रातीत लाज ओली
रातीत लाज ओली
शेजेवरी पहुडली
गंधीत मोगऱ्याच्या
चंद्रसवे नहाली.
पावली पैंजणाचा
वैरी भार होता
निजल्या स्वप्न पंखी
दुबळा आधार होता
घरट्यातले दु:ख ते
माझे मलाच माहीत
भळभळत्या जखमाच नुसत्या
घाव कुठेच नाहीत.
माथ्यावरी विस्कटल्या
रेखा संचिताच्या
माझे मला कोंडले मी
चंद्रात कुंकवाच्या...
कवी : अर्व (निशांत तेंडोलकर)