माऊली उत्सव
|| माऊली उत्सव ||
विठु तुझ्या नामानं, 'मी'पणं गळलं
बासुरीगत झालं मनं, रितं न् पोकळं
तुझ्या फुंकरेनं केले, स्वर हे मधाळं
भक्तीरस झालं सारं, जीवन सकळं
जगी नश्वरी नाही, इथे माझा राम
देहभान बनले माझे, फक्त तुझा धाम
तुझ्या दर्शनाची असे, आज मला आस
मनमंदिरात माझ्या, फक्त तुझा वास
देवा तुझ्या नामाची, चढलीया धुंदी
कृतार्थाला सेवेची, दे रे एक संधी
मनामधी वाहीला, तुझाच भक्तीझरा
मनं माझं आतुरलेलं, मिळाया सागरा