प्रणयपंचमी
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...
विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..
प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी ,
झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी ,
धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी
निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी,
परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी,
सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी..
(या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )