अशी एक फक्त कल्पना असावी.
सोनेरी त्या क्षणाला एकांताची साथ असावी...!
गुलमोहराचा बहर,
आणि तिथेच आपली भेट असावी...!
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट असावी...!
तू मात्र,,,
आवडत्या आकाशी रंगाच्या,
पोशाखात असावी...!
आकाशालाही हेवा वाटावा,
इतकी तू सुंदर दिसावी...!
निरोप घेतांना डोळ्यांमध्ये,
अश्रूची एक झलक असावी...!
डोळ्यामधले भाव जाणूनी,
नाजुकशी ती मिठी असावी...!
जीव ओतला तुझिया पायी,
आशा तुझीही हीच असावी...!
एकमेकांची साथ अशी ही,
दरवेळी रम्य असावी...!
प्रतिक्रिया
7 Nov 2016 - 12:42 pm | मराठी कथालेखक
पाखराची ड्रीम डेट !! भन्नाटच गं
पण एखाद्या पाखराची डेट कशी असेल ? दोन पाखरांची डेट असं म्हण
7 Nov 2016 - 2:45 pm | Bhagyashri sati...
धन्यवाद :)
9 Nov 2016 - 7:48 pm | ज्योति अळवणी
खूपच आवडली. प्रेम भाव खूप छान मांडता तुम्ही
22 Nov 2016 - 8:18 pm | विनायकपाटील८९
एक नंबर..... खूप छान...