त्या वेळी घडून जातात आपल्या हातात नसतं. वास्तविक माझे बाहेरच्या राज्यातून मित्र आले तरी त्यांना घेऊन जाणं व्हायचं. परदेशात असताना हि जाणं व्हायचं. त्यात काहीच नवीन नाही. पण कधीतरी होतं. चालायचं मुंबई मध्ये तीन प्रकार चे डान्सबार आहेत. एक काहीही करून देणारे दुसरे मोठी गाणी आणि रेग्युलर लोकांमध्ये प्रतिमा असते तसे आणि तिसरं महत्वाचं .एलिट क्लास टाईप. पूर्ण प्रकाश . एकदम फॉर्मल वातावरण .तर सांगायची गोष्ट अशी एके दिवशी गेलो आम्ही .

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!

माझीही शॅम्पेन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ठाणे शहराचा स्मार्ट शहर योजने मध्ये समावेश करावा अस सरकार ने आताच ठरविले असले तरी पहिल्या पासून ठाणे कर (डॉक्टर असल्याने मुलुंडकर पण ) भलतेच स्मार्ट आहे , मिपाचे यशस्वी कट्टे करावेत तर ते ठाणेकराने च , असो श्रीयुत टवाळ कार्टा ह्यांच्या एका धाग्याने ह्या स्मार्ट कट्टा आयोजनाची सुरुवात झाली , सुरुवातीलाच दिवाळी पाडवा असल्याने किती लोक येतील ह्याचा अंदाज नव्हता असो कट्टा मस्त झाला मेतकूट :- मेतकूट हि जागा निवडणे म्हणजे खरोखर धाडसीपण होत , मिपावरील ऐतिहासिक पार्शवभूमी त्याला आहेच अत्रन्गि पाऊस : - इतक्या सबाह्य सभ्य माणसाने हे नाव घेणं म्हणजे गंमत आहे आणि विशेष म्हणजे हे एक दिवस अगोदरच

"स्व"....

माम्लेदारचा पन्खा ·
लेखनविषय:
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....प

इमोटीकॉन(Emoticon) / ईमोजी(Emoji)

उल्का ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल रात्री माझ्या आत्येबहीणीशी चॅट करताना मी ईमोजी परिवारात नव्यानेच सामील झालेली एक ईमोजी वापरली. आणि काहीही शब्दात न लिहिता तिला माझ्या भावना कळल्या. Do pictures speak more than words? Sometimes… Yes… Definitely. आणि ह्याच्या सर्रास वापरामागे खरं तर शोधामागे हाच तर खरा उद्देश्य आहे. जणू लेखक वाचकाला सांगत असतो कि तू वाचताना ते कोणत्या भावनेने वाचावेस. नाही का? मग काय आहे हा प्रकार आणि नक्की कधी सुरु झाला म्हणून आंतरजालीय शोध घेतला आणि लक्षात आलं की ईमोजी आणि इमोटीकॉन हे दोन भिन्न प्रकार आहेत. हे दोन्ही एकमेकांशी संलग्न असले तरीही.

प्रिय जी. ए.

अश्विनी वैद्य ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

प्रिय जी. ए.

पुलंची बरीच पुस्तकं शाळेत असताना वाचली होती. पण गायन, अभिनय, विनोद या साऱ्याने लोकांची मनं रिझवणारा, तासंतास गप्पांच्या मैफिली रंगवणारा, नाटक-सिनेमात रमणारा, एक प्रतिभावंत नट-लेखक-संगीत दिग्दर्शक आयुष्याचा जोडीदार म्हणून जिला लाभला होता... अशा 'सुनीताबाईंचाही' लेखनप्रवास जाणून घ्यायची मग खूप इच्छा झाली. त्यांच्या लेखणीची धार अजून माहीत झाली नव्हती. मग असेच एकदा 'आहे मनोहर तरी' वाचून काढले. तेव्हा, 'पु.ल. देशपांडे यांची पत्नी' या व्यतिरिक्त एक अतिशय 'शिस्तप्रिय, परखड, स्पष्ट स्वभावाच्या, जिद्दी सुनीताबाई 'ही अशी काहीशी त्यांच्या बद्दलची मनात तयार झालेली प्रतिमा.

मनाचा एकांत - स्मरणाचा काटा

शिव कन्या ·
आत्ता इथे इतके वाजलेत, म्हणजे आपल्या घरी आता तितके वाजले असतील..... तिथे आता हे हे असे असे घडत असेल आणि इथे हे हे असे असे ..............! स्मरणाचा एक तास काटा तिथे तर एक इथे! बाकी मन, सेकंद काटा होऊन सांधणाऱ्या प्रिय समुद्रासारखे टिकटिकत राहते दोन किनाऱ्यांमध्ये अष्टौप्रहर.............. . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! -शिवकन्या

रात्र-कोजागरीच्या निमित्ताने

पिशी अबोली ·
लेखनविषय:
कोजागरीच्या रात्री जागायचं लहानपणी खूप अप्रूप होतं. 'को जागर्ति' म्हणत देवी आली आणि मी झोपलेली असले तर कसं चालेल, असा माझ्या दृष्टीने बिनतोड प्रश्न बाबांसमोर केलेला आठवतो. 'मी खात्री पटवून देईन तिची तू झोपलेली असलीस तरी जागीच आहेस याची' हे तेवढंच बिनतोड उत्तर पेंगुळलेल्या डोळ्यांनी ऐकताना खरं वाटणारच! पुढे वर्षातून एकदा जागवायची रात्र रोजचीच होऊन गेली, तेव्हा रात्रीचं खरंखुरं रूप कळायला लागलं.. घरी असले, की रात्रीत निरनिराळे आवाज पावसाळ्यात येतातच, पण पावसाळा संपला की रातकिडे किरकिर करू लागतात. कित्येकदा घरच्या फोनवर रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो आणि खूप शांत वाटतं.

नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....)

माझीही शॅम्पेन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही ( मागे वळून पाहताना .....) माझा मूळ लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्यावर बराच गदारोळ झाला आणि शेवटी तो फक्त वाचन मात्र झाला..

बहुचर्चित "सैराट"

१००मित्र ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

बहुचर्चित "सैराट"

बहुचर्चित "सैराट" काल बघितला. इतका उशीरा का ? असं काहींच्या मनात आलं सुद्धा असेल, खास करून , माझे काही मित्र मैत्रिणी , ज्यांना हा सिनेमा खूपच भिडलाय. असो. खरं म्हणजे कुठलाही सिनेमा ...अगदी सुपरेस्ट हिट ही का असेना , मला लग्गेच थेटरात जाऊन पहावा असा उत्साह बिलकुल नव्हता, अजूनही नाही. घरात , रविवारी वगैरे , तो पण सैराट किंवा गेल्या रविवारचा मुं-पुणे-मुंबई :२ वगैरे अगदी गाजलेले चित्रपट असतील तर मात्र घरात , हाफ चड्डी घालून , ऐस पैस बसून मला पाहायला आवडतात. मध्ये मध्ये चहा - खाणं चालूच. जाहिराती ? नो प्रोब्लेम man !

मनाचा एकांत - काळे पाणी

शिव कन्या ·
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या