मौजमजा
प्लॅन करायचा काय ?
मि.पा.वर अनेक ट्रेक प्रेमी लोक आहेत्,आपणच एखादा छोटा ट्रेक काढायचा काय? जवळचा,कमी त्रासाचा,१ दिवसीय असा प्लॅन करूया म्हणजे हौशे,नवशे आणि गवशे असे सगळेच येउ शकतील. यामुळं प्रत्यक्ष ओळ्खी होतील, आणी आय डी मागचा माणूस भेटेल.
साधारण पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती पडेल असा प्लॅन करूया बाकी बाहेर गावच्या लोकांचेही स्वागतच आहे. तारीख २९ ऑगस्ट /५ सप्टेंबर ठेउया.
हे किल्ले साधारणपणे पुणे आणि मुंबईच्या लोकांना मध्यवर्ती आहेत.
१) कोथळीगड (कर्जत)
२) विकटगड (नेरळ)
३) कोरीगड (लोणावळा)
अजून सुधा सूचवले तरी स्वागतच !
चला तर मग मंडळी लागा तयारीला !
काही वैचारिक आजार
काही आजार शरीराचे;काही मनाचे तर काही दोन्ही चे मिळुन असे माहित होते. या पलिकडे जाऊन काही 'वैचारीक आजार' असतात असे एका संशोधनात सिद्ध झालं आहे म्हणे !(संशोधक जिवाच्या भितीने लपुन बसलाय) त्या संशोधनात काही तथ्य आहे असे आमच्याच काही मित्रमंडळीकडे पाहुन पटायला लागलंय.. :?
माझा एक मित्र आहे.त्याला वै.जुलाबाचा आजार आहे! कोणताही विषय त्याला ऐकू आला कि सुरु झालेच म्हणुन समजा ! नव्या रेसिप्यांपासुन अणुकरारापर्यंत कोणताही विषय याला'पचत'नाही.पोटात काही म्हणुन ठरत नाही! कितीही चांगलं याला द्या;अंगी काही लागत नाही.विचार,विषय कितीही जड असू द्या;याच्या कानातून आत शिरतो,काही क्षणात तोंडातून बाहेर्!तेही डोक्यात घाईघाईत झालेल्या प्रक्रियेसह! :NO
एक मैत्रिण याच्या विरुद्ध. वै.बद्धकोष्ठता आहे तिला.म्हणजे डोक्यात खूप असतं हो,बाहेर पडण्याची मारामार!!! चर्चा,विनोद्,चेष्टा असे पाचक ही काही परिणाम करत नाहीत्. एक चांगलं आहे हिचं..कुणीही तिच्यासमोर कितीही जड विषयावर बड्बडू श़कतों. नजिकच्या भविष्यकाळात तरी बाहेर काही पडणार नाही याची खात्री असते.
एकीला वै.अॅलर्जी आहे.पथ्यपाणी कडक!न चालणारा विषय निघाला कि पुरळ उठते. डोके ठणकायला लागते.खाज सुट्ल्याने ती वेडीपिशी होते!एक तर ती प्रचंड स्त्री मुक्तिवादी(दोन्ही) आहे. त्यामुळे कुठल्याही वयाच्या पुरुषांबद्द्ल चांगले बोलले की ही ताप चढल्यासारखी त्या जातीबद्द्ल'अन्याय..अत्त्याचार्.'.असे भाषण सुरू करते! तिच्या अशा आजाराला घाबरून मी तेंडुलकरचंही कौतूक तिच्यासमोर करत नाही. e:
काहींची अवस्था याहून वाईट. वै.बधिरता! कोणत्याही विषयाचा पोत्,स्पर्श यांना जाणवतच नाही. मग तो विषय दाहक असो की मोरपिशी..त्यांच्या कातडीवरचा केसही हलत नाही.सुखी जीव नाही!
