कविता - तुला देव कसं म्हणायचं?
नाही; राहून राहून हाच प्रश्न पडतो
जिथे तुझ्या साच्यातून माणूस घडतो
तुझ्या इच्छेशिवाय जगात पानही हलत नाही
तुझ्यामुळेच नभावर रंग चढतो
रंग देणारा तूच, रूप देणारा तूच
भावनाही तुझ्याच आणि विचार देणारा तूच
काही असलं तर ते तुझ्यामुळेच
काही नसलं तरीही ते तुझ्यामुळेच
मग असं असताना गोष्टी का बिघडतात?
माणसं सांग एकाएकी अशी का बदलतात?
सोपे प्रश्न क्लिष्ट होतात
साधी माणसं दुष्ट होतात
मग येतो आम्ही तुझ्याकडे
आमचे विचार थांबल्यावर
पुन्हा फिरून येत राहतो
तुझाही उपाय लांबल्यावर
आणि तुझा उपाय कधी होतच नाही
बहुतेक तुझ्या हातातली ती बातच नाही
पाऊस पाडणं सोपं असेल, पण विचार कर बहुदा
माणूस माणूस झाल्यावर तुझ्या हातात रहातच नाही
हो की नाही?
नाही; मग
सांग, विश्वास कसा ठेवायचा? आणि 'विश्वास ठेव' कसं म्हणायचं?
'माणूस'च जर तुझ्या हातात नसेल, तर तुला देव कसं म्हणायचं?
- अपूर्व ओक
प्रतिक्रिया
18 Jun 2016 - 5:50 pm | लालगरूड
छान
18 Jun 2016 - 8:41 pm | टवाळ कार्टा
+१
19 Jun 2016 - 3:49 pm | सतिश गावडे
१ १३ ७
20 Jun 2016 - 3:11 pm | नाखु
७ ७
20 Jun 2016 - 4:08 pm | चांदणे संदीप
४८९
20 Jun 2016 - 2:42 pm | पद्मावति
छान लिहिलंय.