फक्त तुझ्यासाठी...! 2

Bhagyashri satish vasane's picture
Bhagyashri sati... in जे न देखे रवी...
1 Nov 2016 - 8:19 pm

तु गेलीस पण
हा मावळता सुर्य
पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या
तेथेच स्तब्ध राहिल्या
फक्त तुझ्यासाठी
मनामध्ये प्राजक्तांच्या
फक्त तुझ्यासाठी
एकदा वादळ ही सुटले
पण ते ही शांत झाले
फक्त तुझ्यासाठी
येत्या पावसाळ्यात
आनंदाचे झरे वाहणारे
फक्त तुझ्यासाठी
शेवटी-शेवटी या
फुलांमधील गंध ही
सुगंधीत होणार
फक्त तुझ्यासाठी
आकाशातील तार्यांचा
शितल गारवाही मंदावणार
फक्त तुझ्यासाठी
तो रोजचा वारा आहे
पण तो रोजचा आहे
पण तो तुला विसरणारा आहे
फक्त तुझ्यासाठी
माझ्या प्रेमाच्या फुलांची ओंजळ
फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!

प्रेम कविताभावकवितामुक्त कविताप्रेमकाव्यरेखाटन

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

1 Nov 2016 - 9:05 pm | चांदणे संदीप

एकदम.... मुलगी शिकली, प्रगती झाली छाप वाक्य आठवलं ग तै! ;)

छान कविता!

Sandy

Bhagyashri satish vasane's picture

1 Nov 2016 - 10:07 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद, आणि भाऊबीजेच्या सर्वांना खूप शुभेच्छा :)

सतिश गावडे's picture

1 Nov 2016 - 10:31 pm | सतिश गावडे

हा बराच सकारात्मक विचारांचा आहे असे दिसते. तिने तिकडे जीव वगैरे देण्याची भाषा केली आहे.
या कवितेची प्रेरणा "झोंका हवा का आज भी" हे गाणं आहे का?

एस's picture

2 Nov 2016 - 12:51 am | एस

आई गं! :-(

संदीप डांगे's picture

2 Nov 2016 - 8:24 am | संदीप डांगे

..भोगा आपल्या कर्माची फळे ;)

@वासने ताई, छान आहेत कविता, आम्ही बारावीत असताना अशाच भाविविश्वात मग्नरम्य राहायचो, त्याच्या आठ्वनींनीने भूक लागली.. नाश्ता करायला पाहिजे.. फक्त तुझ्याचसाठी,

अजून येऊनद्या! निरागसपणाचा दुष्काळ माजलाय मिपावर, आणि प्रगल्भपणा तर काय नैच..:)

Bhagyashri satish vasane's picture

2 Nov 2016 - 3:23 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद, पण निरागस कविता लिहीनं वाईट आहे का?

संदीप डांगे's picture

2 Nov 2016 - 3:37 pm | संदीप डांगे

आज्जीबात नाही, तुम्ही लिहीत राहा, प्रतिक्रियांचा विचार करू नका, आम्हा म्हाताऱ्या खवटांच्या तर अजिब्बात नको..

मराठी कथालेखक's picture

7 Nov 2016 - 1:02 pm | मराठी कथालेखक

तुझं लेखन निरागस आणि भावूक आहे.
पण यादी वाचल्यासारखं वाटू नये.
चंद्र, चांदण्या, प्राजक्त, झरे, गंध , तारे आणि शीतल वारे, झालंच तर रोजचा वारा वगैरे ई. ई यादी खूप मोठी आहे, ती वाचताना भावूकता हरवते.
झालंच तर चांदण्या, प्राजक्त हे जरा जुनं झाल.
Jio चा datapack फक्त तुझ्याचसाठी,
snapdeal ची deal फक्त तुझ्याचसाठी,
LED चा प्रकाश फक्त तुझ्याचसाठी,
मिपावरचे प्रतिसाद फक्त तुझ्याचसाठी
असंही काही होवू शकेल काय ?

राग मानू नकोस, मला जावेद अख्तरचं 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हे गाणं पण आवडत नाही उगाच याद्या दिल्यायत असं वाटतं (जैसे उजली किरण, जैसे बन में हिरन, जैसे चांदनी रात, जैसे नर्मी की बात ई ई).
[म्हणजे मी तुझी तुलना जावेद अख्तरशी करत आहे बर !! :) ]

Bhagyashri satish vasane's picture

7 Nov 2016 - 2:48 pm | Bhagyashri sati...

धन्यवाद सर :)