हे झाले मोठे आजार.सर्दी पडश्या सारखे किरकोळ आजार आप्ल्यातुप्ल्याला पण होतातच की. म्हणजे बघा,एखाद्या विषयावर इथे खूप लोक पेटलेत असे दिसले की विषय कोणताही असो..मतांच्या शिंका येणारंच!
बाकी वैचारिक गतिमंदता,वै.स्थूलता,वै.कावीळ ही नावे तुमच्या कल्पनाशक्तीसाठी सप्रेम भेट
( अन्यत्र पूर्वप्रकाशित )
(तंगड्यावर तंगडे)
मडळी, श्रावणापूर्वीचा हा शेवटचा वीकांत, तंगड्यावर तंगड्या खाऊन साजरा करू. कसे?
चित्र जालावरून साभार
वाट बघतोय रिक्षावाला
शालिमारे का भौ?
चला सिबीएस, शालिमार...
लगेच निघेल...
शालिमार?
चला बसा...
शालिमार... शालिमार...
ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?
ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल?
विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.
आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर. आजून दोन पायजे तुमाला हालायला.
चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?
हो शालिमार.
किती दोन का?
हो. किती पैसे?
बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
सिबीएस?
अहो आता कुठे बसवता? चार तर बसवले. किती अडचण.
पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा
ओ आवाज जरा हळू करा ओ. डोकं दुखतंय.
बंदच करतो. ठिक.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?
हो.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
शालिमार आलं का?
हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.
चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?
हो.
बसा.
पवननगर म्हणजे सिडको ना?
हो. तुमाला कुठे जायचे आहे?
पवननगरलाच. त्रिमुर्ती चौकात.
त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.
कधी निघणार.
हे काय लगेच. शिट तर भरू द्या.
हा स्टॉप शेअर रिक्षांचा आहे ना.
हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.
पट्टा म्हणजे.
नविन आहे का तुम्ही.
हो.
पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार नविन सिडकोचा आहे.
दररोज किती पट्टे मारतात?
सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्या दिवशी लेवल करावी लागते.
किती कमाई होते दिवसभरात?
कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.
पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....
चला लवकर. किती वेळ?
अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?
नको. गाडी भरेपर्यंत गप्पा मारू. स्पेशल ट्रिप मारता का?
नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.
चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....
पुडी देवू का? हिराये.
नाही मला नाही लागत. तुम्ही किती खाता?
जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.
माळी म्हणजे?
१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.
अरे बापरे एवढ्या पुड्या.
अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.
पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....
गाडीत टेप लागतो का?
हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.
पवननगर का?
चला बसा.
डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....
अपडेटं द्या मंडळी!!
मध्यंतरी नोकरी, जागा, रहाण्याची जागा, राज्यबदल वगैरे सगळ्या गदारोळात बरेच दिवस मिपावर यायला जमलं नाही. अर्थात त्यामुळे मी नक्कीच बर्याच रोचक घटना वगैरे मिसल्या असणार! आता अभ्यास करायला फारसा वेळही नाहीये,तर कृपया मदत करा!
तेह्वा मिपाकरहो, ज्ञानदानाचं पुण्य कमवायची ही तुम्हां सर्वांना एक सुवर्णसंधी आलीये त्याचा लाभ उठवा आणि फटाफट अपडेट्स द्या पाहू! काय काय घडलंय आणि काय बिघडलंय त्याचं!
मुखवटे आणि चेहरे
काल ऐन संध्याकाळी नेट कनेक्शन डाउन झाले आणि डोक्याला शॉट लागला. शेवटी वैतागुन शटर खाली केले आणि चुकला फकिर मशीदीत ह्या न्यायाने आम्ही चौपाटीची वाट चालायला लागलो. लांबुनच एका आईसक्रीमच्या गाडीला टेकुन बसलेला आमचा नानबा दिसला आणि चौपाटीवर आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. नाना एक भली मोठी पेन्सील, कागद , खोडरबर आणि टोकयंत्र घेउन बसला होता.
