अगाधा भागाया
-शून्य माझ्यातले
घेता- भेटी आले
अनंतत्व
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले .
"दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें "
हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
अनंत जोखण्या
- हाती मोजपट्टी
नव्हती- हिंपुटी
नाही झालो
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो !
"क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
धून अनंताची
झंकारली गात्री
अनंताचा यात्री
तेव्हा झालो
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते !
"बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥ "
आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे!
माऊली म्हणतात : घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥
अहाहा.
खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :)
प्रतिक्रिया
25 Jul 2024 - 10:58 am | अथांग आकाश
प्रगती आहे! कॅटरपिलरकडे शिकवणी सुरु ठेवा!!
वाचकांचा मेन्दु कुरतडण्यात लवकर प्राविण्य मिळेल :-)
25 Jul 2024 - 11:01 am | Bhakti
चांगलय काव्य!
25 Jul 2024 - 12:23 pm | कर्नलतपस्वी
लिहीत रहा.
सुख दु:खाची मांदियाळी,
आयुष्य भोगीले
गुणिले भागिले हाती शुन्य आले
शुन्यात शुन्य मिळूनी ,अंनंत तत्व झाले
X/0 = ∞ ? !
25 Jul 2024 - 1:13 pm | अथांग आकाश
हुक शॉट येत नसेल तर बाउन्सर चेंडू सोडून द्यायचा!
उगीच बॅट मधे घातली तर फलंदाज झेलबाद होतो :-)
25 Jul 2024 - 1:51 pm | प्रसाद गोडबोले
अनंतयात्री ,
अफलातुन सुंदर लिहिलं गेलें आहे हे !
हे कडवे वाचल्या वाचल्या माऊलींच्या अभंगातील कडवे आठवले .
"दर्पणीं पाहता रूप न दिसे ओ आपुले | बाप रखुमादेवीवरें अम्ज ऐसे केलें "
हे म्हणताना माऊलींच्या मनात जी भावना असेल ती काहीसी अशीच असावी. आपण आपलाच शोध घ्यायला जातो अन लक्षात येतें की आपण ह्या अखंड अनंत अस्तित्वाचाच एक हिस्सा आहोत , रादर आपण तेच आहोत . मग तुम्ही म्हणता तसें अनंत्त्वाची भेटी होते !
मग हे जे अनंतत्व आहे ते मोजयला , कवेत घ्यायला गेलो तर कवेत घेताच येत नाही . जी आसावला , कसनुसा होऊन जातो !
"क्षेमालागीं जीव उतावीळ माझा । म्हणवूनि स्फुरताती बाहो । क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली । आसावला जीव राहो ॥ "
आणि मग पुढे - आणि मग हे अनंत कवेत येत नाही, समजुन घेता येत नाही, अनुभवता येत नाही. कारण कोण अनुभवणार ? आणि आणि हा अनुभवणारा हा ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनंत ,त्याच्यातच आहे सामावलेला, म्हणजे अख्खा अनुभवच ह्या अनंताच्या कवेत आहे, अनंतच आहेत , अनुभवणारा आणि अनुभाव्य भिन्न नाहीच ! आपण तोच आहोत ! आपल्याच अंतरात ती अनंताची धुन झंकारते !
"बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥ "
आणि मग हा केवळ झंकारण्याचा , ध्यानाचा समाधीचा एक क्षण रहात नाही, कारण प्रत्येक क्षणात, जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्हाला अनंतच दिसत आहे. त्यानंतर अख्खा प्रवासच अनंतात आहे ! तेव्हा तुम्ही अनंताचे यात्री झालेला असता , अनंताकडुन अनंताकडे अनंताच्या मार्गावरुन प्रवास करणारे!
माऊली म्हणतात :
घरामाजीं पायें । चालतां मार्गुही तोचि होये ।
ना बैसे तरी आहे । पावणेंचि ॥
अहाहा.
खुपच सुंदर कविता लिहिलीत तुम्ही आज. माऊलींची आठवण करुन दिलीत . मनःपुर्वक धन्यवाद :)
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !