स्वप्नांचा पाऊस पडे सारखा
महागाईलाही पूर चढे
विमान उडवीत चहूकडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
शिक्षण खोटे पदवी खोटी
मंत्रीणबाई तुळशी झाली
केजरीवालची पडता बिजली
दचकून तीचा ऊर उडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
पैसा काळा आणू म्हणुनी
ठोकूनी भाषण दाही दिशांनी
चाय - गाय पे चर्चा करूनी
मनकी बाता देश बुडे ,
गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे
चीनमध्ये झोपाळ्यावरुनी
दाढीवाले बिंब बघूनी
हसता संघ भगव्या रानी
धर्म अफूचे ऊन पडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे..
= = = = = = = = =
रिमझिम पाऊस पडे सारखा
यमुनेलाही पूर चढे
पाणीच पाणी चहूकडे, गं बाई
गेला मोहन कुणीकडे
तरुवर भिजले भिजल्या वेली
ओली चिंब राधा झाली
चमकुन लवता वरती बिजली
दचकुन माझा ऊर उडे, ग बाई
हांक धावली कृष्णा म्हणुनी
रोखुनी धरली दाही दिशांनी
खुणाविता तुज कर उंचावुनी
गुंजत मंजुळ मुग्ध चुडे, ग बाई
जलाशयाच्या लक्ष दर्पणी
तुझेच हसरे बिंब बघुनी
हसता राधा हिरव्या रानीं
पावसातही ऊन पडे, ग बाई
प्रतिक्रिया
18 May 2016 - 12:07 am | कपिलमुनी
राजकीय साठमारी न व्हावी ही सदिच्छा !
ठीकठाक जमला आहे
18 May 2016 - 1:45 am | अर्धवटराव
वाषीक स्नेहसंमेलन : उतेजनात्मक पारितोषी जाते वर्ग ३रा ड चे चेंबुरकर अनिल याला.
यशवंत हो बाळा.
18 May 2016 - 4:44 am | मुक्त विहारि
मोदी-द्वेष्टे आणि हिंदू-द्वेष्टे फॅन क्लब मध्ये आपले स्वागत आहे...
18 May 2016 - 9:30 am | नाखु
एकटेच का आले मुग्धेला नाही आणलं बरोबर्,किमान दरेकरांना तरी.
18 May 2016 - 10:39 am | मुक्त विहारि
आणि आमचे हितेशभाऊ, उद्दामकडे गेले आहेत असे सचिन जामोप्यांना सांगत असतांना गहनविचार्यांनी ऐकले आणि मग ते मोगाकडे गेले.
18 May 2016 - 8:09 am | बोका-ए-आझम
पण तजोंच्या 'काम दाखव फेकू'एवढी काही जमली नाही. शिका जरा त्यांच्याकडून. आयडी कसा शाबूत ठेवायचा आणि आक्षेपार्ह लिहूनसुद्धा कसं बॅन व्हायचं नाही हे पण शिकून घ्या.
18 May 2016 - 8:47 am | एस
कविता खासच लिहिली आहे. इथे काकू होऊ नये एव्हढीच इच्छा.
18 May 2016 - 9:38 am | वामन देशमुख
मूळ गाण्यातील
हसता राधा हिरव्या रानीं
दचकुन माझा ऊर उडे,
ग बाई, गेला मोहन कुणीकडे...
या माझ्या सर्वात आवडत्या ओळी आहेत.
;)
18 May 2016 - 10:06 am | तिमा
हांक मारली कन्हैय्या म्हणुनी
रोखुनी धरली दाही भुजांनी
खुणाविता तू कर उंचावुनी
तुळशी त्यावर तुटून पडे,
ग बाई, गेला राहुल कुणीकडे
18 May 2016 - 10:14 am | महेश_कुलकर्णी
आपला प्रयत्न चांगला असला तरी त्यातील बऱ्याच बाबी प्रसिद्धीमाध्यमे दाखवतात त्यापद्धतीने अर्धवट माहितीवर आधारभूत आहेत.
गेट वेल सून
18 May 2016 - 10:34 am | पैसा
विडंबन छाने. इथे आता नेहमीचे गुर्हाळ घालू नका. आणि असे वेगळे काहीतरी लिहायचे बघा.
18 May 2016 - 9:17 pm | गामा पैलवान
टिपटिप शाई गळे सारखी
ओठालाही डाग पडे
शाईच शाई चहूंकडे गं बाई
गेला केजरू कुणीकडे
-गा.पै.
18 May 2016 - 10:55 pm | इस्पिक राजा
जिल्ब्यांचा पाऊस पडे सारखा
हगवण झाली चहूकडे
इथे ओकारी तिथे मुतारी
चेंबुर बुडले द्वेषापारी
गं बाई गेला मोगा कुणीकडे....
आयडींवारी आयडी उडले
निर्लज्ज सारे डु आयडी सरसावले
इथेच हागा इथेच पादा
ओकुन ठेवा बद्द्दाबदा
गं बाई गेला हितेश कुणीकडे....
लज्जा नाही शरम नाही
नाही जनाची नाही मनाची
मुद्द्यांची तर जाणच नाही
वळवळ करतो चोहीकडे
गं बाई गेला दरेकर कुणीकडे....
अजातशत्रू आहे म्हणुनी काड्या सारी इकडे तिकडे
बघता बघता वारा सरला कुणीकडे
जळजळ झाली वास सुटला
रडरड चालू चहूकडे
गं बाई गेला सचीन कुणीकडे...
पंचवार्षिक अपचन प्रसवले
मोदी योग किती रिचवले
बद्धकोष्ठ तो तरी उरे
रोज मरे त्यावर कोण रडे
गं बाई गेला उद्दाम कुणीकडे...
चिकचिक चिकले ट्रॉलगिअर्ड वा पचकन थुंकले ग्रेट थुंकर
मंत्र मुग्ध ते घोडे बसले अन पॉटे करुनी बहु प्रसवले
जळजळ, मळमळ, ओकारी, हगवण सगळे जाहले
द्वेषाचे हे नीच कालवण कसे पचवले?
गं बाई गेला मोहन कुणीकडे...
18 May 2016 - 11:08 pm | कपिलमुनी
गिज्जगा केलीत की पार !!
18 May 2016 - 11:10 pm | viraj thale
गोडबोले विसरलात की
18 May 2016 - 11:22 pm | मुक्त विहारि
तरी पण जित्याची खोड काही सुटेल असे वाटत नाही...
23 May 2016 - 10:56 am | पक्षी
ठो...
अतिशय घाणेरडे पण छान विडंबन...
18 May 2016 - 11:18 pm | बोका-ए-आझम
२४ तासांत ५० पण प्रतिक्रिया नाही आल्या. मोदींचा TRP घसरला बहुतेक. त्याबद्दल धागाकर्त्याचा एक कायम चूर्णची बाटली देऊन सत्कार करण्यात येत आहे.
18 May 2016 - 11:20 pm | मुक्त विहारि
नथू गुग्गूळवटी पण द्यावी म्हणतो..
22 May 2016 - 9:51 pm | तर्राट जोकर
'गेला' ऐवजी 'गेले' वापरण्याचं कारण?
22 May 2016 - 9:55 pm | मुक्त विहारि
आय.डी. उडाला वाटते....
23 May 2016 - 11:00 am | आनन्दा
आयडी उडवण्याचा तीव्र निषेध. काही पटले नाही बुवा.