तिला पहिल्यांदा पाहिल तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो
तिचे टपोरे डोळे, लांबसडक केस
आणि त्यात माळलेला तो मोगर्याचा गजरा
पण मला ह्यातले काहिच दिसले नव्हते
कारण ती माझ्या कडे बघुन जेव्हा हसली
तेव्हा तिच्या गालावर पडलेल्या खळीने मी घायाळ झालो होतो.
जळी स्थळी, काष्ठी पाषाणी मला तिच दिसत होती
प्रेम ही माझी गरज होती लग्न ही तिची
मी तिची अडचण समजाउन घेतली आणि
मग मी तिच्याशी एक करार केला परत भेटण्याचा.
जस प्रेम एकतर्फि होत तसाच हा करार पण होता
पण शेवटी करार हा करारच असतो
मग मी प्रेम करतच राहिलो आणि
ती लग्न करुन निघून गेली
पण माझा स्वतःवर विश्र्वास होता आणि तिच्यावरही
मी तिची वाट बघत थांबलो
मला खात्री होती
एक ना एक दिवस ती परत येणार
आणि तसेच झाले एक दिवस ती माझ्या कडे आली
कोणाचा विश्र्वास बसणार नाही
पण खरच एक दिवस ती माझ्या कडे आली
स्वतःच्या पायांनी चालत ती माझ्या कडे आली
माझ्या समोर येउन उभी राहिली
माझ्या डोळ्यात डोळे घालून कितीतरीवेळ पहात राहिली
माझ्या डोळ्यात ती काय शोधत होती कोण जाणे
पण मी मात्र तिच्या डोळ्यांच्या दर्या मधे उडी मारुन मनसोक्त पोहून घेतले
ती अजूनही तशीच होती जशी पहिल्यांदा दिसली होती तशीच
गालावरची जी खळी बघुन मी पागल झालो होतो ती खळी देखील तशीच होती
आगदी तशीच
बराचवेळ एकमेकांकडे पाहिल्यावर ती दचकून भानावर आली
आणि म्हणाली "काय करतोस कसा आहेस? बर्याच वर्षांनी दिसलास"
आणि मग कडेवरच्या नातवा कडे बघत म्हणाली "या अजोबांना ओळखलस का?"
मला पुढले काहीच ऐकू आले नाही.
पुढच काही ऐकुन घेण्याची गरजच नव्हती.
तिने करार पाळला होता
आणि अता मला देखिल आता माझे उरलेले आयुष्य समाधानाने जगायचे
एक सबळ कारण मिळाले होते
कारण आता मी तिच्याशी दूसरा करार केला होता
पुढच्या जन्मी सुध्दा तिच्यावरच प्रेम करत रहाण्याचा
एकतर्फिच असला तरी करार हा करारच असतो.
आणि प्रेम हे प्रेमच असते.
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
17 May 2015 - 10:34 am | चित्रगुप्त
का कुणास ठाऊक, कविता वाचून गाणे आठवले: "जाने क्या ढूंढती रहती है ये आंखें मुझ मे .. राख के ढेर मे, शोला है न चिन्गारी है ...."
17 May 2015 - 11:51 am | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त मस्त!
18 May 2015 - 9:06 am | अत्रुप्त आत्मा
वाह!
19 May 2015 - 7:15 pm | सूड
मस्त!!
19 May 2015 - 7:17 pm | पैसा
प्रेम आवडलं अन करार पण!
20 May 2015 - 8:59 am | नाखु
कराराची (द)मदार प्रेमांकीत प्रत स्वीकारली आहे.
एकतर्फी कराराचा शिलेदार
नाखु