माझ्या गावाचा पाऊस..

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
27 Jun 2017 - 7:24 pm

माझ्या गावाचा पाऊस
आडंरानी आडंवनी..
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/cp0/e15/q65/s600x600/18922033_105872673352925_8587622378336631223_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=519629344698b21dc06628f17fbe1306&oe=59D981D6
फुले अंगांगी हो त्याच्या
रूजे थेंब पानोपानी..
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/19420804_118326778774181_6912292472134499207_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=e2d290e6462630a4a5a94090d637f59e&oe=59DF9203

माझ्या गावाचा पाऊस
मऊ रुजाळ वेल्हाळ..
https://lh5.googleusercontent.com/-Cm3U2CBu5IU/U9uonTxQMhI/AAAAAAAAGOI/Fl7ST6BAoig/w436-h581-no/IMG_20130818_103510.jpg
त्याने हाकं मारू जाता
होते मातीचं आभाळ..
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/18951412_105872680019591_2022322534932686922_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=4b9f0a511ce5c6fa26a1e59f6b568e0c&oe=5A11FED7
माझ्या गावाचा पाऊस
नारळाला हाकं मारी..
https://lh4.googleusercontent.com/-U1p4m3N4i7A/U9upZm38uII/AAAAAAAAGOQ/bkpoTFvwN0M/w436-h581-no/IMG_20130818_103543.jpg
सुपारिही चिंबंऒली
करे त्याला जोराजोरी..
https://lh6.googleusercontent.com/-YsJXTIRVGXY/U9umzOXaNKI/AAAAAAAAGN4/T_HIMq8HT1U/w436-h581-no/IMG_20130818_103205.jpg

माझ्या गावाचा पाऊस
तुळशी व्रुंदावनी सजे..
https://lh3.googleusercontent.com/-Ao2-YDsW2Jg/U9up-CJZYaI/AAAAAAAAGOY/fFZaeyEJk6Q/w436-h581-no/IMG_20130818_103729.jpg
त्याचा भिजला बांधंवा
मनी गूजं गुजंगूजे..

माझ्या गावाचा पाऊस
घरा छपरांशी बोले..
https://scontent-lax3-1.xx.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/19113820_111724552767737_6523601374709604179_n.jpg?efg=eyJpIjoidCJ9&oh=a51b78414fa9e061491a03193f478ae9&oe=59C78602
वाट बाहेरं कोरडी
आत आंगणंची ऒले..

असा गावाचा पाऊसं
लावी जीवा हूरंहूरं...
https://lh6.googleusercontent.com/G2rWUvp4HNHbaJQlLVEOmytvKLpK11AqhSbVJCXOfHk=w774-h581-no
आत आठवण राहिॆ
गावं गेला दूरं दूरं.. !
https://lh4.googleusercontent.com/-BLCLDiTNJf4/U9uykGYnp2I/AAAAAAAAGRs/0Cwbklzr3gs/w774-h581-no/lahan%2Bcinga%2B342.jpg
===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
माझ्या गावाचा पाऊस
आडंरानी आडंवनी..
फुले अंगांगी हो त्याच्या
रूजे थेंब पानोपानी..

माझ्या गावाचा पाऊस
मऊ रुजाळ वेल्हाळ..
त्याने हाकं मारू जाता
होते मातीचं आभाळ..

माझ्या गावाचा पाऊस
नारळाला हाकं मारी..
सुपारिही चिंबंऒली
करे त्याला जोराजोरी..

माझ्या गावाचा पाऊस
तुळशी व्रुंदावनी सजे..
त्याचा भिजला बांधंवा
मनी गूजं गुजंगूजे..

माझ्या गावाचा पाऊस
घरा छपरांशी बोले..
वाट बाहेरं कोरडी
आत आंगणंची ऒले..

असा गावाचा पाऊसं
लावी जीवा हूरंहूरं...
आत आठवण राहिॆ
गावं गेला दूरं दूरं.. !
===========
अत्रुप्त...
===========

भावकविताशांतरसकविता

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

27 Jun 2017 - 7:51 pm | अभ्या..

अरेरेरेरे,
मला वाटले होते "इथं इथं बस रे मोरा, गणू घालतो चारा" टाईप कैतरी असेल, पण श्या.....
कोकणचा पावूस...
तसा छान लिहिलाय म्हणा हा पण, ;) पण.........

पद्मावति's picture

27 Jun 2017 - 7:55 pm | पद्मावति

सुरेख!

जेनी...'s picture

27 Jun 2017 - 8:59 pm | जेनी...

सुंदर !

