भावकविता

राधा कृष्ण....... जर...

शशीभूषण_देशपाण्डे's picture
शशीभूषण_देशपाण्डे in जे न देखे रवी...
23 Sep 2015 - 8:51 pm

"राधा"
घननीळा, का अवेळीच तू
या राधेला परत भेटला?
विराण आता झाले गोकुळ
जुना पुराणा कदंब वठला

अता न उरली स्वप्नामधली
तरल अनामिक धूसर नाती
कुठे पाहसी कृष्णा मधुबन
भयाण या अवसेच्या राती

कालिंदीचे उदासले जळ
अता लोपली त्याची खळखळ
नि:शब्दाचे पिसाट वारे
ठेवून फिरते उरात खळबळ

अता न उरल्या काठावरच्या
कुरणातिल चरणाऱ्या गायी
टपोर त्यांच्या डोळ्या मधली
दूर हरवली वत्सल आई

तुझ्या करातील सुस्वर मुरली
आठवते केवळ प्राचीनता
चैतन्याचा सूर हरवूनी
फक्त विराणी गाते आता

भावकविताहे ठिकाण

अंबाडा

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
21 Sep 2015 - 8:45 pm

अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?

प्रतिमा मोहक ती अर्पण
पाण्याचे त्या होई दर्पण
स्पर्शाविना शिरशिरीचा
कुणी तरंग लहरता सोडला?

दवांसोबत हलके निजेतून
बाग पाहते डोकावून
दहादिशांना बहकवणारा
कुणी गंध नाशिला सोडला?

ना अजून भैरवी निजली
ना अजून भूपाळी उठली
क्षितीजावर सकवार सुरांचा
कुणी राग मारवा सोडला?

अंधाराचा अन पहाटेचा
तो बंध हळवा सोडला
पैलतीरावर त्या घाटावर
कुणी अंबाडा सोडला?

- संदीप चांदणे

कविता माझीभावकविताकविताप्रेमकाव्य

राधा कृष्ण

शशीभूषण_देशपाण्डे's picture
शशीभूषण_देशपाण्डे in जे न देखे रवी...
20 Sep 2015 - 8:35 pm

अजून म्हणती फिरते राधा
यमुनेच्या निर्जन काठावर
अजून वाटते तिला सख्याच्या
ऐकू येतिल मुरलीचे स्वर !!

आणिक इकडे तीरावरती
लाटा उठती सुन्या सागरी,
बुडून गेली भग्न द्वारका
जिथे विसर्जित शाम मुरारी!

भावकविताहे ठिकाण

हे काय कमी काय?

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Sep 2015 - 9:46 pm

उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!
वादळात भोवंडून, अनोळखी जग पाहून
घरी परततात माणसं, हे काय कमी काय?
सापडत नाही एखाद्याला हवा तो किनारा
नाव परतते मुक्कामाला, हे काय कमी काय?
सुटत नाहीत कोडी, वाढत जातो गुंता
पाय वळतात दाराशी, हे काय कमी काय?
भरल्या घरात एकेकाचा रमत नाही जीव!
मरत नाहीत बेवारस, हे काय कमी काय?
उठून जातात तेव्हा, आपलीच असतात माणसं
परतून येतात तेव्हाही, आपलीच असतात माणसं!

कविता माझीभावकवितामुक्त कवितासांत्वनाकरुणकवितासाहित्यिकजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

वैराग्याकडे पाउले

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
16 Sep 2015 - 12:10 am

छंद लावला, जोपासला जोपासला
वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला
पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले
सर्वां जसे नंदनवनच मिळाले

पण आता …

नद्या, तळी, निर्झर आटले,
टिपूसभर पाणी मिळेनासे झाले
आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले,
तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?

भावकविताकविता

किती भाग्यवान आम्ही!

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 Sep 2015 - 12:15 am

किती भाग्यवान आम्ही,
आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!
किती गंडलो आम्ही!
मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही,
'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले!

उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक!
नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच,
छातीठोकपणे सांगावेच कुणी!

आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या...
नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत,
असे पाय दाखवावेतच कुणी!

प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत?
'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत
अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही
असा त्रिशंकू भेटावाच कधी!

अनर्थशास्त्रकविता माझीफ्री स्टाइलभावकवितामुक्त कवितासांत्वनावावरसंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतर

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 10:00 am

पेरणा

वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा
खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा...

निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा
सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा..

टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे
जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा..

दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी
हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे
ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे...

हम्माऽऽऽ ...

dive aagarmango curryvidambanकविता माझीकालगंगाकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीछावानागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीमुक्त कवितावाङ्मयशेतीविठ्ठलशिववंदनामुक्तकविडंबन

तू ग

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 12:16 am

समर्थ असूनही अबला तू
सबल मनाची कोमला तू

नभोवनीचा शीतल चंद्र
अन्... तप्त सूर्याची आभा तू

मनमोकळा निर्झर तू ग
हृदयस्थ गंभीर डोह ही तू

स्वर गंगेचे आरोह कधी तू
कधी दबलेली आर्तता तू

सर्वात असूनही.. एकटीच तू ग
तुझ्या मनीचा आधार तू

भावकविताकविता

प्रणयपंचमी

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in जे न देखे रवी...
10 Sep 2015 - 12:05 am

हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...

विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी..

प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी ,
झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी ,
धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी

निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी,
परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी,
सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी..

(या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )

भावकविताकविता

एकांत

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
29 Aug 2015 - 5:32 pm

कोणते हे फूल, वा
काय त्याचे नाव?
विचारतो ना सांगतो
तो स्वतः शी बोलतो!

कळी आज लाजते
फूल उद्याला हासते
पाहतो! ना बोलतो,
तो स्वतः शी हासतो!

रंग हिचा केशरी
गर्द तिचा सोनेरी
स्पर्शतो ना तोडतो
तो स्वतःशी रंगतो!

...... .....
फूल त्याच्या अंतरीचे
किती कसे कळलावे?
डोलते ना थांबते
वाऱ्यातून हुरहुरते!

भावकविताकविताप्रवास