आखाजीचा सण

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 May 2016 - 11:45 am

गवराईचा सन आला गवराईचा सन आला
या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला

सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या
झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या

आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो
आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो

माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला
पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या

कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे
हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे
मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे

नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई
कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही

- पाभे

भावकविताकवितासमाजजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 May 2016 - 12:21 pm | प्रचेतस

क्या बात है पाभे...!!
मस्तच.

एस's picture

9 May 2016 - 12:24 pm | एस

वा! फार छान कविता.

मस्तच की पाभेराव.
मस्त मस्त.

तर्राट जोकर's picture

9 May 2016 - 2:31 pm | तर्राट जोकर

आवडली, वसंतात झाडांना झोके बांधून मनसोक्त झुलणार्‍या (माहेरी आलेल्या) मुली डोळ्यासमोर आल्या.

नीलमोहर's picture

9 May 2016 - 3:18 pm | नीलमोहर

'कैरी आता तुझी नाही..'
छानच लिहीलेत.

कानडाऊ योगेशु's picture

9 May 2016 - 3:26 pm | कानडाऊ योगेशु

आवडेश.
बाकी फार दिवसांनी दिस्लात पा.भे भाऊ!

नाखु's picture

9 May 2016 - 3:32 pm | नाखु

मस्त रे !

लेखनसन्यास सोडला म्हणायचा .

पाभे वाचक नाखु

सस्नेह's picture

9 May 2016 - 4:25 pm | सस्नेह

ही कविता आहे की लोकगीत ?

रातराणी's picture

9 May 2016 - 6:39 pm | रातराणी

मस्तच!

जव्हेरगंज's picture

9 May 2016 - 9:55 pm | जव्हेरगंज

क्या बात!!

गणेशा's picture

10 May 2016 - 11:17 am | गणेशा

कविता आवडली ..

खुप दिवसानी इकडे ?

एक शंका :
गौराई च्या सनात कैरी नसेल बहुतेक झाडाला असे वाटते ..

mugdhagode's picture

10 May 2016 - 1:09 pm | mugdhagode

चैत्रात चैत्रागौरी असते. तेंव्हा कैरीचे पन्हे असते

पद्मावति's picture

11 May 2016 - 12:15 am | पद्मावति

मस्तं!