वाटेवरी कुणाच्या
आहे अजून चाफा!
मंद परी जीवघेणा,
आहे तसा पसारा!
ऊन उठून येते रात्री,
घर गोळा होते नेत्री!
कुणी दिसते, कुणी विरते!
परी चाफ्यापाशी सारे,
हताश होऊन बसते!
मंद परी जीवघेणा
आहे तसा पसारा
वाटेवरी कुणाच्याही
असू नये गं चाफा!
-शिवकन्या
प्रतिक्रिया
4 Feb 2016 - 11:00 am | विजय पुरोहित
व्वा! कोकणातील तांबड्या मातीची वाट! त्या वाटेवर चालता चालता श्वेत चाफ्याच्या फुलांनी बहरुन आलेलं झाड अगदी नजरेसमोर उभं राहिलं!
4 Feb 2016 - 11:56 am | पगला गजोधर
गॅलरीतला पालापाचोळ्यातून बाहेर पडून, तै, कंपाऊंड ओलांडून, परिसराच्या वाटेवरील चाफ्याच्या झाडापाशी तरी आल्या एकदाच्या ….
(क. आ. हे. वे. सां. न. ल. )
4 Feb 2016 - 5:05 pm | नाखु
हमरस्त्यावरील वड-पिंपळाच्या झाडाकडे पण येतील.
अवांतर : कवीता चांगला आशय राखून आहे
6 Feb 2016 - 9:59 am | शिव कन्या
;-) पालापाचोळ्याचे मूळ शोधायचं म्हणजे हे आलंच!
4 Feb 2016 - 12:45 pm | शान्तिप्रिय
सुंदर कविता. चाफ्याचा सिझन सुरु झालाय!
4 Feb 2016 - 1:09 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
छान. सुंदर कविता.
4 Feb 2016 - 1:14 pm | माहितगार
कविता वाचली, समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.
4 Feb 2016 - 1:19 pm | माहितगार
@ शिव कन्या
तुम्ही आपल्या कवितांसोबत सोबत काही कवितेच्या दृष्टीने सहज जमल्यास चपखल छायाचित्रे जोडण्याचा विचार करावा असे आपल्या कविता वाचून वाटते.
6 Feb 2016 - 10:05 am | शिव कन्या
धन्यवाद. फार बारकाईने वाचत असल्याबद्दल.
फोटो चिक्कार आहेत,मी स्वतः काढलेले. पण मिपावर डकवणे फार अवघड आहे. सगळ्या प्रयत्नांती गप्प राहिले.
रच्याकने, केवळ याच एका अडचणी पायी भटकंतीतील अनेक लेख तसेच आहेत.
संमं ला सारखा त्रास द्यावासा वाटत नाही.
सूचना उत्तम.
4 Feb 2016 - 2:40 pm | मयुरMK
छान कविता
4 Feb 2016 - 4:29 pm | एक एकटा एकटाच
मस्त
4 Feb 2016 - 8:38 pm | अत्रुप्त आत्मा
छान .
4 Feb 2016 - 10:56 pm | यशोधरा
कविता आवडली.
5 Feb 2016 - 10:24 am | प्राची अश्विनी
छानच!
"चाफ्याच्या झाडा... " ही पद्मा गोळे यांची कविता आठवली.
6 Feb 2016 - 10:08 am | शिव कन्या
हॕलो प्राची!थँक्यू;:-)))
ती कविता मिळाली तर इथे टाक ना!
मला माहीत नाही.
वाचायला आवडेल.
6 Feb 2016 - 12:19 pm | प्राची अश्विनी
चाफ्याच्या झाडा ….
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना
– पद्मा गोळे.
या तरल कवितेचं अरुणा ढेरेंनी केलेलं रसग्रहणही तितकच सुंदर आहे.
15 Feb 2016 - 8:29 pm | शिव कन्या
वा! सुंदर आहे कविता..... धन्स प्राची ! :)))
15 Feb 2016 - 10:45 pm | मित्रहो
छान