मौजमजा

प्रिय वेगवान गोलंदाजास -

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जे न देखे रवी...
23 Dec 2017 - 11:55 pm

प्रिय वेगवान गोलंदाजास -

हॉल लिलीचा वंश सांगसि, मुखी मार्शलची गाथा
होल्डिंग गार्नरच्या पाईका तुजला काय जाहले आता?
आठव वकार, आठव डोनाल्ड पुनःश्च अक्रम आठवूदे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

कोण कोठला फलंदाज, अंगभर चिलखतसे लावितो
शिरस्त्राण घालून उन्मादे पाय पुढे टाकितो |
सुसाटणारा चेंडू तुझा पाय तयाचे जखडू दे
पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे||

विनोदक्रीडामौजमजाकाहीच्या काही कविताहास्यवीररस

भातुकली

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
18 Dec 2017 - 1:35 pm

प्रत्येक लहान मुलीचा जिव्हाळ्याचा खेळ म्हणजे भातुकली. आईच्या उबदार सहवासात आई ज्या काही पाककलेच्या किंवा घरातील कामांच्या क्रिया करते त्याचे हुबेहूबअनुकरण भातुकलीच्या खेळामध्ये मुली उतरवत असतात. भातुकलीची आईबरोबर नाळ जुळलेली असते म्हणूनच तर भातुकलीचा खेळ मुलींसाठी जिव्हाळ्याचा असतो असे मला वाटते.

लेखमौजमजा

( काल रातीला सपान पडलं )

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
11 Dec 2017 - 9:44 am

हा ।। गुरु महिमा ।। चाच पुढील विस्तार आहे. ( बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार विडंबन हि स्वतंत्र कविता आहे व ते स्वतंत्र धाग्यावर असावे म्हणून हा स्वतंत्र धागा. )

कलाकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदसाहित्यिकव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणमौजमजाचित्रपटरेखाटनvidambanअदभूतअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितावाङ्मयशेतीहास्यअद्भुतरस

(धुतले...)

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
2 Dec 2017 - 7:21 pm

पेर्णा

उंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले
भंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले
दुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले
पारावरती विसावलो अन तिथेच चुकले
खबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले
तडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले
सुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले
पाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...

विडंबनविनोदमौजमजाअनर्थशास्त्रआगोबाआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचभूछत्रीरतीबाच्या कविताहास्य

उठ मावळ्या ...

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
22 Nov 2017 - 11:13 pm

आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.

उठ मावळ्या फोडू चल नळ्या
कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या
चल मदिरालयी तु घुस
ये सोडूनि घास फूस

कोंबड्यासम केस रंगविसी
कोंबडीस मग का तू वर्जिशी
६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस
ये सोडूनि घास फूस

मुक्तकशब्दक्रीडाविनोदसमाजमत्स्याहारीमांसाहारीशाकाहारीमौजमजामुक्त कवितावीररस

आता फक्त घासफूस ...

गबाळ्या's picture
गबाळ्या in जे न देखे रवी...
22 Nov 2017 - 2:54 pm

माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.

केल्या रित्या बाटल्या
चकण्यांच्या ताटल्या
पडे बिअरचाच पाऊस
पण आता...
आता फक्त घास फुस