एकदम रीफ्रेस्शिंग :)

पिक्स एकदम लाजवाब गुर्जि

( लाज राखली या कवितेने काव्यविभागाची )

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2017 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा

@पिक्स एकदम लाजवाब गुर्जि››› धन्यवाद गो बालिके. :)

सत्यजित...'s picture

27 Jun 2017 - 11:20 pm | सत्यजित...

सुरेल रिमझिम!

दशानन's picture

27 Jun 2017 - 11:30 pm | दशानन

जबरदस्त फोटो!!
आवडले :)

शार्दुल_हातोळकर's picture

28 Jun 2017 - 12:54 am | शार्दुल_हातोळकर
शार्दुल_हातोळकर's picture

28 Jun 2017 - 12:56 am | शार्दुल_हातोळकर

फारच उत्कृष्ट वर्णन !!

पण या कवितेवरचा अगोदरचा माझा प्रतिसाद कुठे गायब झाला? :-)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2017 - 6:03 am | अत्रुप्त आत्मा

आधी पोस्टलेली कविता फाटेल एरर मधे उडली..! तस्मात,, प्रतिसादही उडून गेले.

इडली डोसा's picture

28 Jun 2017 - 2:28 am | इडली डोसा

फोटोसुद्धा अगदी समर्पक आहेत.

फोटोंमुळे कवितेला वेगळाच उठाव आला आहे. मस्तच आहे भटजी!

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Jun 2017 - 2:41 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सचित्र कविता !

छान कविता आणि सुंदर फोटो!

मुक्त विहारि's picture

28 Jun 2017 - 7:00 am | मुक्त विहारि

पण...

स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही....

पुर्वीचे मिपा राहिले नाही...

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2017 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा

@स्मायली वाल्या बाबांची कलाकृती असून पण अद्यापही स्पांडूंचा प्रतिसाद नाही....

पुर्वीचे मिपा राहिले नाही...››› चुकलात.. चुकलात तुम्ही! मिपा तेच आहे. स्पांडू~रंग बदललाय!

मुक्त विहारि's picture

1 Jul 2017 - 4:19 pm | मुक्त विहारि

असेल. असेही असेल.

सरड्यापेक्षा पण जास्त वेगात माणूसाचे मूड बदलतात.काही दिवस आमचा पण सक्तीचा मिपासंन्यास होताच की.... त्यामुळे थोडे दिवसांत परत "स्पा" पण इथे येईलच.

अभिजीत अवलिया's picture

28 Jun 2017 - 10:31 am | अभिजीत अवलिया

कविता सादर करताना फोटोंतून प्रत्यक्ष चित्र दाखवण्याची कल्पना आवडली.

सस्नेह's picture

28 Jun 2017 - 11:34 am | सस्नेह

सुरेख ओढाळ रचना !

काय सुंदर जमलय फोटो अन कविता.!

हृषीकेश पतकी's picture

28 Jun 2017 - 3:35 pm | हृषीकेश पतकी

क्या बात है... कविता आणि छायाचित्रे दोन्हीही उत्तम!

इरसाल कार्टं's picture

28 Jun 2017 - 4:52 pm | इरसाल कार्टं

भिजवलंत हो.

प्रचेतस's picture

28 Jun 2017 - 6:55 pm | प्रचेतस

छान

फारएन्ड's picture

29 Jun 2017 - 4:26 am | फारएन्ड

मस्त, आणि एकदम वेगळी!

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

29 Jun 2017 - 5:12 pm | सिद्धेश्वर विला...

मस्त जिलब्या पडल्यात

गाव एकच वाटतंय

पावसात सुंदर नटलंय

माझ्या पण गावात पाऊस अस्संच बोलतो

नुसता बोलतोच नाही तर छपरांशी भांडतो

कधी उडवतो अन लावतो बघायला आकाश

म्हणतो , घ्यावा कधी कधी मोकळा श्वास

मी मुक्त असलो तरी अतृप्त तुझ्यावाणी

ऐकत असतो नेहेमीच निसर्गाची वाणी

भारावतो कधी लोळतो कुशीत त्याच्या

नेहेमीच बनतात नव्या कविता , नव्या पावसाच्या न गावाच्या

अनन्त्_यात्री's picture

1 Jul 2017 - 10:53 am | अनन्त्_यात्री

.

ज्ञानोबाचे पैजार's picture

1 Jul 2017 - 4:21 pm | ज्ञानोबाचे पैजार

कविता अत्यंत आवडली. आणि फोटुंमुळे वाचायला मजा आली.
पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2017 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा

सर्व वाचक,प्रतिसादकांचे मन:पूर्वक धन्यवाद. :)

सानझरी's picture

5 Jul 2017 - 8:06 pm | सानझरी

सुंदर कविता आणि फोटो..!!