ती एक वेडी

Primary tabs

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
22 Jan 2017 - 5:26 pm

ती एक वेडी
जुन्या आठवणींचा कोष
मनाच्या कोपऱ्यात ठेवणारी
एक दिवस तिच्याही नकळत
हा कोष जाणिवेत आला
बघता बघता त्यातनं
एक सुंदर फुलपाखरू निघालं
तिच्या तळहातावर अलगद बसलं
अगदी विश्वासानं
ती कुतूहलाने त्याच्याकडे पाहत राहिली
त्याची ओळख पटवू पाहू लागली
हळूच त्याने पंख मिचकावले
तिला वाटलं
ते काहीतरी बोलतंय मिश्कीलपणे
ओळख पटली
ती हसली
तिच्या कल्पनेपेक्षाही ते आकर्षक निघालं
त्याच्या रूपानं हरखून गेली
जुन्या आठवणीत हरवून गेली
एकटेपणी त्याच्याच विचारात डुंबून गेली
पुन्हा एकदा नवथर प्रेमाची चाहूल लागली
तीच तरुणपणातील धडधड
तीच हुरहूर तीच ओढ़
तिचा विश्वास बसेना स्वतःवर
पण ती तिच्या भावनांशी
प्रामाणिक राहिली
तिला त्या फुलपाखराला असंच आनंदी ठेवायचंय....जपायचं.

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताशांतरसकलाकविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Jan 2017 - 12:04 pm | पैसा

कविता आवडली. पण जरा अपुरी अधुरीशी वाटते आहे.