चापिल्या बोट्या
फोडिल्या नळ्या
ढेरी तुडुंब करी मन खुश
पण आता...
आता फक्त घास फुस

दिन ते गेले
वय ही झाले
झाली शरीराची नासधूस
अन आता ...
आता फक्त घास फुस

मुक्तकशब्दक्रीडाजीवनमानआरोग्यपौष्टिक पदार्थमांसाहारीराहणीवाईनशाकाहारीमौजमजाहास्य

एक अनावृत्त(छी! अश्लिल!) पत्र

पुंबा's picture
पुंबा in जनातलं, मनातलं
14 Nov 2017 - 8:05 am

रवि, अरे काय नाव ठेवलंस बाबा सिनेमाचं? न्युड? अरे! केवढं हे अश्लैल्य? 'दिगंबर' वगैरे सात्विक, शुचिर्भूत नाव ठेवलं असतंस तर चाललं असतं(हा आपला लेखकाचा कल्पनाविलास बर्का! दिगंबर नाव ठेवलं असतं तर उभा चिरला असता डायरेक्टरला). छे छे! संस्कृती बुडाली. (च्यामारी!(च्या आणि मारी दोन्हीही पतंजलीचे बर्का!) ह्या संस्कृतीला पोहायला शिकवले पाहिजे. सारखी बुडते. पण पोहायला शिकवायचं म्हणजे स्विमिंग कॉश्च्युम, आणखी अश्लैल्य! छे छे!!) 'न्युड'पणाचं आपल्या संस्कृतीला फार वावडं. कुंभमेळ्यात कधी दिसलाय न्युड साधू? कधीच नाही. आहे कुठला बुवा, महाराज अर्धन्युड? अंह!

प्रकटनविरंगुळाविनोदराजकारणमौजमजाचित्रपट

चला हवा येऊद्या.

जागु's picture
जागु in जनातलं, मनातलं
7 Nov 2017 - 12:01 pm

सोमवार आणि मंगळवार आला की संध्याकाळी ऑफिसमधून आल्याबरोबर लवकर जेवण आणि कामे उरकण्याची लगबग चालू होते. कारण ह्या दोन दिवसांत आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीतील अख्ख्या कुटुंबाची हास्य विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हॉलमधील टीव्ही समोर बैठक बसणार असते. घरातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकत्रित बैठक जुळवून देणारा कार्यक्रम म्हणजे झी टीव्ही वर ९.३० ते १०.३० ला लागणारा चला हवा येऊद्या हा मनोरंजनात्मक कार्यक्रम. तसं टीव्ही वर माझ्या मुली श्रावणी, राधा आणि पुतण्या अभिषेक यांच राज्य असत व ते आपल्या वयानुसार लागणारे कार्यक्रम पाहत असतात.

लेखमौजमजा

याद किया दिल ने

sayali's picture
sayali in जनातलं, मनातलं
27 Oct 2017 - 4:58 pm

पु.ल यांनी इटलीतल्या सोरेन्तो गावातल्या समुद्राच्या निळाईच वर्णन करताना लिहिलं आहे.
हूरहूरत्या सांजेचं ते सौंदर्य बघताना जर चांगला पुरिया धनश्री ऐकायला मिळता तर न जाणो आनंदाने कोंदल्यामुळे माझ्या प्राणांनी कुडीचा निरोप घेतला असता.
तसा अनुभव लडाखचा पंगॉंग लेक बघितल्यावर आला. एखाद्या सरोवरत आल्यासारखे वाटले. विशाल असा निळाशार लेक दिसला त्याला चार शेड्स होत्या. हिरवा, राखाडी, फेंट निळा आणि डार्क निळा. थंडी व वारा झॉंबत होते. देवाच्या करणीने क्रुतद्न्यता दाटून आली.

प्रकटनअनुभवमौजमजा

पावसामुळे काय काय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
8 Oct 2017 - 11:20 pm

पावसामुळे काय काय

तुझी झाली ओली अर्धी साडी
अन माझाही भिजला पुर्ण खांदा
एकाच छत्रीमुळे झाला वांधा

वरतून दणका जोरदार पावसाचा
साथीला गोल गोल टपोर्या गारा
भसकन शिरला त्याचवेळी छत्रीमध्ये वारा

आणीक खोल फसला माझा चिखलात पाय
धुमाकूळ घालून उलटे केले वार्याने छत्रीला
तू ही गेली दुर निघूनी हातामध्ये दांडा आला

प्रश्न:
अ) सुचनेनुसार उत्तरे लिहा.

१) पावसामुळे कुणावर परिणाम झाले? वाक्यात उत्तर लिहा.
२) पावसामुळे कसे परिणाम झाले? सचित्र उत्तर लिहा.

ब) रिकाम्या जागा भरा.

कविताविनोदमौजमजाहास्य