अनुभव
अनुभव हा अनुभव असतो.
प्रत्येकाचा वेगळा असतो.
अनुभव सुखद असतो किवा दु:खद असतो.
दु:खद अनुभव आयुष्यावर काळी छाया पसरवतो
सुखद अनुभव आयुष्याला सोनेरी किनार देतो.
सुखद अनुभव थकल्या जीवाला आसरा देतो, मनावर फुंकर घालतो.
मलाच दु:खद अनुभव का म्हणून विचारू नये.
दु:खद अनुभव दुसऱ्याला का नाही म्हणून खंतावू नये.
कोणता अनुभव मिळेल हे आपल्या नशिबावर अवलंबून असते.
मित्रानो, प्रत्येक अनुभव घेत जावे.
प्रत्येक अनुभवातून शिकत जावे.
दु:खद अनुभव तुम्हाला शिकवतो.
सुखद अनुभव विकार वाढवतो.
दु:खद अनुभवाने खचू नका.
सुख - दु:ख हे निसर्गाचे चक्र आहे.
देवही एव्हडा निष्टुर नाहीये.
त्याच्याकडे सोसायला बळ मागा.
आणि अनुभवाचाच अनुभव होऊन जा.
सुधीर वैद्य