कविता
तू म्हणतेस कवितेतल, तुला काही कळत नाही
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही
हलकी हसतेस नजरेतून, अदा जीव घेवून जाते
मतल्यासह एक सुंदर, गझल सहज होवून जाते
ही बेहोशी सखे, कुठल्या मैफीलीत मिळत नाही,
अन म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही..
मुक्तछंदात बोलताना, गुंफून घेतेस सहज आर्या ,
तुझ्या मात्रा मोजताना, गाते अभंग माझी चर्या,
काय लघु, काय गुरु, हिशोब काही जुळत नाही,
पण म्हणून काही तुझ, कविता होण टळत नाही..