साधू संत महात्याम्यानी 'प्रेम करा, प्रेम करा, असे सांगितले आहे; खरे पण पण प्रेम म्हणजे काय माणसाना कळत नाही ते जर त्यांना कळले आसते ; तर प्रेमाविषयी पोकळ वल्गना कुणी केल्या नसत्या. प्रत्येकजन स्वत:च्या प्रेमभावनेला श्रेष्ठ समजत आसतो. तुझ्यासाठी जीव देईन तुझ्यासाठी जगाला ठोकर मारेन , अशा राणाभीमदेवी गर्जना सरार्स प्रेमिकाकडून केल्या जातात. आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करू शकू , असे प्रत्येक स्त्रीला वाटत आसते व तसे ती वारवार बोलून दाखवत आसते; पण तिला आढळून येते कि, तिचे प्रेम किती तकलादू व कमजोर आहे. प्रेमाहून उच्च अशा दुसर्या कोणत्याही सुखाची आपण कल्पना करू शकत नाही, परंतु ‘प्रेम’ या शब्दाला वेगवेगळे अर्थ आहेत. खरे पाहता ‘प्रेम’ या शब्दाचा अर्थ जगातील सामान्य स्वार्थी प्रेम हा नाही. अशा स्वार्थी,व्यवहारी प्रेमाला ‘प्रेम’ म्हणणे म्हणजे ‘प्रेम’ या शब्दाचा अपमान करण्यासारखे आहे. आपल्या आप्तस्वकियाबद्दलचे प्रेम हे केवळ पाशवी प्रेम होय. जे संपूर्णपणे निस्वार्थी असते; तेच खरे प्रेम होय व् ते फ़क्त ईश्वराबद्दलच असू शकते . ईश्वराबद्दलची भक्ती आणि पत्नीने पतिवर जीवनभर केलेली निष्ठां व् श्रद्धायुक्त प्रेम यात फरक काय आहे .देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्म्यानी जे बलिदान केले;ते राष्ट्रवरचे प्रेम नव्हे काय? बहिण-भावांचे,भावंडाच्यातील जिव्हाळा म्हणजेच प्रेम आहे . आपण ज्याच्यावर प्रेम करतो; त्याच्या हितासाठी,सुखासाठी आपण कारक होने ही भावना म्हणजेच प्रेम होय आपण ज्याच्यावर प्रेम करतो; त्याने आपल्यावर प्रेम करावे किवा त्याच्या मनात आपल्याविषयी प्रेमभावना आसावी, असे काहीच नसते: प्रेम म्हणजे एक अखंड साधना, आराधना आहे. ती करीत आसताना मनात विश्वास आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो आहोत त्याच्याविषयी श्रद्धा असने आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
30 Dec 2015 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा
नि सोँच्या जवळ रहाता का आपण? ;)
30 Dec 2015 - 6:22 pm | मयुरMK
मी कोल्हापूर चा,
नि सॉ . कोण हो
30 Dec 2015 - 6:25 pm | मयुरMK
http://www.misalpav.com/node/34262
30 Dec 2015 - 6:55 pm | DEADPOOL
hahi bhari!!!!
30 Dec 2015 - 9:56 pm | मयुरMK
31 Dec 2015 - 9:56 pm | विश्वव्यापी
आपले विचार सुंदर आहेत.
असेच विचार कायम राहुद्या.
छान लिहीता पुढे ही लिहित राहा.
1 Jan 2016 - 12:27 pm | मयुरMK
धन्यवाद विश्वव्यापी