"नानुssssssssडी काय विडंबन करतोयस का टॅक्स रिटर्न ?" मी आनंदाने साद घातली. मात्र "ये रे भाड्या !" च्या ऐवजी "राम राम" ऐकायला आले आणि आम्ही सावध झालो. नान्याचा मुड आज वेगळाच लागल्याचे लक्षात आले.
"काय नानबा ? विडंबन का विडंबन ??" आम्ही कागदात डोकावत म्हणालो.
"धाग्यांची यादी काढतोय ! हे ४/५ उद्या टाकायचे आणि हे ३/४ परवा" नाना हातातला कागद दाखवत म्हणाला. आम्ही उत्साहाने कागदात डोकावलो. कागदावर १) मुंगी होउन साखर खावी पण हत्ती होउन ओझी का उचलु नयेत ? २) जुलाबावर काही घरगुती उपाय आहेत काय ? ३) बायको साडी नेसणारी करावी का ड्रेस घालणारी ? ४) मुलाच्या डोक्यावरचे केस आता कापण्यालायक झाले आहेत तरी माझ्या लहान मुलास कुठे केस कापायला न्यावे ? ५) पुण्यात सायकलला चांगले स्पोक कुठे लावुन मिळतील ?? अशा काही धाग्यांची एकाखाली एक नावे दिसली.
"हे सगळे एकदम का नाही टाकत ??" मी हलकटपणाने विचारले.
"हे धागे मी टाकणार नाहिये ! लोकांना विषय हवे होते म्हणुन सुचवतोय" नाना थंडपणे म्हणाला.
"लोकांना ? म्हणजे कोणाला बॉ ?" ह्या आमच्या प्रश्नावर नानानी ज्या नजरेने आमच्याकडे बघितले त्यामुळे आमचे शरमेनी सरबत झाले. "हे घे वाच !" नानबाने आता खिशातुन एक चुरगाळलेला कागद काढुन आमच्या हातावर टेकवला. लॉटरीचे तिकिट बघावे त्या उत्साहाने आम्ही तो कागद उलगडून पाहिला. तो कागद म्हणजे एक ग्रुप-चाट ची प्रिंट आउट होती. त्यावर खालील प्रमाणे संभाषण होते :-
..........
सोम्या :- बा*** भां** 'त्या' धाग्यावर येवढा का पेटला आहेस ? पब्लिकला शंका येईल ना भौ.
गोम्या :- घंटा ! माझी खव बघ.. पब्लिक केस उपटायच बाकी राहिलय फक्त.
राम्या :- खी खी खी मायझ* माझ्या कालच्या धाग्यावर अजुन तेल ओतुन या रे कोणीतरी.
गोम्या :- त्या धाग्यावर मी लै शिव्या घालुन आलोय तुला मगाशी. वाचली का माझी प्रतिक्रीया ?
राम्या :- वाचली पण मी आता लॉग-ईन नाहिये, बाहेरुन वाचतोय.
सोम्या :- उद्या कोण टाकणारे धागा ? च्यायला जरा सांभाळून नाहितर परत लाथा मिळायचा.
राम्या :- फाट्यावर मारतो बे आपण सगळ्यांना. चार घुसवुन ठेवलेत. एक उडला तर काय फरक पडतो ?
............
"हम्म्म्म्म... तुला कुठे मिळाले हे नान्या ?
"वैयक्तीक प्रश्न... सो पास !"
हम्म्म्म्म. पण येवढ्या तेवढ्या कारणावरुन तु असा उदास नक्की होणार नाहीस, नक्की काय झालय बॉ तुला ?
"सध्या मिपावर उर्मटपणा वाढत चालला आहे परा."
"आणि आक्रस्ताळेपणा सुद्धा ! झाडं कमी पडायला लागली आहेत नान्या."
"मला फारा वाईट वाटते आहे रे पर्या. ज्या मिपावार विजुभौंसारखे व्यसनमुक्तीचे खंदे कार्यकर्ते कार्यरत आहेत त्या मिपावर दारुच्या समर्थनार्थ लेख यावा ? ज्या मिपावर स्वातीतै, जागुतै सारख्या सुगरणी पाहिल्या, तिथेच स्वयंपाक न करता येणार्या सदस्या दिसाव्यात ?? नवे रुप नवे रुप म्हणायचे ते हेच का काय ?"
