सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.
फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
सुपारीबाज टपोरीने खंडणीसाठी कपाळावर टेकविलेल्या कट्ट्याचा
निष्ठुर घोडा
घोडेबाजारात निष्ठेची झूल आडसाली बदलण्यात निर्ढावलेला
संधिसाधू घोडा
जितांनी केलेल्या जेत्यांच्या जयजयकारात गुदमरलेला
अश्वमेधी घोडा
बुद्धिबळाच्या कृष्णधवल अवकाशात अवघडलेला
अडिचक्या चालीचा घोडा
गर्निकाच्या युध्दविकल चौकटीत पिकासोने कोंडलेला
टाहो फोडणारा घोडा
व्याधविद्ध मृगनक्षत्राच्या झगमगत्या चौकटीत दडलेला
तेजोमेघी घोडा
बहुरूपी घोडा
समजू लागलाय
थोडा
थोडा
अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व
अनंत जोखण्या
- हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो
धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो
पाऊस-कविता झाली पाडून
विठुलाही वेठिस धरिले
जशी मागणी तसा पुरवठा
ब्रीदवाक्य कवि-झोळीतले
जरा स्वस्थ बैसेन तोवरी
दिन येईल स्वातंत्र्याचा
हस्तिदंती मम मनोऱ्यातुनी
शब्द तिरंगी लिहिण्याचा
दुरून मग खुणवेल दिवाळी
शब्दांची आतषबाजी-
-करण्यासाठी सज्ज होऊनी
लावीन "प्रतिभेची(?)" बाजी
"स्वांत:सुखाय लिहितो बिहितो"
धूळफेक जरि करितो मी
शब्दांच्या पलिकडे वसे ते
सांग कधी का पाहीन मी? :)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नात एकमेकांनी उखाणे कसे घेतले असतील?
आपण कल्पना करू आणि तुमच्या कल्पनेतले उखाणे येथे टाका.
लेक लाडकी मोठ्या घरची
होणार सुन मी अंबाणीची
मोबाईलचा बॅलंस आयुष्यभराचा टाकला
अनंतरावांसारखा जोडीदार भेटला
लग्नाला आले बॉलीवूड आणि हॉलीवूड
अंनंतरावांचे नाव घेते स्पर्श करते टचवूड
स्वप्नातला राजकूमार पाहीला होता
सुखाने न्हाले मी अंनंतरावांसारखा पती मिळता.
भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत ॥१॥
शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी ॥२॥
"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर ॥३॥
सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे? ॥४॥
जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप
सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"
दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)
भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन
निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन
जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन
राहू-केतुची जोडगोळी मग
समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद
सोडवीन निरगाठी
सात अश्व सूर्याचे - त्यांना
थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा
करीन मी निगुतीने
कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- पाभे