चालला मार्गावरूनी तो
तोच माझा मार्ग आहे
त्याच्याच पाठी चाललो मी
तोच माझा दीप आहे
दाखवी प्रकाश मजला
राहुनी माझ्यापुढे
पाठीचे संकट त्याने
आधीच निवारलेले असे
पाठराखण कशास हवी
तो मार्गदर्शक असता जरी
पाठच्या वारांची आता
तमा न बाळगे मी तरी
तव पावलावरी पाऊल ठेवुनी
नि:शंक झालो मी उरी
दर्शनाची आस माझी
भागवी जन्मांतरी.