वैराग्याकडे पाउले

शेखरमोघे's picture
शेखरमोघे in जे न देखे रवी...
16 Sep 2015 - 12:10 am

छंद लावला, जोपासला जोपासला
वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला
पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले
सर्वां जसे नंदनवनच मिळाले

पण आता …

नद्या, तळी, निर्झर आटले,
टिपूसभर पाणी मिळेनासे झाले
आज जरी पक्षांना उडवून घालवले, अखेरचे बागेत पाणी शिंपले,
तरी डोळा टिपूस न आले, हीच का वैराग्याकडे पाउले?

भावकविताकविता

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

16 Sep 2015 - 11:06 am | पद्मावति

छान जमलीय कवीता. फक्त कवीतेची लांबी फारच कमी झाली आहे. वाचता वाचता अरे, वाह मस्तं...असे मनात येत नाही तोच संपलीसुद्धा.
थोडी मोठी असती तर वाचायला अजुन आवडली असती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2015 - 11:11 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली

पण वैराग्य आणि नैराश्य यांच्यात गल्लत झालेली वाटते आहे.

पैजारबुवा,

प्रसाद गोडबोले's picture

16 Sep 2015 - 12:06 pm | प्रसाद गोडबोले

करेक्ट !

द-बाहुबली's picture

17 Sep 2015 - 1:39 pm | द-बाहुबली

"वैराग्य" उपहासाने म्हटले आहे.

जव्हेरगंज's picture

16 Sep 2015 - 7:13 pm | जव्हेरगंज

मोघेसाहेब मस्त....!!!
हीच कविता जराशी सुधारून...

छंद लावला, जोपासला जोपासला.
वेल, बाग लावला, फुलवला, वाढवला.
पक्षी आले, आनंदले, वसले, वाढले.
सर्वां जसे नंदनवनच मिळाले.

पण आता …
नद्या, तळी, निर्झर आटले.
टिपूसभर पाणी मिळेनासे झाले.
आज जरी पक्षांना उडवून घालवले,
अखेरचे बागेत पाणी शिंपले.
तरी डोळा टिपूस न आले,
हीच का वैराग्याकडे पाउले?

पैसा's picture

18 Sep 2015 - 10:55 pm | पैसा

हेच का वैराग्य म्हटले ते स्मशान वैराग्यासाठी का?