"जाउ दे नाना तु नको डोक्याला शॉट लावुन घेउ."
"च्यायला प्रा. डॉ. च्या मिपाची लेखन 'कोलिती' उतरली रे पार. साल्या तु कसे काय हे सगळे सहन करतो ?"
"असे आहे बघ नानबा, मी सकाळी आल्या आल्या आधी कलंत्री काकांचा एक लेख नाहीतर प्रतिक्रीया वाचतो त्यामुळे पुढे कुठलेही लेखन आले तरी ते वाचायची मला मानसीक ताकद मिळते. आणि जाताना मी सामंत काकांचा एक लेख वाचतो मग दिवसभर जे काही (ही) वाचले ते कसे जीवन सुंदर करणारे होते ह्याचा मला साक्षात्कार होतो."
"धन्या आहेस भाड्या. चल आता जरा पाणवठा गाठु आणि मग घरला निघु. "
तर दोस्तहो अशा रीतीने नाना आणि परा पाणवठ्याकडे गेले. तिकडे रात्री ११ च्या सुमारास दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि इकडे मिपा रंगमंचावर ११.३० वाजता एका नव्या आयडी कडुन गो-ग्गोड भाषेत 'मिपा लेखनाचा दरजा' आणि दुसर्या नव्या आयडी कडून 'aajkal samant aani kalantri kaka kuthe asatat ?' असे विचारणारा लेख प्रकाशला.
कात्रज ते सिंहगड.
जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली. वरुतुन कात्रज घाट असा दिसत होता.
चालता चालता सुंदर निसर्ग निहाळत होतो. तेव्हा ते क्षण कॅमेरयात टिपले.
तृणांच्या मखमालीचे.
पुढे चालत राहिलो. मग एक एक असे ४-५ दोंगर चढलो आणि उतरलो.मग एका ठिकानी थोडी विश्रांती घेतली आणि एकाने आणलेल्या गुळ पोळ्या खाल्ल्या.जरा बरे वाटले. मग थोडे फ़ार ऑर्कुट पोस देत फोटो काढले व परत चालायला लागलो. एकामागुन एक असे डोंगर चढत होतो आणि उतरत होतो. पण सिंहगड काही दिसत नव्हता.तो तिकडे लांब ढगांच्या आड लपला होता. मधे आजुबाजुला दिसनारा निसर्ग मात्र टिपत होतो,डोळ्यांत आणु कॅमेरयातही.

असेच अजुन एक कॅमेरयात टिपलेले द्रुश्य.
सुरवातीला थोडास रिमझिम पाउस झाला तो तेव्हडाच. नंतर काही पाउस झाला नाही. काही चढ काठीण तर काही सोप्पे होते. आम्ही पुरते थकलो होतो पन आता मधेच अडकलो होतो. परत जायचा कोणी विचार केला असता तरी तो काहि शक्य नव्हता.
मधे काही गावकरी महिला डोक्यावर लाकडांचे ओझे घेवुन चालताना दिसल्या. त्यांची कमाल वाटली.
तेव्हड्यात ढगांनी क्रुपा केली व सिंहगडाने दर्शन दिले. जरासे बरे वाटले. मग परत जोमाने पुढचा डोगर चढुन गेलो. पण ज्यावेळेस आम्ही त्या डोंगरावर आलो तेव्हा पुढचा मोठा डोंगर बघुन धस्स झाले. पन काही पर्याय नव्हता परत चालायला लागलो.
रस्त्यामधे काही रानफ़ुलांनी लक्ष वेधुन घेतले. मग परत कॅमेरा काढला आणि फ़ोटोसेशन चालु केले.
असे जवळ जवळ ११ डोगर चढलो आणि उतरलो तेव्हा सिंहगडावर जाण्यारया रस्त्याला लागलो.
