जर्जरी वार्धक्य माझे

Primary tabs

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
7 Feb 2016 - 7:53 pm

जर्जरी वार्धक्य माझे तू पहाटे गोंजरावे
जीर्ण काया, क्षीण माया, तू जरासे थोपटावे
लागुनी थंडी कहारी, खोकल्याची उबळ यावी
हे प्रिये तू मज जरासे मधुविलेपन चाटवावे
श्वास माझा लागलेला म्रुत्युची चाहूल भिववे
आर्जवी स्पर्शात तूही मज जरासे सावरावे
दे मला आधार मांडी, जीव माझा कोंडताहे
मी तुला जागे करावे परि स्वत: निसटून जावे.

vidambanभावकविताविराणीकविताविडंबन

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

7 Feb 2016 - 8:35 pm | विजय पुरोहित

वाह, विडंबन पण म्हणता येईल आणि व्यथा पण...
जबर कल्पना...

पैसा's picture

7 Feb 2016 - 10:11 pm | पैसा

एकदा वाचून गेले. काही लिहायचा धीर झाला नाही. स्वतःची अशा वयात कल्पनाही करावी असे वाटत नाही. :(

श्रीरंग_जोशी's picture

7 Feb 2016 - 10:51 pm | श्रीरंग_जोशी

असंच काहीसं मलाही वाटलं...

कविता१९७८'s picture

7 Feb 2016 - 10:18 pm | कविता१९७८

कविता आवडली

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Feb 2016 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त आहे.
वाचताना बोरकरांची संधिप्रकाशात आठवली,

तेव्हा सखे आण तुळशीचे पान,
तुझ्या घरी वाण नाही त्याची

तूच ओढलेले त्यासवें दे पाणी,
थोर ना त्याहुनी तीर्थ दुजें

वाळल्या ओठां दे निरोपाचे फूल;
भुलीतली भूल शेवटली

पैजारबुवा,

खेडूत's picture

8 Feb 2016 - 11:22 am | खेडूत

!!

ही कविताही आवडली.

मोगा's picture

8 Feb 2016 - 11:12 am | मोगा

मस्त .

अत्रुप्त आत्मा's picture

8 Feb 2016 - 11:37 am | अत्रुप्त आत्मा

स्वाल्लिड हो !

विवेकपटाईत's picture

8 Feb 2016 - 11:39 am | विवेकपटाईत

कविता आवडली

माहितगार's picture

8 Feb 2016 - 2:41 pm | माहितगार

:( विंडंबन+विराणी+भाव कविता पोचलीही आणि भावलीही. मागे केव्हातरी राजन खान यांचा खर्‍या प्रेमाची प्रचिती वार्धक्यातच येते अशा स्वरुपाचा लेख दैनिक सकाळच्या पुरवणीत वाचलेला तुमच्या कवितेवरून परत एकदा आठवला.

पु.ले.शु.

बॅटमॅन's picture

8 Feb 2016 - 3:14 pm | बॅटमॅन

........

अजया's picture

8 Feb 2016 - 5:28 pm | अजया

:(
कविता आवडलीच.

उगा काहितरीच's picture

8 Feb 2016 - 6:11 pm | उगा काहितरीच

कविता आवडली .

प्राची अश्विनी's picture

8 Feb 2016 - 6:22 pm | प्राची अश्विनी

विडंबन असूनही स्वतंत्र ताकदीची कविता.
कतिल शिफाई यांची गझल आठवली
आखरी हिचकी तेरे जानों पा आये,
मौत भी में शायराना चाहता हूँ।

यशोधरा's picture

8 Feb 2016 - 6:33 pm | यशोधरा

ह्म्म..

एक एकटा एकटाच's picture

8 Feb 2016 - 7:28 pm | एक एकटा एकटाच

मस्त आहे

पद्मावति's picture

8 Feb 2016 - 7:40 pm | पद्मावति

कविता आवडली.

देशपांडे विनायक's picture

9 Feb 2016 - 10:31 am | देशपांडे विनायक

रूपाने विडंबन
अर्थाने विराणी
असलेली आपली भावकविता
माझ्यासाठी फार मोठी GIFT आहे
धन्यवाद

आतिवास's picture

9 Feb 2016 - 11:03 am | आतिवास

जमली आहे.
एक अटळ वास्तव..

बहुगुणी's picture

23 Feb 2016 - 10:39 pm | बहुगुणी

कुठून वाचली असं झालं, तिमा साहेब! इतकं जळजळीत वास्तव माझंच काय कुणाचंच नसावं अशी सदिच्छा, पण खूप नेमकं लिहिलं आहे!

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2016 - 9:39 am | प्रीत-मोहर

:(