(माफी नाम्यांची रांग आहे, विडंबन काळाची मांग आहे प्रेर्ना १ प्रेर्ना २)
अरे डिअरपिअर कशास बघतोस
स्वप्नात जुई... खोटे नाही सांगत
जुईले आणि मॅकबेथले...
काळाची उधई गिळी टाकई!
संध्याकाळच्या दिवा लावण्या
आधी तुझा विग काढून
टकल्यावरून हात फिरव
फ्रेश विग लावून सेल्फीकाढण्याचा
आणि कायप्पावर पोस्ट
करण्याचा जमाना आला
आणि तू(म्ही) अजूनही उधई
ने गिळलेल्या मॅकबेथपुशित
रमलेला आजच्या रमेला
गमत नाही.
तुझी सगळी टिव टिव
१४० अक्षरात बशीव
आणि कायप्पा ग्रूपवरच्या
गर्दीतून स्पर्धा कर
टुईचे लक्ष्य वेधण्याची
अरे डिअरपिअर थारी
जुईने आणि मॅकबेथने
काळाची उधई गिळी टाकई!