तो रस्ता असा दिसत होता.
प्रचंड भुक लागली होती , म्हणुन तिथेच झोपडीत चहा, भजी वर ताव मारला. मग परत त्याच रस्त्याने सिंहगडावर चालत गेलो. गडावर पोहचताच नेहमीप्रमाने गर्दी दिसली. इतक्या वेळची शांतता भंग झाल्यासारखी वाटली. मग मस्त विंड पॉइंट ला जावुन हवा खाली. मग नंतर परत पिठलं भाकरी वर ताव मारला. आणि मग घडावरुन खाली आलो व बस पकडुन परत स्वारगेटला. घरी जायला अंधार झाला होता. पण हा ट्रेक आम्ही खुप इंजॉय केला.
या ट्रेक ला जाताना बॅगमधे पाणी आणि खायला घेणे आवश्यक आहे. कारण मधे कुठेही पाणी नाही आहे. स्टॅमिन्याची कसोटी बघनारा असा हा ट्रेक आहे. तसा लोक रात्री करतात हा ट्रेक, पण जर तुम्हाला आजुबाजुच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दिवसा पण करण्यासारखा आहे. पण उन्हाळ्यात दिवसा प्रयत्न करु नये कारण अंतर खुप आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होवु शकतो.
न कळणार्या गोष्टी
आज काल बऱ्याच गोष्टींचे अर्थच कळेनासे झाले आहेत. आपली आणि लोकांची आवड यात एवढा फरक कधी पडायला लागला? आपल्याला साधारण "वाह्यात" वाटणारे वागणे हे "हिप" किंवा "कूल" आहे असे चक्क छापून कसे येते आहे?
आत बघा मी एक यादीच तयार केली आहे
१. राहुल/राखी च्या स्वयंवराला येणार्या इच्छुक वधू/वर आणि त्यांचे कुटुंबीय - सगळ्या जगाकडून हसू करून घ्यावे असे त्यांना का वाटावे? राखीचे चे मुरके, रडणे किंवा रागावणे त्यांना लोभसवाणे वाटले की काय! आणि सावंत बाईंचे लाजऱ्या भारतीय वधूचे रूप, (कलात्मक पद्धतीने अंग उघडे टाकले असले तरी) आपण खरे आहे असेच मानले ना. आता सगळ्याचे उत्तर चॅनेल साठी टीआरपी आणि भाग घेणाऱ्यांसाठी पैसे आणि प्रसिद्धी आहे असे समजून घेतले की झाले! पण खरंच ही प्रसिद्धी हवी आहे का खूप जणांना?
२. बऱ्याच वाहिन्यांवर असणारे "दादागिरी", "रोडीज" किंवा "स्प्लिटस्व्हीला" सारखे सत्याचे असत्य खेळ. एकमेकांना वाट्टेल तसे बोलावे, वाट्टेल तसे वागावे, कट कारस्थाने करावी, दुसऱ्याचे पाय ओढावेत, अशा सर्व गुणांना उत्तेजन देणारे कार्यक्रम, त्यात भाग घेणे म्हणजे परम भाग्य! निडर, शूर वगैरे स्वत:ला समजावे व प्रेक्षकांना तसे बजावून सांगावे. पण आपण बापडे प्रेक्षक.. आपल्याला ते तसे जबरदस्त न वाटता मूर्ख वाटले तरी आपल्याला विचारतो कोण? भाग घेणारे एका बाजूला तर संचलन करणारे तर विशेषच. ती कोण सोनाली म्हणे "बिच" आणि तिचे कर्तृत्व काय तर घालून पाडून बोलणे.. वर ही कुप्रसिद्धी हेच कौतुक.. अशा आपल्या व्याख्या बदलल्या कधी? बेमुर्वत आणि बेफाम बोलणे म्हणजे करमणूक असे त्यांना वाटते... पण आपल्याला?
