राधा
कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..
पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..
-शैलेंद्र
कृष्ण जाणून घेण्यासाठी,
तुला राधा व्हावं लागेल,
रुक्मिणीच्या महाली त्याच,
येणं जाणं पाहावं लागेल..
पण एकदा तू हे जाणलस कि,
सदैव सचैल भिजत राहशील
या महालांच्या कोलाहलात
पावा होऊन वाजत राहशील..
-शैलेंद्र
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा
Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा..
चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा
Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा..
Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची
Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची..
Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King'
सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " ..
Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like
काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike..
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे;
जरी गीत माझे, तुला ताण आहे.
जरी ना निथळली, कधी कांत माझी;
तुझे पावसाळे, मला रोष आहे.
..............................................मुकुंद
रंग मनाचा,रंग क्षणाचा,
क्षणाक्षणाला विरघळणारा.
क्षणात हसरा,क्षणात हळवा,
डाव्या गाली ओघळणारा.
पुसता अश्रू आवेगाने,
रंग काजळी विस्कटणारा.
अंमळ उसासे स्फुंदत असता,
रंग बोचरा गहिवरणारा.
मित्रांची ती चौकट जमता,
रंग खुशीचा खळखळणारा.
कातरवेळी काहुरणारा,
पिंग गुलाबी रंग बावरा.
उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....
भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....
चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....
मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!
(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय,
अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय.
वेदना जुनीच...,
पावसामुळे पुन्हा फुललेली,
कॉफीच्या वादळासह,
पुन्हा मनात सललेली.
अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा,
उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा |
गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती,
जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती ||
म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....
ती एक वेडी
जुन्या आठवणींचा कोष
मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी
एक दिवस तिच्याही नकळत
हा कोष जाणिवेत आला
बघता बघता त्यातनं
एक सुंदर फुलपाखरू निघालं
तिच्या तळहातावर अलगद बसलं
अगदी विश्वासानं
ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली
त्याची ओळख पटवू पाहू लागली
हळूच त्याने पंख मिचकावले
तिला वाटलं
ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे
ओळख पटली
ती हसली
तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं
त्याच्या रूपानं हरखून गेली
जुन्या आठवणीत हरवून गेली
एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली
जेव्हा ती सोबत असते
तिची किम्मत नसते
तिच्या instructions..
कामं सांगणे अगदी नको वाटते
'किती ग तेच तेच सांगशील?
आता मी मोठी झाले... थोडं थांबशील?'
शिकणार आहे ग घरातली कामं
थोड मला भटकू तर दे...
तुझं ऐकतेच आहे;
पण हव तस जगु तर दे...
ए मैत्रिणीचा वाढ दिवस आहे
गिफ्ट काय देऊ?
तू किती ग ओल्ड फॅशन्ड
मी थोडा शॉर्ट ड्रेस घेऊ?
ए बाबांना पटवशिल?
हो म्हणायला सांगशील?
रात्रि थोssडा उशीर होईल...
तू सांभाळून घेशील?
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]
पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता,
माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!!
सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना,
दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!!
सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी,
नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!!
दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी,
तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!!
सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण,
वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!!