!! माझ्या सवता !!
सुख आणि दुःख, या दोघी दिव्य कांता,
माझ्या एका छताखाली, सवे नांदतात आता !!१!!
सुख थांबता थांबेना, दुःख वीरता विरेना,
दोघी जन्मांच्या सवती, काही केल्या ही जमेना !!२!!
सुख - माझी लडीवाळी, मात्र ऐट तिची भारी,
नित्य शालू तिच्या अंगी, लोकांची रांग लागे दारी !!३!!
दुःख - माझी अर्धांगिनी, तीच एकटी माझ्या उराशी,
तिचा एक साडीचा संसार, जशी स्वतःघरी दासी !!४!!
सुख - जेव्हा आली माझ्या घरी, साजरे झाले मोठे सण,
वायू गेली माझ्या शिरी, अंगी आले मोठेपण !!५!!