३. आपले सिनेमा सितारे हिंदी सिनेमात काम करतात पण हिंदी बोलत नाहीत, भारतीय आहेत पण भारतीय दिसत नाहीत, यांना आवडते कॅव्हीयर आणि यांची असते चीज आणि वाइन पार्टी! यांच्या लकबी, वागण्या बोलण्याची पद्धत, काही काही म्हणून भारतीय दिसू द्यायचे नाही असा यांचा हट्ट असतो. असे का झाले आहे आपले?
४. सभ्यता हद्दपार - आजच्या सिनेमातील दृष्ये, बक्षीस सोहळे संचलन करणाऱ्यांचे बोलणे या सगळ्यातून सभ्यता निघून चालली आहे. अनेक चित्रपटात गरज नसताना टॉयलेट मधली दृष्ये, एकूणच नैसर्गिक विधी समोर ठेवून केलेले विनोद यांची गर्दी झालेली दिसते. अंग उघडे टाकण्याविषयी तर न बोललेलेच बरे. शरीराचा बराचसा भाग उघडा ठेवणारे कपडे घालताना आपण नक्की काय मिळवू पाहतो आहोत? आधुनिकता, मुक्ती की केवळ पैसा आणि प्रसिद्धीच्या स्पर्धेत आपण मागे राहू नये म्हणून केलेली तडजोड?
५. वृत्त वाहिनी- हे जरी गुणी बाळ असले तरी तेही बरेच अवगुण शिकले आहे थोड्याच वेळात.. बऱ्याच वाहिन्यांवर सर्वाधिक जोर असतो तो सिनेमा केंद्रित बातम्यांचा, मग त्यात ऐश्वर्याचा फ्लू, सलमानची साडी नाहीतर कोणतरी पायल रोहटगीचा खुलासा असे काहीही केवळ फालतू असे असू शकते. मुलाखत घेणाऱ्याकडे विषयाचे पुरेसे ज्ञान असावे अशी अपेक्षा तर ठेवायचीच नाही. बर सिनेमाविषयी कार्यक्रम हे फक्त वर्तमानाशी निगडित, भूतकाल पूर्ण विसरून जायचा. रणबीर कपूर उगवता तारा, म्हणून ऋषी कपूर तेवढा आठवायचा, सैफचा सिनेमा आला की शर्मीला टागोर आठवायची. पण ज्यांचे आत्ताच्या जगताशी बंध नाहीत त्यांना मात्र पूर्ण विसरायचे. थोडक्यात, दर्जा पेक्षा खळबळ जास्त महत्त्वाची. आपण प्रेक्षक इतके मठ्ठ आणि फक्त वरवरच्या बातम्यांचे भुकेले आहोत का हो?
बरं कसे आहे की हे सगळे नवीन विचार आणि आचार आणि आपले ते जुने टाकाऊ, संकुचित विचार असे म्हणायची पण सोय नाही. कारण हा आमचाही काळ आहे. फरक आहे तो दृष्टिकोनामध्ये. मला खरंच आश्चर्य वाटते, कुठे गेली आपली शिकवण.. संयम ठेव, विवेकाने वाग, खरे बोल, कशाचाही अतिरेक करू नको, जीवन जग, हव्यास सोड, सभ्यता, शुचिता, सुशीलता ह्या सगळ्या गोष्टी, जगण्याचे तंत्र जमवून देणारी भारतीय तत्वद्य्नानाची बैठक, कुठे गेली? हा हक्काचा वारसा उधळून देऊन आपण आपले हे काय करून घेतले आहे??
