तुझी खुप आठवण आली तर काय करु?
तुलाही माझी आठवण करुण देऊ
की एकटीच तुझ्या आठवणीत झरु
तुझ्याशी बोलावसं वाटलं तर काय करु?
स्वत:शीच गप्पा मारु
की अबोल राहुन मौन व्रत धरु
तुला बघावस वाटलं तर काय करु?
तुला शोधत राहू
की स्वत:ला एकांतात नेऊ
तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करु?
तुझा पहिला स्पर्श आठवू
की तु आता माझा नाहिस ही मनाला जाणीव करुन देऊ
तुझी आठवण घेऊन जाऊ
की तुला विसरण्यासाठी जीव देऊ...!
प्रतिक्रिया
31 Oct 2016 - 10:15 pm | चांदणे संदीप
घसरूण गेलो!
शेवटली ओळ वाचून सिरीयस व्हायला झालं राव! असलं काहीबाही नका लिहित जाऊ ओ! :O
Sandy
31 Oct 2016 - 10:19 pm | Bhagyashri sati...
अहो कविता कल्पनात्मक आहे संदीप भाऊ.
1 Nov 2016 - 3:24 pm | चांदणे संदीप
पण चांगल्या कल्पना कर की ग तै... :(
1 Nov 2016 - 3:29 pm | चांदणे संदीप
पण चांगल्या कल्पना कर की ग तै... :(
तेर्कू सायलीच पटींगा रे येडे
मेर्कू आती तेरी लैच्च कीव
फुडले सोम्मारतक नै सुधरा ना
तो मैच्च लेती तेरा जीव!
- सलमा (आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, सोलापूर, सेकंड ईयर)
तुझा जीवच घेते... वगैरे 'चांगलीच' कल्पना आहे! ;) आपण आपला जीव का द्यावा? ;)
Sandy
1 Nov 2016 - 5:05 pm | एस
कसं काय सुचतं हो असं लिहायला? मी तुमच्या कविताणचा फॅण झालो आहे.
1 Nov 2016 - 8:21 pm | Bhagyashri sati...
दुसरा भाग पण येतोय कवितेचा, नक्की वाचा
7 Nov 2016 - 1:06 pm | मराठी कथालेखक
छान लिहिलयंस.
विरहामुळे निर्माण झालेली व्याकुळता चांगली मांडलीयेस.
7 Nov 2016 - 2:49 pm | Bhagyashri sati...
धन्यवाद