नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली.
हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले.
पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी. शतका नंतरच्या 39 धावा फक्त 11 चेंडूत काढल्या..
दोन्ही मॅचेस सुंदर झाल्या, पण लक्षांत राहिली ती तिसरी मॅच आणि कारण म्हणजे, दिप्ती शर्माने केलेला रन आऊट.
लिंक खाली देत आहे.
ज्यांनी, ही मॅच लाईव्ह बघीतली असेल, त्यांना ह्या रन आऊटचे महत्व नक्कीच समजले असेल...
दिप्ती शर्माने समयसुचकता दाखवून, योग्य तेच केले, पण खरे कौतुक वाटले ते, हरमनप्रीत कौरचे.
हरमन प्रीत कौरने दिप्तीची चांगलीच पाठराखण केली ...
https://www.loksatta.com/krida/harmanpreet-kaur-comment-on-deepti-sharma...
शेवट पर्यंत लढा देणारे खेळाडू आणि खेळाडूंची पाठराखण करणारा नेता असेल तर, संघ उत्तम खेळ करतोच..
1 ऑक्टोबर पासून, सुरू होणार्या, महिला क्रिकेट आशिया कप साठी, ह्या भारतीय संघाला शुभेच्छा....
प्रतिक्रिया
27 Sep 2022 - 3:54 pm | कुमार१
क्रिकेट आशिया कप साठी महिला भारतीय संघाला शुभेच्छा.! !
27 Sep 2022 - 4:21 pm | श्वेता व्यास
आशिया कपसाठी भारतीय संघाला शुभेच्छा.
दीप्तिने जे केलं त्याला पाठिंबा आहे, काही चुकलंय असं वाटत नाही.
27 Sep 2022 - 4:25 pm | श्रीगुरुजी
स्मृती मंधाना (९१, ४० व ५०) हिने सुद्धा सातत्याने फलंदाजी केली आहे. तिची फलंदाजी पाहून सौरभ गांगुलीची आठवण येते.
२० वर्षे ८ महिने आंतरराष्ट्रीय कारकीर्द असलेली झूलन गोस्वामी निवृत्त झाली. तितकीच मोठी कारकीर्द असलेली मिथाली राज सुद्धा निवृत्त झाली.
पण आता स्मृती मंधाना व हरमनप्रीत कौर या दोन फलंदाज व रेणुका ठाकूर ही गोलंदाज अत्यंत भरात आहेत. जोडीला यास्तिका भाटिया ही अत्यंत चपळ यष्टीरक्षक फलंदाज सुद्धा संघात आहे.
27 Sep 2022 - 6:29 pm | मुक्त विहारि
फक्त आता दोन उत्तम वेगवान गोलंदाज हवेत. राजेश्र्वरी गायकवाड, स्नेह राणा, दिप्ती शर्मा ह्या हरहुन्नरी आहेत. पण त्या वेगवान गोलंदाजी करत नाहीत.
पुजा वस्त्रकार आणि मानसी जोशी, तशा ठीक आहेत. पण झुलन गोस्वामीची उणीव जाणवत राहणार.
आघाडीची फळी, मधली फळी, यष्टीरक्षक, स्पिनर्स, ह्या सगळ्या गोष्टी भक्कम आहेत.
28 Sep 2022 - 5:23 pm | संजय पाटिल
दिप्ती शर्मा ला हरमनप्रीत कौर ने हिंट दिली होती.........
व्हिडीओ च्या सुरवातीला बघा...
28 Sep 2022 - 7:22 pm | मुक्त विहारि
सांघिक निर्णय, निर्णयाची अंमलबजावणी आणि घटने नंतर, कॅप्टनने केलेली पाठराखण..... ये नया भारत है ....
28 Sep 2022 - 10:20 pm | संजय पाटिल
+1