खाद्यभ्रमंती - भाग ३
माझ्या लिहिण्याचा वेग माझ्या खाण्याच्या वेगाएवढा चांगला असला असता तर बहार आली असती (न पेक्षा किमान खाण्याचा वेग लिहिण्याचा वेगाएवढा कमी असला असता तरी चालले असते किमान पोटाच नगारा झाला नसता). किमान पहिल्या लेखानंतर दुसरा लेख जरा लवकर टाकता आला असता. पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही म्हणा, असेही कोणी वाचत पण नाही. त्यात हे टायमिंग प्रचंड चुकीचे आहे. २ ज्वलंत लेख चर्चेत आहेत त्यामुळे हा लेख फारसा कोणी वाचणार देखील नाही (ही आमची मनाची समजुत. एरवीसुद्धा कोणी वाचावे एवढे चांगले आपण लिहीत नाही हे माहीत असुनसुद्धा मनाची अशी समजुन घातली की बरे वाटते). तरी हा तिसरा भाग लिहीत आहे. (मला लेखाला लिंक देता येत नाही त्यामुळे तुम्ही न वाचलेल्या पहिल्या २ लेखांची लिंक इथे देता येत नाही आहे.)
इतर लेखांमुळे माझा हा लेख कोणीही वाचणार नाही असे जे मला वाटते आहे तसेच काहीसे माझे सातार्याच्या बाबत झाले. कोल्हापुर आणि इंदोर या २ चविष्ट शहरांमध्ये मी सातार्याबद्दल लिहायचे पुर्ण विसरलो कारण लिहिण्यासारखे काही आहे असेच मुळात वाटले नाही. सात तार्यांनी (तार्यांनी - टार्यानी नव्हे. कृपया गैरसमज करुन घेऊ नयेत) वेढलेल्या या गावात दुर्दैवाने खाण्याच्या बाबतित नाव काढु शकतील अश्या ७ जागा देखील नाहीत (किंवा मी तिथे असताना नव्हत्या).
या सार्यांची कमतरता भरुन काढतील अश्या २ गोष्टी मात्र गावात नक्की आहेत. एक आहे कंदी पेढे. पुण्यात जागोजागी (यात चितळे, काका हलवाई आणि घोडके देखील आले) मिळतात त्याला कंदी पेढे म्हणणे म्हणजे अगदी जीवावर येते. हे म्हणजे स्नेहा उल्लाळला (Lucky - No time for Love fame) ऐश्वर्या राय म्हणण्यासारखे आहे. कंदी पेढे खावेत ते केवळ सातरलाच आणि ते देखील केवळ मोदी किंवा लाटकर यांच्याकडें. यातील लाटकरांचे दुकान बहुधा पोवई नाक्यावर आहे आणि मोदींचे मोती चौकात. चु.भु.द्या.घ्या. कदाचित चुकीचे पत्ते असतील कारण बर्याच वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. पण चव मात्र अजुनही जिभेवर रेंगाळत आहे. तलतचे किंवा मन्ना डे चे एखादे गाणे कसे कानात रेंगाळत राहते तशीच काहीशी गोष्ट या पेढ्यांबद्दल होते. खमंग या शब्दाचा अर्थ समजुन घ्यायचा असेल किंवा गोड पदार्थांचे वर्णन करताना हा शब्द चपखल बसत नाही असे वाटत असेल तर आयुष्यात एकदा तरी हा पेढा खाऊन बघणे मस्ट आहे. खवा भाजताना तो अगदी योग्य प्रमाणात भाजुन पेढा कसा बनवायचा हे अनुभवायचे असेल तर फक्त मोदी किंवा लाटकर यांचा पेढाच खावा लागेल. जीभेपासुन जठरापर्यंत हा पेढा असा काही अवर्णनीय आनंद देऊन जातो की ज्याचे नाव ते.
