माझ्या गावाचा पाऊस..
माझ्या गावाचा पाऊस
आडंरानी आडंवनी..
फुले अंगांगी हो त्याच्या
रूजे थेंब पानोपानी..
माझ्या गावाचा पाऊस
आडंरानी आडंवनी..
फुले अंगांगी हो त्याच्या
रूजे थेंब पानोपानी..
काल उघडले कपाट तेव्हा
पुन्हा भेटले मला आजोबा |
असण्याहूनही नसण्यामध्ये
नवे वाटले मला आजोबा ||१||
शुभ्र साजि-या वस्त्रांमधूनी
होते लपले असे आजोबा |
इंचघडीतून अलगद ज्यांनी
आम्हा जपले असे आजोबा ||२||
पुस्तकातल्या श्लोकांमधला
सुस्पष्ट असा तो ध्वनी आजोबा |
पत्ररुपाने अक्षर होऊन
अन् भिडणारे मनी आजोबा ||३||
कधी हास्याची झुळूक आणि
कधी गोष्टींची लाट आजोबा |
आकार आम्हाला देताना
शिस्तीचा परिपाठ आजोबा ||४||
भावनांना नेहमी का आवरावे
आणि अर्ध्यातून सारे का हरावे
धार का लागे तिच्या दो लोचनांना
काय त्याला हे कळावे बारकावे
चूक होते त्यात काही गैर नाही
मान्य ती त्याने करावी मोठ्या मनाने
एकदा त्याने तरी माघार घ्यावी
नेहमी मागे तिनेची का सरावे
डाव आहे दोन वेड्या पाखरांचा
दोन वेड्या पाखरांनी सावरावे
एक रडता एक का हसतो कधी हो
रुद्ध झाल्या पाखराला हासवावे
हासता हातात घ्यावा हात त्याने
ना पुन: होणार आता आर्जवावे
(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २)
अरे डिअरपिअर कशास बघतोस
स्वप्नात जुई... खोटे नाही सांगत
जुईले आणि मॅकबेथले...
काळाची उधई गिळी टाकई!
संध्याकाळच्या दिवा लावण्या
आधी तुझा विग काढून
टकल्यावरून हात फिरव
फ्रेश विग लावून सेल्फीकाढण्याचा
आणि कायप्पावर पोस्ट
करण्याचा जमाना आला
आणि तू(म्ही) अजूनही उधई
ने गिळलेल्या मॅकबेथपुशित
रमलेला आजच्या रमेला
गमत नाही.
चिउताई विणते सुरेख घरटं
तिला कुठे हव असते कुणाच कौतुक
कुणाचा support
किंवा एखाद पारीतोषिक..
ती बनवत असते आपल घरटं..
आपल्या चिमुकल्यासाठी
त्यांच्या काळजीपोटी.....
ती नाही हेवा करत..
आपल्यापेक्षा मोठ्या घरट्याचा
किंवा हट्ट नाही करत
मला अगदी सुगरणीचाच हवा खोपा
कारण तिला तिची झेपही माहीत आहे
आणि priority देखील...
माणसां सारखी वेडी नाही ती
जीवघेणी स्पर्धा करायला..
निर्जीव वस्तुंच्या मागे धावताना
जगणं ओवाळून टाकायला
चालला मार्गावरूनी तो
तोच माझा मार्ग आहे
त्याच्याच पाठी चाललो मी
तोच माझा दीप आहे
दाखवी प्रकाश मजला
राहुनी माझ्यापुढे
पाठीचे संकट त्याने
आधीच निवारलेले असे
पाठराखण कशास हवी
तो मार्गदर्शक असता जरी
पाठच्या वारांची आता
तमा न बाळगे मी तरी
तव पावलावरी पाऊल ठेवुनी
नि:शंक झालो मी उरी
दर्शनाची आस माझी
भागवी जन्मांतरी.
आठवणी क्षणांच्या
क्षणातील भावनांच्या
भावनातील स्पंदनांच्या
स्पंदनातील आवेगाच्या
आठवणी पावसाच्या,
पावसातील प्रवासाच्या,
प्रवासातील गाण्याच्या
गाण्यातील प्रेयसीच्या
आठवणी थंडीच्या
थंडीतील शेकोटीच्या
शेकोटीतील हुरड्याच्या
हुरड्यातील गोडीच्या
आठवणी उन्हाळ्याच्या
उन्ह्याळ्यातील सुट्टीच्या
सुट्टीतील पुस्तकांच्या
पुस्तकातील जादूच्या
आठवणी खेळाच्या
खेळातील भांडणाच्या
भांडणातील मैत्रीच्या
मैत्रीतील ओलाव्याच्या
बसण्याचा हिशोब साचा
एक ग्लास त्याचा, एक माझा!
दिसायला दोन्ही एकच
ब्रँडही सारखाच
फक्त चखण्याची रित
ज... रा निराळी
म्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा!
माझा आधी संपेल, त्याचा नंतर
चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर..
त्यातूनच घडते जादू शेवटी
टेस्टी... लज्जतदार... सुरंगी
पण तरिही..
एक ग्लास त्याचा, एक माझा!
रोजची गर्दी, रोजचा प्रवास, कटकट करत मी ऑफिसला येतो
कंपनी ची कॉन्फरन्स, गोव्याला जायचं, आनंदाचा माहोल असतो
हो काय? मी साशंक होतो. कसला तरी विचार करतो
आता मिळाला ना ब्रेक ! मग यावं नाही का आनंदाला उधाण! मी म्हणतो
उलट इथे मात्र मनालाच कसलातरी ब्रेक लागतो
नाही; माझा प्रॉब्लेमच आहे.
आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी
तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी
केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी
ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी
आज वाटते ...
अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी
जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी
ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी
आज वाटते ...
मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी
गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी
ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी
आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी