संध्याछाया..
संध्यासमयी देवालय हे आकाशाशी सरते..
एक अशी हि अबोल संध्या मनामधेही उरते.
माहीत नाही तिचे नि माझे कुण्या जन्मीचे नाते
ओळख नसता जन्मखुणा ती कुठल्या कसल्या देते!?
दूर देशीचा वाटसरू मी आलो या संध्येशी
नकळत नाते कसेच जुळले हिच्या मग्न छायेशी?