सातार्याची दुसरी खासियत म्हणजे पालेकर. एखादी बेकरी जीभेला एव्ह्ढा आनंद देऊ शकेल असे मला कधीच वाटले नव्हते. दुर्दैवाने कालौघात पालेकर स्वत:चा दर्जा कायम राखु शकले नाही आहेत असे मात्र म्हणावे लागेल. १० वर्षांपुर्वीचे पालेकर आणि आत्ताचे पालेकर यांमध्ये जमीन अस्स्माचा फरक आहे. आणि तरीदेखील पालेकरांच्या टोस्ट्ला टक्कर देऊ शकेल अश्या फारश्या बेकर्या भारतात (हो भारतात) नाहीत असेच मी तरी म्हणेन. दुधाचे प्रमाण वाढवुन केले की टोस्ट चांगले होतात असे वाटणार्यांनी एकदा पालेकरांचे टोस्ट् खाऊन बघावेत. जास्त दुध न घालता सुद्धा किंवा कदाचित त्यामुळेच त्यांचे टोस्ट एकदम खमंग होतात. सातार्याबाहेर जाउन स्वतःची उत्पादने विकु शकण्याइतपत पालेकर प्रसिद्ध आहेत यावरुनच सगळे आले. "बटर" हा ज्या काळात कुत्रांच्या खाण्याचा पदार्थ होता त्या काळात यांनी त्याची सवय माणसाला लावली हे यांचे अजुन एक वैशिष्ट्य.
मंगळवार तळ्याजवळच्या गुजर आळीतील काटदरे हे अजुन एक प्रसिद्ध नाव. मसाल्यांसाठी काट्दरे हे एकेकाळी समानार्थी नाव होते. दुर्दैवाने नंतर केप्र, प्रवीण, कामधेनु यांच्या लाटेत काटदरे मागे पडले. एरवी पेढ्यांच्या या गोड शहराचा तिखट्पणा काटदर्यांनीच सांभाळला होता.
रजताद्री हॉटेल पुर्वी शहराचा हायलाईट होते. पण कालौघात आता हॉटेलची पुर्वीची शान नष्ट झाली आहे हेच खरे. कालाय तस्मै नमः अजुन काय?
जाहीर आभारप्रदर्शन सोहळा.....
... मला माझ्या एका छान मित्राचे आभार मानायचे आहेत...
.....कशाबद्दल?.....
....कारण त्याने माझं एकटेपण दूर केलं...
....मला व्यक्त होण्यासाठी...... माझ्यातल्या impulsive जाई ला मुक्तपणे व्यक्त व्हायला एक स्थान दिलं....
... अनेक प्रकारचे....वेगवेगळ्या विचारसरणीचे.....खुप छान मित्र दिले....
....जे काही थोडंसं लिहावंसं वाटतं ते लिहायला संधी..... आणि वाचायला अतिशय जाणकार्,सुज्ञ वाचकवर्ग दिला..
...एक निखळ आनंद ....कधीही न ओसरणारा आनंद त्यानी दिला..
....म्हणजे नक्की काय केलं?....तर त्याने मला मिसळपाव ची गल्ली दाखवली...
.....मिसळपावची ओळख करुन दिली....
....त्याचे नाव आहे 'स्वछंदी पाखरू'
मी जर काही बरे लिहिले,तुम्हा सर्व वाचक वर्गाला काही आनंदाचे क्षण देऊ शकले तर त्याचे सारे श्रेय "स्व्.पा." लाच जाते.
मी जर फार बोअर केले...कोणच्या भावना दुखाव॑ल्या, दंगल जाळपोळ केली ...तुमच्यापैकी कोणाला वाटले कि मला धरुन हाणावे...तर तेही श्रेय 'स्व्.पा." यांचेच असेल्... ते स्वतः माझ्या मिळकतीत भागिदार असतील.
विनोदाचा भाग निराळा...
मि.पा. वर येउन खरच अतिशय आणंद झाला....त्याबद्दल 'स्व.पा.' चे मनापासून धन्यवाद.
त्याबद्दल त्याना हार आणि पुष्पगुच्छ्....शाल आणि श्रीफळ हेही देण्यात येत आहे.
एवढे बोलुन मी माझे चार शब्द संपवते. मान्यवरांनी चार शब्द शांत चित्ताने ऐकुन घेतले त्याबद्द्ल मंडळ आभारी आहे.
हि साठा उत्तरांची कहणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
....जशी मला मिसळ्पाव प्रसन्न झाली तशी अजुन अनेकांना होवो.
जय हिंद्...जय महाराष्र्ट..!












